कासव संवर्धन मोहिमेचा यशस्वी टप्पा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांनी अंडी घातली होती. वन विभाग आणि स्थानिक कासव मित्र यांच्या अथक परिश्रमानंतर, या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचा आनंददायी काळ सुरू झाला आहे. सायंकाळी या किनाऱ्यावर शेकडो चिमुकल्या कासवांचा जन्म झाला आणि त्यांनी अथांग…