🎯 Operations & Business Manager
संस्थेच्या ऑपरेशन्स, व्यवसायवृद्धी व प्रकल्प व्यवस्थापनासाठी खालील जबाबदाऱ्या सांभाळणारे पद
मानव संसाधन (HR)
प्रशासन
विपणन व विक्री
प्रकल्प व्यवस्थापन
देयके व वसुली
जनसंपर्क
🎓 पदवी | 10 वर्षे अनुभव
📍 मुंबई | आवशक्तेनुसार
💰 वेतन + अतिरिक्त प्रोत्साहन
🧩 प्रशासकीय जबाबदाऱ्या
मनुष्यबळाची निवड, नेमणूक, समन्वय व कामांचे योग्य वाटप करणे
कार्यालयीन तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातील दैनंदिन कामकाजाचे नियोजन व नियंत्रण ठेवणे
माहितीपट, प्रकल्प व विशेष उपक्रमांच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करणे
काम सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश मिळविण्यासाठी संबंधितांशी समन्वय साधणे
कामांचे वेळापत्रक, दर्जा व पूर्णत्व यावर नियमित देखरेख ठेवणे
संस्थेतील विविध विभागांमध्ये परस्पर समन्वय राखणे
संस्थेच्या कार्यपद्धती, नियम व प्रक्रिया यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे
📈 व्यावसायिक जबाबदाऱ्या
संस्थेच्या सेवा व उपक्रमांचा प्रचार व प्रसार करणे
नवीन ग्राहक, संस्था व जाहिरातदार यांच्याशी संपर्क प्रस्थापित करणे
काम मिळविण्यासाठी प्रस्ताव मांडणे, बैठका घेणे व पाठपुरावा करणे
कामाच्या टप्प्यानुसार देयके सादर करणे व रक्कम प्राप्तीसाठी पाठपुरावा करणे
सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची नोंद व तपशील व्यवस्थित ठेवणे
नियमित ग्राहक व दीर्घकालीन व्यावसायिक संबंध निर्माण करणे
संस्थेच्या आर्थिक वाढीसाठी नवीन संकल्पना व उपाय सुचवणे
🧠 मूल्ये🔹गुणधर्म🔹अपेक्षा
प्रामाणिकपणा, गोपनीयता व विश्वासार्हता यांचे पालन
स्पष्ट संवादकौशल्य व प्रभावी समन्वय साधण्याची क्षमता
जबाबदारीने निर्णय घेण्याची व त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता
वेळेचे योग्य नियोजन करून ताणतणावाखालीही कार्य करण्याची सवय
संघभावना, नेतृत्वगुण व समस्या सोडवण्याची क्षमता
नवे ज्ञान आत्मसात करण्याची तयारी व बदल स्वीकारण्याची वृत्ती
सोपविलेल्या कामाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
● पंधरा मिनिटांच्या चहाच्या दोन सुट्टया
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
जानेवारी
सोमवार, दि. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
मार्च
मंगळवार, दि. 3 मार्च : धूलिवंदन
ऑगस्ट
शनिवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट : रक्षाबंधन | दूपारनंतर अर्धा दिवस
सप्टेंबर
सोमवार, दि. 14 सप्टेंबर : श्री गणेश चतुर्थी
शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर
मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
नोव्हेंबर
मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर : दिपावली पाडवा
बुधवार, दि. 11 नोव्हेंबर : भाऊबीज | दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
प्राथमिक निवड आणि प्रशिक्षण कालावधी
प्राथमिक निवडीनंतर संपादकीय विभागातील प्रत्येक पदासाठी किमान दोन आठवड्यांचा विनावेतन पूर्णवेळ प्रशिक्षण कालावधी अनिवार्य आहे.
सेवा कालावधी
नेमणूक ही किमान एक वर्षासाठी राहील. आवश्यकतेनुसार कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
सेवापुरवठा करार
नेमणुकीपूर्वी उमेदवाराने संस्थेशी लेखी सेवापुरवठा करार करणे बंधनकारक राहील.
गोपनियता करार (NDA – नॉन-डिस्क्लोजर)
संस्थेच्या अंतर्गत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी उमेदवाराने गोपनियता करार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रतिबंध करार
करार संपल्यानंतर संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक स्वरूपाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे लागेल.
बौद्धिक मालमत्तेचे हक्क
कार्यकाळात तयार होणाऱ्या साहित्य, संकल्पना, नमुने, डिझाईन व इतर बौद्धिक संपत्तीचे हक्क संस्था कडे राहतील.
कराराची पुनरावलोकन प्रक्रिया
दरवर्षी कार्यकामगिरीचा आढावा घेऊन करार नूतनीकरण किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवला जातो.
तत्काल समाप्तीची अट
विश्वासघात, शिस्तभंग, गोपनियतेचे उल्लंघन यासारख्या गंभीर कारणांमुळे संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करार समाप्त करू शकते.
टीप
ही फक्त साधारण माहिती आहे. संपूर्ण अटी व शर्ती प्रत्यक्ष करार करताना स्पष्ट व सविस्तरपणे निश्चित केल्या जातात.
कार्यालयीन सुविधा
● आधुनिक व सुसज्ज कार्यस्थळ
● शांत, सकारात्मक आणि व्यावसायिक वातावरण
● सुसज्ज संगणक, इंटरनेट व वर्किंग टूल्स
● सुरक्षितता आणि स्वच्छतेची हमी
कामकाजाचे वेळापत्रक
● ठराविक आणि नियोजनबद्ध कामाच्या वेळा
● आठवड्यात एक निश्चित सुट्टी
● गरजेनुसार लवचिक वेळा
व्यावसायिक वाढीच्या संधी
● प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी
● उच्च कामगिरीसाठी प्रोत्साहन व बढतीची शक्यता
● विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी
● नेतृत्वगुण विकसित करणारी जबाबदारी
मानधन आणि प्रोत्साहन
● योग्य आणि स्पर्धात्मक मानधन
● वेळेवर व नियमित देयके
● कामगिरीनुसार लाभांश किंवा गौरव
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
● अनुभवी आणि मैत्रीपूर्ण संघ
● सर्जनशील व मोकळा संवाद
● संघ बैठक व विचारमंथनाची सत्रे
शिकण्याची संधी
● नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्याची मोकळीक
● मराठी माध्यमातून प्रशिक्षण
● कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल टूल्सचा वापर
मूल्याधारित संस्था संस्कृती
● पारदर्शक व न्याय्य व्यवहार
● सामाजिक भान असलेली संस्था
● मूल्य, शिस्त आणि जबाबदारीवर भर
अतिरिक्त लाभ व उपक्रम
● विशेष दिवस, सण साजरे करणे
● कौटुंबिक कार्यक्रम व सहली
● वर्षातून एकदा संघबांधणी उपक्रम
📄 सर्वसाधारण सेवा करारनामा
(यात पदानुसार वेळा, नियम, अटी व इतर तपशीलाचा बदल होऊ शकतो)
📅 कालावधी : दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (तारीख) – (महिना) – (साल)
या करारातील सर्व नियम, अटी व शर्ती मी मान्य करतो आणि माझ्या सेवाकालात त्यांचे संपूर्ण पालन करेन.