नाशिकचे रामकुंड दोन महिने बंद
नाशिक येथील रामकुंड परिसर पुढील दोन महिन्यांसाठी सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावरील घाट परिसरात विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या रामकाल पथ या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पामुळे शनिवारपासून हा परिसर…