सह्याद्री मराठी वाहिनी

Category: मराठी मालिका

लोकप्रिय मराठी मालिका, कथानक आणि ताज्या घडामोडींची माहिती वाचण्यासाठी सह्याद्री मराठी वाहिनी ला आवश्य भेट द्या!

  • गोव्याच्या किनारी होणार समर- स्वानंदीचा भव्य विवाह सोहळा

    गोव्याच्या किनारी होणार समर- स्वानंदीचा भव्य विवाह सोहळा

    झी मराठीवरील अगदी कमी वेळात प्रेक्षकाच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका खास वळणावर पोहोचली आहे. मालिकेत समर आणि स्वानंदी या जोडीचा विवाह सोहळा गोव्याच्या मोहक समुद्रकिनारी मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. गोव्याचा निसर्गरम्य परिसर आणि खळखळून वाहणाऱ्या लाटा अशा अद्भुत देखावा असणाऱ्या ठिकाणी रंगणारा हा विवाह सोहळा प्रेक्षकांसाठी एक अनोखा क्षण ठरणार आहे.

    या मालिकेत समरची भूमिका अभिनेता सुबोध भावे तर स्वानंदीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान साकारत आहे. गोव्यातील तीन दिवस चाललेल्या या विशेष शूटिंगदरम्यान तेजश्रीने समाज माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की “ही दृश्यं साकारताना संपूर्ण टीमने अत्यंत उत्साहाने आणि समर्पणाने काम केलं. समुद्रकिनाऱ्यावरील ४० ते ४५ डिग्री तापमानातही प्रत्येकाने आपल्या बाजूने हे काम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आहे. इतक्या सुंदर लोकेशनवर शूटिंग करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता.” असंही ती म्हणाली.

    वधू-वरांच्या पोशाखांपासून ते सजावटीपर्यंत प्रत्येक तपशीलावर काटेकोरपणे लक्ष दिलं गेलं आहे. पारंपरिक वेशभूषा, सुंदर फुलांच्या सजावटी आणि सिनेमॅटिक दृश्यरचना यामुळे हा विवाहसोहळा प्रेक्षकांना नवीन जगात नेणारा ठरणार आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान प्रसारित होणाऱ्या भागांत प्रेक्षकांना या भव्य विवाह सोहळ्याचे विशेष भाग बघता येणार आहेत.

    या भागांत धमाल, रोमांचक आणि भावनिक अशा अनेक क्षणांची सांगड असून मालिकेतील काही कलाटणी देणाऱ्या प्रसंगांमुळे ही मालिकेला कुठल्या वळणावर जाईल हे ही पाहणे प्रेक्षकांसाठी महत्वाचे ठरणार आहे. झी मराठी वाहिनी पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा विवाह सोहळा एक अविस्मरणीय अनुभव देणारा आणि मनोरंजनाची मेजवानी असणारा सोहळा ठरणार आहे. सध्या समाज माध्यमांवर आणि मालिकेला मिळालेल्या चांगल्या रेटिंगवरून एकंदरीतच या मालिकेबद्दल प्रेक्षकांची असलेली ओढ आणि पसंती पाहायला मिळत आहे.

  • अबीर गुलाल

    अबीर गुलाल

    ‘कलर्स मराठी’ वाहिनी टीआरपीत मागे पडल्यावर नवनव्या मालिका या वाहिनीवर येऊ लागल्या आहेत. नव्या
    विषयाच्या, नव्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. या वाहिनीवर
    ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा केचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात
    आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत मोठी उत्कंठा दिसत आहे.


    ‘अबीर गुलाल’ मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार शुभ्रा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. शुभ्रा अतिशय
    श्रीमंत कुटुंबातून आली असून तिला काळा हा रंग आवडत नाही. अभिनेत्री पायल जाधव यात दिसणार आहे.
    अभिनेत्री पायल जाधव हिची ही पहिलीच मालिका आहे. तिने ‘बापल्योक’ या चित्रपटात काम केले आहे.

  • थोडं तुझं आणि थोडं माझं

    थोडं तुझं आणि थोडं माझं

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ लवकरच येत आहे. या मालिकेमधून शिवानी
    सुर्वे ही अभिनेत्री दिसणार आहे.
    ‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात अभिनेत्री शिवानी सुर्वे पोहोचली होती. आता ती पुन्हा प्रेक्षकांच्या
    भेटीला येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता
    दिसणार आहे.


    या मालिकेत ती ‘मानसी’ ही भूमिका साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी
    आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचे साम्राज्य उभे केले आहे. आपल्या
    मुलीनेही खूप शिकून नाव कमवावे असे त्यांचे स्वप्न आहे. वडिलांचे स्वप्न मानसीला काही करुन पूर्ण करायचे
    आहे. दुसरीकडे कॉलेजमधील गायत्रीच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. जेव्हा मानसी पदवी परीक्षेत
    पहिली येते, तेव्हा वादास सुरुवात होते.