🎬 चित्रफीत संपादक
📋 प्रमुख जबाबदारी
बातम्या, मुलाखती, वृतांत व माहितीपटासाठी चित्रफितींचे संकलन, काटछाट, पार्श्वसंगीत व ग्राफिक्ससह सुसंगत व आकर्षक संपादन करणे, ही प्रमुख जबाबदारी.
🗂 कामाचे स्वरूप
चित्रफितीचे प्राथमिक छाटकाम | ध्वनी गुणवत्ता व आवाज समतोल | पार्श्वसंगीत व इफेक्टस समाविष्ट | शीर्षके व उपशीर्षके समावेश | क्रमानुसार दृश्य मांडणी | डिलिव्हरीसाठी फॉरमॅट रूपांतरण | संपादित फाईलचे संग्रह व पाठवणी
🎓 चित्रफीत संपादनातील पदवी
📍 घरुन | मुंबई | आवशक्तेनुसार
💰 मानधन | मासिक वेतन
📌 आवश्यक कौशल्ये
Adobe Premiere Pro | FCP पारंगत
After Effects | अॅनिमेशन कौशल्य
रंग सुधारणा व LUTs ज्ञान
ऑडिओ क्लीनअप व मिक्सिंग कौशल्य
वेगवान आणि अचूक संपादन
टायमलाईन मॅनेजमेंट कौशल्य आवश्यक
चित्रफीत कथानक समजून घेण्याची क्षमता
💻 आवश्यक यंत्रणा
उच्च क्षमतेचा संपादन संगणक
आवश्यक सॉफ्टवेअर परवाने
स्टुडिओ मॉनिटर व हेडफोन
मोठी स्टोरेज ड्राइव्ह्स सुविधा
व्हिडीओ ट्रान्सफरसाठी कार्ड रीडर
HD/4K व्हिडीओ प्लेबॅक स्क्रीन
जलद इंटरनेट व क्लाउड स्पेस
🏅 पात्रता
मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी मुलुखाचा जाज्वल्य अभिमान
पत्रकारितेचा उपयोग मराठी समाजासाठी करण्याची तळमळ
गरजू व दुर्बळांबद्दल सक्रिय आत्मीयता
समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव
प्रामाणिक । नम्र । वक्तशीर । कामसू । कार्यनिष्ठ
सतत शिकण्याची जिज्ञासा आणि तांत्रिक प्रगतीची तयारी
संघकार्य आणि नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
● पंधरा मिनिटांच्या चहाच्या दोन सुट्टया
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
जानेवारी
सोमवार, दि. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
मार्च
मंगळवार, दि. 3 मार्च : धूलिवंदन
ऑगस्ट
शनिवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट : रक्षाबंधन | दूपारनंतर अर्धा दिवस
सप्टेंबर
सोमवार, दि. 14 सप्टेंबर : श्री गणेश चतुर्थी
शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर
मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
नोव्हेंबर
मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर : दिपावली पाडवा
बुधवार, दि. 11 नोव्हेंबर : भाऊबीज | दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
सेवा कालावधी
नेमणूक ही किमान एक वर्षासाठी राहील. आवश्यकतेनुसार कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
सेवापुरवठा करार
नेमणुकीपूर्वी उमेदवाराने संस्थेशी लेखी सेवापुरवठा करार करणे बंधनकारक राहील.
गोपनियता करार (NDA)
संस्थेच्या अंतर्गत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी उमेदवाराने गोपनियता करार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रतिबंध करार
करार संपल्यानंतर संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक स्वरूपाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे लागेल.
बौद्धिक मालमत्तेचे हक्क
कार्यकाळात तयार होणाऱ्या साहित्य, संकल्पना, नमुने, डिझाईन व इतर बौद्धिक संपत्तीचे हक्क संस्था कडे राहतील.
कराराची पुनरावलोकन प्रक्रिया
दरवर्षी कार्यकामगिरीचा आढावा घेऊन करार नूतनीकरण किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवला जातो.
तत्काल समाप्तीची अट
विश्वासघात, शिस्तभंग, गोपनियतेचे उल्लंघन यासारख्या गंभीर कारणांमुळे संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करार समाप्त करू शकते.
टीप
ही फक्त साधारण माहिती आहे. संपूर्ण अटी व शर्ती प्रत्यक्ष करार करताना स्पष्ट व सविस्तरपणे निश्चित केल्या जातात.
कार्यालयीन सुविधा
● आधुनिक व सुसज्ज कार्यस्थळ
● शांत, सकारात्मक आणि व्यावसायिक वातावरण
● सुसज्ज संगणक, इंटरनेट व वर्किंग टूल्स
● सुरक्षितता आणि स्वच्छतेची हमी
कामकाजाचे वेळापत्रक
● ठराविक आणि नियोजनबद्ध कामाच्या वेळा
● आठवड्यात एक निश्चित सुट्टी
● गरजेनुसार लवचिक वेळा
व्यावसायिक वाढीच्या संधी
● प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी
● उच्च कामगिरीसाठी प्रोत्साहन व बढतीची शक्यता
● विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी
● नेतृत्वगुण विकसित करणारी जबाबदारी
मानधन आणि प्रोत्साहन
● योग्य आणि स्पर्धात्मक मानधन
● वेळेवर व नियमित देयके
● कामगिरीनुसार लाभांश किंवा गौरव
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
● अनुभवी आणि मैत्रीपूर्ण संघ
● सर्जनशील व मोकळा संवाद
● संघ बैठक व विचारमंथनाची सत्रे
शिकण्याची संधी
● नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्याची मोकळीक
● मराठी माध्यमातून प्रशिक्षण
● कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल टूल्सचा वापर
मूल्याधारित संस्था संस्कृती
● पारदर्शक व न्याय्य व्यवहार
● सामाजिक भान असलेली संस्था
● मूल्य, शिस्त आणि जबाबदारीवर भर
अतिरिक्त लाभ व उपक्रम
● विशेष दिवस, सण साजरे करणे
● कौटुंबिक कार्यक्रम व सहली
● वर्षातून एकदा संघबांधणी उपक्रम
🤝 चित्रफीत संपादनाचे मानधन 💰
Basic Editing
चित्रफीत प्रकार
सोशल मीडिया पोस्ट / रील
कामाचे स्वरुप
कटिंग, निवेदन, पार्श्वसंगीत, शीर्षके
लांबी
३० – ६० – ९० सेकंद
मानधन दर
₹ २ / प्रती सेकंद
कालमर्यादा
३० – ४५ – ६० मिनिटे
Standard Editing
चित्रफीत प्रकार
लघु चित्रफीत
कामाचे स्वरुप
Basic + ट्रान्झिशन्स, कलर करेक्शन
लांबी
3 मिनिटे
मानधन दर
₹ 180 / प्रती मिनिट
कालमर्यादा
3 तास
Premium Editing
चित्रफीत प्रकार
मुलाखत, माहितीपट, तत्सम
कामाचे स्वरुप
Basic + Standard + Motion graphics
लांबी
10 मिनिटे
मानधन दर
₹ 300 / प्रती मिनिट
कालमर्यादा
10 तास
📌 नियम, अटी व शर्ती
कामाचा प्रकार Storyboard नुसार ठरवला जाईल.
Storyboard, Footage, Script, Music, Voice-over व Assets वाहिनीकडून दिले जातील.
सुधारणा धोरण – पहिली सुधारणा मोफत, नंतर ₹ 50 – 150 प्रति सुधारणा, कामानुसार.
कालमर्यादा खात्री – वेळेआधी दिल्यास ₹ 100 बोनस | उशीर झाल्यास प्रती तास ₹ 100 कपात.
देयके नियम – पदाचा तपशील पान पहावे.
File Delivery Format – Original File + MP4 (Full HD / 4K), Google Drive / WeTransfer लिंकद्वारे.
गोपनीयता – वाहिनीचा डेटा, फुटेज, संगीत, निवेदन, स्क्रिप्ट, ॲसेट्स व फिल्म इतरत्र वापरू नये, आढळल्यास कायदेशीर कारवाई.
मालकी हक्क – सर्व फायनल आउटपुटचे हक्क वाहिनीचे असतील.
एकगठ्ठा प्रकल्पांवर – 10+ व्हिडिओंवर 10% डिस्काउंट.
गैर – विशेष करार – हा करार एडिटरला इतर ग्राहकांसाठी काम करण्यापासून रोखत नाही, जोपर्यंत आमचा प्रोजेक्ट प्रभावित होत नाही.
📄 सर्वसाधारण सेवा करारनामा
(यात पदानुसार वेळा, नियम, अटी व इतर तपशीलाचा बदल होऊ शकतो)
📅 कालावधी : दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (तारीख) – (महिना) – (साल)
या करारातील सर्व नियम, अटी व शर्ती मी मान्य करतो आणि माझ्या सेवाकालात त्यांचे संपूर्ण पालन करेन.