📰 कार्यकारी संपादक
📋 प्रमुख जबाबदारी
माध्यम संस्थेच्या सर्वसामान्य संपादकीय धोरणांचे नियोजन, अंमलबजावणी व नियंत्रण करण्याची प्रमुख जबाबदारी.
🗂 कामाचे स्वरूप
दैनिक, साप्ताहिक व विशेष बातम्यांचे विषय ठरवणे व दिशा देणे | संपादकीय संघाचा कार्यभार विभागणे, मार्गदर्शन करणे आणि वेळेवर काम पूर्ण होईल याची खात्री करणे | बातम्यांच्या गुणवत्तेवर अंतिम छाप व लेखनशैलीची तपासणी | राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक संदर्भात तटस्थ संपादकीय निर्णय घेणे | वेगवेगळ्या विभागांमधील संवाद राखणे व अंतिम प्रकाशनापूर्वी सर्व लिखाणाचे व्यवस्थापन | मानहानी, कॉपीराईट सारख्या तांत्रिक व कायदेशीर बाबींची दक्षता घेणे
🎓 मराठी भाषा | पत्रकारीता पदवी
📍 घरुन | मुंबई | आवशक्तेनुसार
💰 मानधन | मासिक वेतन
📌 इतर जबाबदाऱ्या
सर्वत्र संपर्काचे जाळे तयार करणे
सहकारी संघाची निवड व संघव्यवस्थापन
खास बातम्यांची निवड, लेखन, संपादन
विषय, शीर्षके आणि मथळ्यांमध्ये आकर्षकता राखणे
विशेष सदरे व कार्यक्रमांची निर्मिती । संचालन
दर्जा आणि गुणवत्ता यांचा समन्वय
राज्य तसेच देशभर प्रवासाची तयारी
💻 कौशल्ये
उत्कृष्ट लेखन, व्याकरण व टंकलेखन
Word व Excel वापरात प्राविण्य
माहिती संकलन व विश्लेषणात हातखंडा
रचना, मांडणी आणि रंगसंगतीचे ज्ञान
कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर किंवा शिकण्याची तयारी
वेळेचे पक्के नियोजन व उत्तम संघकार्य
CMS (WordPress), SEO चा अनुभव
🏅 पात्रता
मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी मुलुखाचा जाज्वल्य अभिमान
पत्रकारितेचा उपयोग मराठी समाजासाठी करण्याची तळमळ
गरजू व दुर्बळांबद्दल सक्रिय आत्मीयता
समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव
प्रामाणिक । नम्र । वक्तशीर । कामसू । कार्यनिष्ठ
सतत शिकण्याची जिज्ञासा आणि तांत्रिक प्रगतीची तयारी
संघकार्य आणि नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
● पंधरा मिनिटांच्या चहाच्या दोन सुट्टया
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
शनिवार, दि. 9 ऑगस्ट : रक्षाबंधन । दूपारनंतर अर्धा दिवस
शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
बुधवार, दि. 27 ऑगस्ट : श्री गणेश चतुर्थी
शनिवार, दि. 6 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर : श्री लक्ष्मी कुबेर पूजन । दूपारनंतर अर्धा दिवस
बुधवार, दि. 22 ऑक्टोबर : बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा
गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर : भाऊबीज । दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
सेवा कालावधी
नेमणूक ही किमान एक वर्षासाठी राहील. आवश्यकतेनुसार कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
सेवापुरवठा करार
नेमणुकीपूर्वी उमेदवाराने संस्थेशी लेखी सेवापुरवठा करार करणे बंधनकारक राहील.
गोपनियता करार (NDA)
संस्थेच्या अंतर्गत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी उमेदवाराने गोपनियता करार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रतिबंध करार
करार संपल्यानंतर संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक स्वरूपाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे लागेल.
बौद्धिक मालमत्तेचे हक्क
कार्यकाळात तयार होणाऱ्या साहित्य, संकल्पना, नमुने, डिझाईन व इतर बौद्धिक संपत्तीचे हक्क संस्था कडे राहतील.
कराराची पुनरावलोकन प्रक्रिया
दरवर्षी कार्यकामगिरीचा आढावा घेऊन करार नूतनीकरण किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवला जातो.
तत्काल समाप्तीची अट
विश्वासघात, शिस्तभंग, गोपनियतेचे उल्लंघन यासारख्या गंभीर कारणांमुळे संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करार समाप्त करू शकते.
टीप
ही फक्त साधारण माहिती आहे. संपूर्ण अटी व शर्ती प्रत्यक्ष करार करताना स्पष्ट व सविस्तरपणे निश्चित केल्या जातात.
कार्यालयीन सुविधा
● आधुनिक व सुसज्ज कार्यस्थळ
● शांत, सकारात्मक आणि व्यावसायिक वातावरण
● सुसज्ज संगणक, इंटरनेट व वर्किंग टूल्स
● सुरक्षितता आणि स्वच्छतेची हमी
कामकाजाचे वेळापत्रक
● ठराविक आणि नियोजनबद्ध कामाच्या वेळा
● आठवड्यात एक निश्चित सुट्टी
● गरजेनुसार लवचिक वेळा
व्यावसायिक वाढीच्या संधी
● प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी
● उच्च कामगिरीसाठी प्रोत्साहन व बढतीची शक्यता
● विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी
● नेतृत्वगुण विकसित करणारी जबाबदारी
मानधन आणि प्रोत्साहन
● योग्य आणि स्पर्धात्मक मानधन
● वेळेवर व नियमित देयके
● कामगिरीनुसार लाभांश किंवा गौरव
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
● अनुभवी आणि मैत्रीपूर्ण संघ
● सर्जनशील व मोकळा संवाद
● संघ बैठक व विचारमंथनाची सत्रे
शिकण्याची संधी
● नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्याची मोकळीक
● मराठी माध्यमातून प्रशिक्षण
● कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल टूल्सचा वापर
मूल्याधारित संस्था संस्कृती
● पारदर्शक व न्याय्य व्यवहार
● सामाजिक भान असलेली संस्था
● मूल्य, शिस्त आणि जबाबदारीवर भर
अतिरिक्त लाभ व उपक्रम
● विशेष दिवस, सण साजरे करणे
● कौटुंबिक कार्यक्रम व सहली
● वर्षातून एकदा संघबांधणी उपक्रम