सह्याद्री मराठी वाहिनी

Category: संगीतविश्व

संगीतविश्व बातम्या, मराठी गाणी नवीन, संगीत क्षेत्रातील घडामोडी, गायक संगीतकार माहिती, नवीन अल्बम रिलीज, संगीत पुरस्कार सोहळा, लोकप्रिय गाणी आणि अशीच विशेष माहिती जाणून घेण्यासाठी सह्याद्री मराठी वाहिनीला आवश्य भेट द्या.

  • हिरामंडीतील नवे गाणे

    हिरामंडीतील नवे गाणे

    हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले संजय लीला भन्साळी यांची पहिली
    वेबमालिका ‘हीरामंडी’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींनी सजलेल्या ‘हिरामंडी’ची पहिली
    झलक पाहिल्यानंतर चाहते या वेबमालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबमालिकेतील आणखी एक
    नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘तिलस्मी बाहें’ असे असून ते सोनाक्षी सिन्हावर चित्रीत
    करण्यात आले आहे.
    या गाण्यात सोनाक्षीची किलर स्टाईल पाहण्यासारखी आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबमालिकेतील ‘सकल बन’
    चे पहिले गाणे प्रदर्शित झाले, याला रसिकांनी भरभरून दाद दिली. या दुसऱ्या गाण्यात सोनाक्षी सिन्हा तिच्या
    सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांचे संगीत हे गाणे आणखी प्रेक्षणीय बनवत
    आहे.


    गायिका सर्मिष्ठा चटर्जी यांनी ‘तिलस्मी बाहे’ ला आवाज दिला आहे, गीतकार ए.एम. तुराज यांनी हे लिहिले आहे.
    एकंदरीत ‘हिरामंडी’चे हे गाणे खूपच अप्रतिम आहे. भन्साळी म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालेल्या या
    गाण्याला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
    या वेब मालिकेमध्ये पाकिस्तानच्या ‘रेड लाईट’ भागातील वेश्याव्यवसायांची कथा दाखविण्यात येणार आहे.
    प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही मालिका १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
    होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

  • गुलाबी साडी

    गुलाबी साडी

    सध्या समाजमाध्यमांवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या
    गाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.
    हे गाणे प्रथम फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याच्या मंचावर सादर करण्यात आले. गाण्याचे गायन
    संजू राठोड यांनी केले आहे.


    संजू राठोड सांगतात की, गुलाबी साडी हे गाणे त्यांनी दिवाळीच्या दिवशी सकाळी लिहिले होते. काही
    कारणांमुळे ते दिवाळीला घरी गेले नव्हते. मग घरी बसून काय करायचे, असा प्रश्न पडला होता. त्यावेळेस त्यांनी
    ‘गुलाबी साडी’ हे गाणे तयार केले.
    या गाण्यानंतर त्याचे नवे गाणे चांगलेच गाजत आहेव ‘ब्राईड तुझी नवरी’ असे या गाण्याचे नाव आहे. या
    गाण्यात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील आहे.