📌 वरिष्ठ उपसंपादक – नियम, अटी व शर्ती
विहित नमुन्यातील कार्यप्रवाहाप्रमाणे मजकूर व पोस्टची निर्मिती आवश्यक.
ठरवून दिलेल्या वेळेत पोस्टिंग होणे आवश्यक. उशिरा झालेल्या प्रत्येक पोस्टसाठी रु. 10/- दंड आकारला जाईल.
कॉपी-पेस्ट किंवा साहित्यचौर्य (इतरांचे साहित्य स्वतःचे म्हणून वापरणे) आढळल्यास मानधनास पात्र राहणार नाही.
प्रत्येक पोस्टमध्ये शीर्षक, उपशीर्षक, टॅग आणि ठरवून दिलेल्या आकारातील प्रतिमा अनिवार्य आहे.
पोस्टिंगपूर्वी प्रतिमेतील सर्व जुने गुणधर्म (Properties) व तपशील (Details) वगळून, त्या प्रतिमेला पोस्टच्या इंग्रजीतील स्लगनुसार फाईल नाव देणे आवश्यक आहे.
पोर्टल किंवा समाजमाध्यमांवर पोस्टिंग झाल्यानंतर पोस्ट तपासणी अनिवार्य आहे.
शुद्धलेखन आणि SEO तपासणी करणे बंधनकारक आहे.
महिन्यातील तीन चुका झाल्यानंतर, त्यापुढील प्रत्येक चुकीसाठी रु. 10/- दंड आकारला जाईल.
ठरवून दिलेल्या पोस्टिंगव्यतिरिक्त अतिरिक्त पोस्टिंगसाठीच्या विषयांना संपादकीय विभागाची ई-मेलवरील लेखी पूर्वपरवानगी आवश्यक आहे.