📰 वरिष्ठ उपसंपादक
इच्छुकांना खालील विभागांसाठी काम करता येईल.
बातम्या
सदरे
चित्रफीत
पोर्टल
मुलाखत
वार्तांकन
🎓 पदवी (पत्रकारिता/मराठी) | किमान 10 ते 15 वर्षे अनुभव
📍 घरुन | मुंबई | आवशक्तेनुसार
💰 मानधन | मासिक वेतन
📰 संपादकीय जबाबदाऱ्या
बातम्यांची निवड, प्राधान्यक्रम ठरवणे व सहकाऱ्यांना वाटप करणे
चालू घडामोडींवर लक्ष ठेवून त्यांचा बातम्यांमध्ये समावेश करून घेणे
माहितीची तथ्यतपासणी, नावे/पदनाम/तारखा/ठिकाणे/आकडे तपासून खात्री करणे
शीर्षक व उपशीर्षक निश्चित करून मजकूर नेमका, वाचनीय व परिणामकारक करणे
व्याकरणासह संपूर्ण मजकूर सुसंगत करणे व विहीत लेखनशैलीत मांडणी करणे
बातम्या, मुलाखती व संपादकीय कामासाठी संस्थेच्या वतीने दूरध्वनीद्वारे संपर्क साधणे
निर्धारित वेळेत बातम्या पोर्टलवर प्रसिद्ध होण्यासाठी समन्वय व नियंत्रण करणे
वैयक्तीक निर्धारित बातम्या व सदरांचे पोस्टींग स्वतः करणे
📋 संपादकीय व्यवस्थापन
सर्व बातम्या व लेखांची दर्जा मानांकनानुसार तपासणी व नियंत्रण
दूरदृश्य प्रणालीद्वारे साप्ताहिक बैठकीत नियोजन, आढावा व सुधारणा याबाबत सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणे
संपादकीय विभागातील कर्तव्याच्या वेळा व रजाकाळातील कामकाजाचे नियोजन करणे
संपादकीय विभागासाठी मजकूर लेखक व इतर आवश्यक मनुष्यबळाचा शोध व निवड
नव्या सहकाऱ्यांना वर्डप्रेस, समाजमाध्यम पोस्टींग व विहित नमुन्यातील कामाचे प्रशिक्षण देणे
दिवसाचे कामकाज पूर्ण झाल्यावर अद्यतन उपलब्ध असलेले प्लगिन अद्ययावत करणे
महिन्याच्या अखेरीस दोन महिन्यांपूर्वीच्या बातम्या व छायाचित्रे पोर्टलवरून काढून टाकणे / संग्रहित करणे
संपादकीय विभागाच्या विहित नमुन्यात हजेरी व पगारपत्रकाच्या नोंदी ठेवणे
🌟 मूल्ये व दृष्टिकोन
मराठी भाषा, समाज व मुलुखाबद्दल अभिमान आणि समाजहितासाठी पत्रकारितेची बांधिलकी
समाजाप्रती दायित्वाची जाणीव व गरजू घटकांबद्दल संवेदनशीलता
🏆 वैयक्तिक गुणधर्म
प्रामाणिक, नम्र, वक्तशीर व कार्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व
संघकार्य व नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता
सतत शिकण्याची जिज्ञासा व तांत्रिक बदल स्वीकारण्याची तयारी
वेळेचे नियोजन व जबाबदारीने काम करण्याची सवय
💻 व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये
उत्कृष्ट लेखन, शुद्ध व्याकरण व अचूक टंकलेखन कौशल्य
माहिती संकलन, पडताळणी व विश्लेषणात प्राविण्य
रचना, मांडणी व दृश्य सुसंगतीचे मूलभूत ज्ञान
वर्ड, एक्सेल, वर्डप्रेस व शोधयंत्र अनुरूपतेचा (SEO) अनुभव
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
● पंधरा मिनिटांच्या चहाच्या दोन सुट्टया
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
जानेवारी
सोमवार, दि. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
मार्च
मंगळवार, दि. 3 मार्च : धूलिवंदन
ऑगस्ट
शनिवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट : रक्षाबंधन | दूपारनंतर अर्धा दिवस
सप्टेंबर
सोमवार, दि. 14 सप्टेंबर : श्री गणेश चतुर्थी
शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर
मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
नोव्हेंबर
मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर : दिपावली पाडवा
बुधवार, दि. 11 नोव्हेंबर : भाऊबीज | दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
प्राथमिक निवड आणि प्रशिक्षण कालावधी
प्राथमिक निवडीनंतर संपादकीय विभागातील प्रत्येक पदासाठी किमान दोन आठवड्यांचा विनावेतन पूर्णवेळ प्रशिक्षण कालावधी अनिवार्य आहे.
सेवा कालावधी
नेमणूक ही किमान एक वर्षासाठी राहील. आवश्यकतेनुसार कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
सेवापुरवठा करार
नेमणुकीपूर्वी उमेदवाराने संस्थेशी लेखी सेवापुरवठा करार करणे बंधनकारक राहील.
गोपनियता करार (NDA – नॉन-डिस्क्लोजर)
संस्थेच्या अंतर्गत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी उमेदवाराने गोपनियता करार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रतिबंध करार
करार संपल्यानंतर संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक स्वरूपाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे लागेल.
बौद्धिक मालमत्तेचे हक्क
कार्यकाळात तयार होणाऱ्या साहित्य, संकल्पना, नमुने, डिझाईन व इतर बौद्धिक संपत्तीचे हक्क संस्था कडे राहतील.
कराराची पुनरावलोकन प्रक्रिया
दरवर्षी कार्यकामगिरीचा आढावा घेऊन करार नूतनीकरण किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवला जातो.
तत्काल समाप्तीची अट
विश्वासघात, शिस्तभंग, गोपनियतेचे उल्लंघन यासारख्या गंभीर कारणांमुळे संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करार समाप्त करू शकते.
टीप
ही फक्त साधारण माहिती आहे. संपूर्ण अटी व शर्ती प्रत्यक्ष करार करताना स्पष्ट व सविस्तरपणे निश्चित केल्या जातात.
कार्यालयीन सुविधा
● आधुनिक व सुसज्ज कार्यस्थळ
● शांत, सकारात्मक आणि व्यावसायिक वातावरण
● सुसज्ज संगणक, इंटरनेट व वर्किंग टूल्स
● सुरक्षितता आणि स्वच्छतेची हमी
कामकाजाचे वेळापत्रक
● ठराविक आणि नियोजनबद्ध कामाच्या वेळा
● आठवड्यात एक निश्चित सुट्टी
● गरजेनुसार लवचिक वेळा
व्यावसायिक वाढीच्या संधी
● प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी
● उच्च कामगिरीसाठी प्रोत्साहन व बढतीची शक्यता
● विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी
● नेतृत्वगुण विकसित करणारी जबाबदारी
मानधन आणि प्रोत्साहन
● योग्य आणि स्पर्धात्मक मानधन
● वेळेवर व नियमित देयके
● कामगिरीनुसार लाभांश किंवा गौरव
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
● अनुभवी आणि मैत्रीपूर्ण संघ
● सर्जनशील व मोकळा संवाद
● संघ बैठक व विचारमंथनाची सत्रे
शिकण्याची संधी
● नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्याची मोकळीक
● मराठी माध्यमातून प्रशिक्षण
● कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल टूल्सचा वापर
मूल्याधारित संस्था संस्कृती
● पारदर्शक व न्याय्य व्यवहार
● सामाजिक भान असलेली संस्था
● मूल्य, शिस्त आणि जबाबदारीवर भर
अतिरिक्त लाभ व उपक्रम
● विशेष दिवस, सण साजरे करणे
● कौटुंबिक कार्यक्रम व सहली
● वर्षातून एकदा संघबांधणी उपक्रम
📄 सर्वसाधारण सेवा करारनामा
(यात पदानुसार वेळा, नियम, अटी व इतर तपशीलाचा बदल होऊ शकतो)
📅 कालावधी : दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (तारीख) – (महिना) – (साल)
या करारातील सर्व नियम, अटी व शर्ती मी मान्य करतो आणि माझ्या सेवाकालात त्यांचे संपूर्ण पालन करेन.