🖌️ चित्ररचनाकार
📋 प्रमुख जबाबदारी
समाज माध्यमांवरील पोस्ट, ब्रँडिंग, जाहिरात व मुद्रणासाठी आकर्षक, दर्जेदार आणि प्रभावी व्हिज्युअल डिझाईन तयार करणे ही प्रमुख जबाबदारी.
🗂 कामाचे स्वरूप
सोशल मिडिया पोस्ट्सची डिझाईन तयार करणे | मुद्रित जाहिराती व पोस्टर्स डिझाइन करणे | स्टेशनरी लेआउट करणे | लोगो, बँनर व ब्रँड आयडेंटिटी तयार करणे | व्हिडिओसाठी थंबनेल्स डिझाईन करणे | इव्हेंट, मोहीमांसाठी क्रिएटिव्ह डिझाईन | मार्केटिंग व संपादकीय टीमशी समन्वय
🎓 ग्राफिक डिझाईनमधील पदवी
📍 घरुन | मुंबई | आवशक्तेनुसार
💰 मानधन | मासिक वेतन
📌 आवश्यक कौशल्ये
Photoshop | Illustrator मध्ये प्रावीण्य
कोरलड्रॉ व इनडिझाईन वापरण्याचा अनुभव
व्हिज्युअल हायेरार्की व लेआउटची माहिती
रंगसंगती व फॉन्ट कॉम्बिनेशनचे ज्ञान
ब्रँड गाईडलाईननुसार डिझाईन करणे
वेळेच्या मर्यादेत गुणवत्तापूर्ण निर्मिती
कल्पकता, बारकाई आणि तपशीलभान
💻 आवश्यक यंत्रणा
उच्च दर्जाचा ग्राफिक डिझाईन संगणक
परवानाधारक CC | Corel Draw
ग्राफिक टॅबलेट | Wacom
वेगवान इंटरनेट | क्लाउड स्टोरेज
स्क्रीन कॅलिब्रेशनसाठी प्रोफेशनल मॉनिटर
कस्टम फॉन्ट्स व व्हिज्युअल बँक अॅक्सेस
प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी Asana | Notion | Slack
🏅 पात्रता
मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी मुलुखाचा जाज्वल्य अभिमान
पत्रकारितेचा उपयोग मराठी समाजासाठी करण्याची तळमळ
गरजू व दुर्बळांबद्दल सक्रिय आत्मीयता
समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव
प्रामाणिक । नम्र । वक्तशीर । कामसू । कार्यनिष्ठ
सतत शिकण्याची जिज्ञासा आणि तांत्रिक प्रगतीची तयारी
संघकार्य आणि नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
● पंधरा मिनिटांच्या चहाच्या दोन सुट्टया
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
जानेवारी
सोमवार, दि. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
मार्च
मंगळवार, दि. 3 मार्च : धूलिवंदन
ऑगस्ट
शनिवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट : रक्षाबंधन | दूपारनंतर अर्धा दिवस
सप्टेंबर
सोमवार, दि. 14 सप्टेंबर : श्री गणेश चतुर्थी
शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर
मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
नोव्हेंबर
मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर : दिपावली पाडवा
बुधवार, दि. 11 नोव्हेंबर : भाऊबीज | दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
सेवा कालावधी
नेमणूक ही किमान एक वर्षासाठी राहील. आवश्यकतेनुसार कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
सेवापुरवठा करार
नेमणुकीपूर्वी उमेदवाराने संस्थेशी लेखी सेवापुरवठा करार करणे बंधनकारक राहील.
गोपनियता करार (NDA)
संस्थेच्या अंतर्गत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी उमेदवाराने गोपनियता करार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रतिबंध करार
करार संपल्यानंतर संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक स्वरूपाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे लागेल.
बौद्धिक मालमत्तेचे हक्क
कार्यकाळात तयार होणाऱ्या साहित्य, संकल्पना, नमुने, डिझाईन व इतर बौद्धिक संपत्तीचे हक्क संस्था कडे राहतील.
कराराची पुनरावलोकन प्रक्रिया
दरवर्षी कार्यकामगिरीचा आढावा घेऊन करार नूतनीकरण किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवला जातो.
तत्काल समाप्तीची अट
विश्वासघात, शिस्तभंग, गोपनियतेचे उल्लंघन यासारख्या गंभीर कारणांमुळे संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करार समाप्त करू शकते.
टीप
ही फक्त साधारण माहिती आहे. संपूर्ण अटी व शर्ती प्रत्यक्ष करार करताना स्पष्ट व सविस्तरपणे निश्चित केल्या जातात.
कार्यालयीन सुविधा
● आधुनिक व सुसज्ज कार्यस्थळ
● शांत, सकारात्मक आणि व्यावसायिक वातावरण
● सुसज्ज संगणक, इंटरनेट व वर्किंग टूल्स
● सुरक्षितता आणि स्वच्छतेची हमी
कामकाजाचे वेळापत्रक
● ठराविक आणि नियोजनबद्ध कामाच्या वेळा
● आठवड्यात एक निश्चित सुट्टी
● गरजेनुसार लवचिक वेळा
व्यावसायिक वाढीच्या संधी
● प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी
● उच्च कामगिरीसाठी प्रोत्साहन व बढतीची शक्यता
● विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी
● नेतृत्वगुण विकसित करणारी जबाबदारी
मानधन आणि प्रोत्साहन
● योग्य आणि स्पर्धात्मक मानधन
● वेळेवर व नियमित देयके
● कामगिरीनुसार लाभांश किंवा गौरव
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
● अनुभवी आणि मैत्रीपूर्ण संघ
● सर्जनशील व मोकळा संवाद
● संघ बैठक व विचारमंथनाची सत्रे
शिकण्याची संधी
● नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्याची मोकळीक
● मराठी माध्यमातून प्रशिक्षण
● कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल टूल्सचा वापर
मूल्याधारित संस्था संस्कृती
● पारदर्शक व न्याय्य व्यवहार
● सामाजिक भान असलेली संस्था
● मूल्य, शिस्त आणि जबाबदारीवर भर
अतिरिक्त लाभ व उपक्रम
● विशेष दिवस, सण साजरे करणे
● कौटुंबिक कार्यक्रम व सहली
● वर्षातून एकदा संघबांधणी उपक्रम
PRICE LIST
ग्राफिक डिझाईन मानधन
1) Logo + Social Media sizes₹ 1500
2) Resized Logo for Social Media₹ 50
3) Visiting Card – Single Side₹ 200
4) Visiting Card – Double Side₹ 300
5) Edits in Visiting Card₹ 50
6) Letter Head₹ 150
7) Envelopes₹ 150
8) Brochure – Per Page₹ 200
9) Emailer & Leaflets₹ 250
10) Email Header₹ 150
11) Email Footer₹ 150
12) Social Media Cover₹ 200
13) Social Media Posts: New₹ 200
14) Social Media Posts: Template Edit₹ 150
15) Daily News Post Edit₹ 25
16) Presentation – Per Page₹ 100
17) Infographics – Per Page₹ 200
18) Packaging₹ 450
19) Motion Graphic₹ 750
20) Publication – A/4 Size₹ 150
21) 2D Graphics₹ 450
22) 3D Graphics₹ 1,000
23) Advertising Banners₹ 450
24) Standees₹ 350
25) Exhibition Stalls₹ 500
26) Labels₹ 250
27) Animations₹ 400
28) Animated Videos – 1 Minute₹ 1,000
29) Vehicle Wrap DesignsAs Per Project
30) SoftwareAs Per Project
31) App Design₹ 500-1,000
32) Signboard₹ 350
33) Hoarding₹ 750
34) Image & Product Retouch₹ 150-1,000
35) Video Thumbnails₹ 50
📄 सर्वसाधारण सेवा करारनामा
(यात पदानुसार वेळा, नियम, अटी व इतर तपशीलाचा बदल होऊ शकतो)
📅 कालावधी : दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (तारीख) – (महिना) – (साल)
या करारातील सर्व नियम, अटी व शर्ती मी मान्य करतो आणि माझ्या सेवाकालात त्यांचे संपूर्ण पालन करेन.