मुंबई महापालिकेची अभय योजना
मुंबईत हक्काचे घर असूनही तांत्रिक कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या हजारो रहिवाशांसाठी महानगरपालिकेने दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून रखडलेल्या इमारतींना कायदेशीर प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे पंचवीस हजार गृहनिर्माण संस्थांमधील लाखो नागरिकांचा घराच्या…