अकरावी प्रवेशाच्या जागांमध्ये घट
राज्यातील उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा उपलब्ध जागांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेशासाठी सुमारे पंचाहत्तर हजार जागा कमी झाल्या आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आणि प्रवेश क्षमता घटल्यामुळे…