सह्याद्री मराठी वाहिनी

Category: जिगरबाज

धाडसी लोकांच्या यशोगाथा, धैर्याच्या गोष्टी, साहसी कामगिरी, संकटावर मात करणारे नायक, जिगरबाज आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती.

  • …तर तुम्ही महान नेते आहात – इंद्रा नूयी    

    …तर तुम्ही महान नेते आहात – इंद्रा नूयी    

    रिसेप्सनिस्ट ते पेप्सिकोच्या  सीईओ  इंद्रा  नूयी यांचा थक्क करणारा प्रवास : पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती व  कंपनीच्या  संचालक  मंडळातही  त्यांचा  समावेश  करण्यात  आल्याने  गदगद झालेल्या इंद्रानूयी ही बातमी आपली आई, पती  आणि  दोन  मुलींना  सांगण्यास  उत्सुक  होत्या. त्यासाठी  त्या लगेच घरी आल्या  आणि आईला बघताच तुला  एक गोड  बातमी  द्यायची  असल्याचे  सांगितले. मात्र, आईने  त्याकडे  लक्ष न देता दुसऱ्या  दिवशीसाठी  दूध  आणण्यास  सांगितले. यामुळे नाराज झालेल्या इंद्राने दूध तर आणले, परंतु मी पेप्सीकोची सीईओ झाल्याचे वृत्त तुला का ऐकायचे नव्हते? असे त्यांनी आईला  विचारले. इंद्राच्या आईने दिलेले उत्तर खूपच मार्मिक होते. “तू भलेही  कंपनीच्या  संचालक  मंडळावर असशील. परंतु, घरात प्रवेश  केल्यावर  तू पत्नी, मुलगी, सून आणि आई आहेस, हे विसरू नकोस. तू हे सर्वकाही आहेस. ही जागा इतर कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीमधील मान सन्मान गॅरेजमध्येच ठेव आणि घरात काहीच आणत जाऊ नकोस’, हे आईने तेव्हा उच्चारलेले शब्द इंद्रायांच्या मनावर कायमचे कोरले गेले.

     प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. असे नेहमीच बोलले जाते. यशस्वी  पुरुषाच्या वाटचालीत एक स्त्री आई, पत्नी  किंवा  इतर कोणत्याही रूपात  खंबीरपणे उभी असते असा त्याचा अर्थ. मात्र, एक शिक्षित व स्वावलंबी महिला आपली प्रतिभा, जिद्द आणि स्वबळावर यशाला गवसणी  घालू शकते. भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांनी आपल्या कर्तृत्वानं हे सिद्ध करून दाखवलं आहे. कधी काळी आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने पैसा कमावण्यासाठी मध्यरात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिसेप्सनिस्ट म्हणून काम करणाऱ्या इंद्रा नूयी आज १३१ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या आणि जगातील चौथ्या सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांच्या या अफाट कर्तुत्वामुळेच इंद्रा नूयी  यांचा जगातील शक्तिशाली महिलां पैकी एक म्हणून उल्लेख केला जातो. शीतपेयांच्या  उत्पादनात आघाडीवर असलेल्या पेप्सिको कंपनीच्या सीईओ असलेल्या इंद्रा नूयी यांनी नुकताच म्हणजे २८ ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा केला.

    केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात समाजात कमी जास्त प्रमाणात लिंगभेद हा केलाच जातो. मात्र, इंद्रा नूयी यांनी आपल्या  थक्क  करून  टाकणाऱ्या  प्रवासातून  एक आदर्श घालून दिला आहे. तुम्ही कुठे आहात आणि कुठून आला आहात ? याला  काहीही  महत्त्व  नसून, तुमच्याकडे  स्वप्न  असेल  तर ते साध्य  करण्यासाठी  प्रबळ  इच्छा  शक्ती आणि निष्ठेची गरज असते. हेच  नूयी यांच्या  यशावरून  स्पष्ट होते. भारतातील  सध्याच्या  चेन्नई  आणि  तेव्हाच्या मद्रास शहरातील एका पुराणमतवादी  तामिळ  कुटूंबात २८ ऑक्टोबर १९५५ रोजी  इंद्रा  यांचा  जन्म  झाला. त्यांचे  वडील  स्टेट  बँक ऑफ हैद्राबादमध्ये कार्यरत होते. इंद्रा यांचे  शालेय  शिक्षण मद्रास येथील  होली अँन्जेल्स  अँग्लोइंडियन  हायर सेकंडरी स्कूल येथे पार पाडले. इंद्रा  यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित याविषयांमध्ये पदवी प्राप्त केली. वडील बँकेत  असल्याने  आईनेच  इंद्रा आणि इतर बहिणींचे पालन पोषण केले. मोठ्या झाल्यावर तुम्ही काय होणार? असा प्रश्न आई मुलींना  विचारत  असे  आणि सर्वोत्तम उत्तर देणाऱ्याला बक्षीस.  यामुळेच आपल्या भविष्यातील वाटचालीचा विचार करण्याची प्रेरणा इंद्राला मिळाली. निर्धार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इंद्राने आताच्या कोलकाता आणि तत्कालीन कलकत्ता शहरातील  अत्यंत  प्रतिष्ठित  अशा  इंडियन  इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटचे शिक्षण  घेतले. त्यानंतर इंद्राने दोन वर्षे भारतातच जॉन्सन व मेट्टूर बर्डसेल या कंपन्यांमध्ये नोकरी  केली.

                     यामधून  कमावलेल्या थोड्या  फार  पैशांसह  इंद्राने  उच्चशिक्षणासाठी अमेरिकेकडे प्रयाण केले. याले येथे उच्चशिक्षण घेत असताना आपला खर्च भागविण्यासाठी इंद्रा मध्यरात्रीपासून ते पहाटे पाचवाजेपर्यंत रिसेप्शनिस्ट म्हणून काम  करायच्या.  या  संघर्षादरम्यान  याले  इथे मास्टर्स  पूर्ण  केल्यानंतर कमावून बचत केलेल्या पैशातून आपल्या पहिल्या मुलाखतीसाठी त्यांनी एक  पाश्चिमात्य सूट खरेदी केला. परंतु, यावेळी तिने गुडघ्यापर्यंत येईल एवढा ट्राऊझर परिधान केल्यामुळे मुलाखतीत इंद्राला नाकारण्यात आले. यामुळे  नाराज इंद्रा यालेमधील आपल्या प्राध्यापकांकडे गेल्या असता, तुला जे योग्य वाटेल ते परिधान कर. असा  सल्ला  त्यांनी  इंद्राला  दिला. त्यानंतर  इंद्रा पुढच्या  मुलाखतीला साडी नेसून  पारंपरिक  भारतीय  पोशाखात  मुलाखतीसाठी गेली. आणि  आश्चर्य म्हणजे  तिला  नोकरी मिळाली. तुम्ही कायपरिधान करता यापेक्षा तुम्ही काय आहात याला जास्त  महत्त्व आहे. हे या घटनेवरून सिद्ध होते.

    या  घटनेनंतर इंद्राने ‘बीईंगयुव्हरसेल्फ’  म्हणजे आपण जे काही आहोत ते आहोत, याच विचारधारेच्या आधारे मार्गक्रमण सुरुकेले. त्यानंतर  इंद्राने  बोस्टन  कन्सल्टिंग  ग्रुपमध्ये  कामास  सुरुवात केली. त्याठिकाणी तिला कठोर परिश्रम करावे लागलेआणि परिश्रमाशी  कोणतीही तडजोड न करण्याची इंद्रा दोन  कारणं सांगतात. एकतर मी महिला व त्यामुळे आपले कर्तृत्त्व सिद्धकरण्यासाठी पुरुष  सहकाऱ्यांपेक्षा  अधिक  काम करणे  आणि दुसरे  म्हणजे  अमेरिकन नसणे. सहा  वर्षानंतर इंद्रा यांनी मोटोरोला कंपनीमध्ये  उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अँण्ड प्लांनिंग विभागाचे संचालक पद स्वीकारले. त्यानंतर चार वर्षे एसी ब्राऊन बोव्हेरी या  झूरिचस्थित  औद्योगिक  कंपनीच्या  अमेरिकेतील  व्यवसायात  उच्च  व्यवस्थापनात  काम केल्यानंतर १९९४ साली इंद्रा  नूयी  यांनी  पेप्सिको  कंपनी  जॉईन  केली.पेप्सिको कंपनीत अथक परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर इंद्राने अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. अनेकदा त्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागे. या परिश्रमाचेच फळ त्यांना मिळाले आणि २००० साली त्यांची पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.  शिवाय कंपनीच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आला.  

     एक  महिला  आणि त्यातही गैर अमेरिकन महिलेला अशा सर्वोच्च शिखरावर पोचणे हे खरतर खूपच खडतर काम होते. या दरम्यान  कामाच्या  ठिकाणी  होणारे  मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भेदाचे सर्व अत्याचार इंद्रा यांनी सहन केले. कामकाजी महिला असणे हे वाटतं तितकं सोपं नाही आणि इंद्रा नुयी यांनाही ते चांगले ठाऊक आहे. मात्र, आपण एक उत्तम पत्नी,आई, मुलगी आणि या सोबतच  मानसन्मान  आणि  प्रतिष्ठा मिळविणारी कामकाजी महिलासुद्धा होऊ शकते. हे इंद्रा नुयी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच इंद्रा नुयी यांचा जीवन प्रवास जीवनात खरोखरच काहीतरी साध्य करून भरारी घेण्यास उत्सुक असण्यासह कामकाजाच्या ठिकाणी सहन कराव्या लागणाऱ्या गॊष्टींचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने खरोखरच प्रेरणादायी आहे. एक महिला तिच्या इच्छेनुसार कोणतीही गोष्ट साध्य करूश कते. हेच इंद्रा यांच्या यशस्वी जीवनावरून स्पष्ट  होते.  

  • वर्दीचा विश्वास – विश्वास नांगरे – पाटील

    वर्दीचा विश्वास – विश्वास नांगरे – पाटील

    नेहेमी चर्चेत राहणारेयुवा पोलीस अधिकारी म्हणजे विश्वास नागरे  पाटील. त्यांची १४ वर्षांची कारकीर्द अनेक “शिंघम “ स्टइल प्रसंगानी ठासुन भरलेली आहे.

    पोलिस अधिकान्याचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेलं असत. आयएएसचा पयाय असताना काही जण आयपीएसची निवड करून खाकी वर्दी स्वीकारतात. मुंबईचे बेडर वर्दीवाले अधिकारी विश्वास नांगरे – पाटील अशांपैकीच एक. धडाकेबाज, अभ्यासू पोलीस अधिकारी आशी त्यांची ख्याती. संवेदनशीलपणे हाताळलेल्या जातीय दंगली, हायप्रोफ्राइल

    रेव्ह पार्टीचा पर्दाफाश आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी केलेले दोन हात.. नेहमी चर्चत राहणारे युवा पोलिस अधिकारी म्हणजे विश्वास नांगरे- पाटील. त्यांची १४ वषाची कारकीर्द अनेक ‘सिंघम’ स्टाइल प्रसंगांनी ठासून भरलेली आहे.

    विश्वास नांगरे पाटील त्यांचा जन्म सांगली जिल्हातील बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी आली.’पहेलवानाचा तू मुलगा, गुडच होणार,’ हे शब्द सहाव्या इयतेत शिकणान्या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निमाण करायची’ या जिदीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा अवघ्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला. खाकी वर्दीवरीला जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पास्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील त्यांनी १९१७ला कोल्हापुरतील शिवाजी विध्यापिठातुन इतिकास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केलं. नंतर  मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना विश्वास नांगरे – पाटील यांनी एम. ए. पूर्ण केलं.

    वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विकीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे  एकमेव अधिकारी ठरले. लातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे- पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात डीआयजीपी पदावर कार्यरत असणान्या नांगरे-पाटील यांनी त्या आधी मुंबई पशिच्म विभागाचे अप्पर पोलिस आयुत्फ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

    विश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतलं की, नजरेसमोर उभे रहात ते ‘२६/११’ च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याच चित्र. ‘ताज’ मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळालयानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहकान्यासह सर्वप्रथम ‘ताज’ कडे सरसावले. ‘लिओपोलड’ वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मागाने ‘ताज’ मध्ये घुसले होते, त्याच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली. दहशतवाघाच्या अत्याधुनिक शास्त्रानाही न जुमानता नांगरे- पाटील पुढे सासवत राहिले. ‘ताज’ च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिकान्याना दहशतवाघाच्या हालचालीची माहिती पुरवली. पोलीस आणि इतर जवानांच्या मोठ्या परक्रमाने दहशतवाघांचे मनसुबे उधळण्यात आले. या थरारक ‘लढाई’ त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलंच गाजल.‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाघाचा मुकाबला करण महत्वाच वाटलं. मी कारण निवडलं आणि पुढे सरसावलो,’ असे ते सांगतात.पोलीस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणान्या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलीस अधिकाऱ्यांत एक ‘माणूस’ही दाडला आहे. सामाजिक जाणीवेतून जगणारे आणि तशा  पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावारणावरील प्रेमीची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलीस दलातील कर्माचान्यामधयेही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात.पारर्द्धयांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे य पोलीस कर्माचाण्याच्या नावाने सुरू केलेली जीम्न्शियम,सततच्या दगदगीत कुटूबंसाठी जगता यावं,म्हणून नांगरे -पाटील यांनी पोलीस आणि त्यांचा कुंटूबीयासाठी सुरु केलेली ’सहल योगना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

    तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचं एक आकषण निर्माण झालं आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वगीय असले पाहिजे,’ असं म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील तरुणाईसाठी एक आगळ-वेगळ ‘स्फूती’ स्थान आहेत.  

  • अष्टपैलू गायिका – बेला शेंडे

    अष्टपैलू गायिका – बेला शेंडे

    काही लोक भाग्य घेऊन जन्माला येतात. गाण्याच्या स्टेजवर पाउल ठेवलं तेव्हा ती अवघी ११-१२ वर्षाची होती. त्यानंतर तिने ‘सारेगम’ ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा ती १४-१५ वर्षाची होती. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये भाग घेण्याची संधी तिला मिळाली. ही स्पर्धा देखील ती जिंकली. तेव्हापासून बेला शेंडे हिच्या गाण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.- मुग्धा करंदीकर.

    हा प्रवास करताना गाणं समृद्ध करणाऱ्या अनेक संधी तिला मिळाल्या. मानमरातब मिळाले. त्यामुळे लक्ष     विचलित नं होऊ देता त्यांनी प्रत्येक संधी आव्हान मानली आणि ते ती आव्हानं पेलत गेली.

     गाणाऱ्या  घराण्यात  तिचा जन्म झाला. लहान होती तेव्हा  तिची मोठी बहीण सावनी ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका ‘कुसुमशेंडे’ यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या. त्यावेळेस  शेजारी बसून बेला त्यांचं गाणं ऐकत असत. आईबाबांबरोबर  अनेक  कार्यक्रमांना जात असत. त्यावेळेपासूनच  तिची गाण्याची आवड दिसायला लागली. बाबांनी हे ओळखलं  आणि  तिचे  गायनाचे  प्रशिक्षण  सुरु झाले. ती तिच्या आजीकडेच गाणं  शिकत होती. पण  त्यांच्या  आवाजाची 
    पट्टीवरची आहे हे लक्षात आल्यावर तिने पुरुष गायकाकडे शिकावं असं सुचवलं. ह्यानंतर तिने बाबांकडेच गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अशा मोठमोठ्या गायिकांचं येणं-जाणं होतं. त्यामुळे  गाणं  समृद्ध  व्हायला  खूप  मदत  झाली.

    दहावीत असताना ‘सारेगम’ची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल ती जरा साशंक होती. पण घरच्या आणि शाळेतल्या साऱ्यांचा पाठींबा होता. अभ्यास आणि गाणं हे दोन्ही सांभाळायचं होतं. हे तिने सांभाळलं आणि ती स्पर्धा जिंकली.ह्या स्पर्धेनंतर तिला अनेक अल्बम्स, हिंदी-मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी महेशमांजरेकरांनी दिली. त्यांच्या ‘एहसास’ ह्या चित्रपटासाठी तिने गायन केले.’मीशिवाजीराजेभोसलेबोलतोय, जोधाअकबर, उत्तरायण, पहेली, अशाअनेकहिंदी-मराठी चित्रपटांसाठी ती गायली. ‘नटरंग’ सारखा, अजय-अतुल यांचं अतिशय उत्कृष्ठ संगीत लाभलेल्या चित्रपटांसाठी तिला संधी मिळाली आणि ती सारी गाणी अतिशय लोकप्रिय झाली.

    ‘अनुबंध, शुभंकरोति, हा खेळसावल्यांचा, एकझोका, वृंदावन’ अशा विविध मालिकांची शीर्षक गीते ही तिच्याच आवाजातली.अशा ह्या उत्तम गायिकेस आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जसेकी ‘ झीगौरव, नर्गिस दत्त पुरस्कार, सुशीलस्नेह पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, झी संगीत पुरस्कार, स्टारस्क्रीन पुरस्कार, (मनमोहना-जोधा-अकबर) मिर्ची म्युझिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गायिका (झीटी.व्ही,नटरंग), रापा राष्ट्रीय पुरस्कार (झाले मोकळे आकाश) असे अनेक सन्मान तिच्या वाट्याला आले आहेत. 

                गुरु आणि वडील यांच्या रचनांवर आधारित ‘अर्पण’ हा बेला शेंडे यांचा अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे त्यांचा गाण्याचा प्रवास अतिशय उत्कृष्टपणे सुरु आहे. वेगळ्यावेगळ्या प्रकारची गाणी गायची संधी त्यांना मिळत आहे. अशीही अष्टपैलू गायिका हिरकणीच म्हणावी लागेल.

  • वर्दीतला मास्तर – भूषणकुमार उपाध्याय

    वर्दीतला मास्तर – भूषणकुमार उपाध्याय

    यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा-परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. देशातील या सर्वांत समर्थ यंत्रणेमध्ये मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी, या उद्देशाने काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख आपण ‘जिगरबाज ‘ या सदरातून करून घेणार आहोत. डॉ.भूषणकुमार उपाध्याय हे असंच एक प्रभावी व्यक्तिमत्त आहे.

    सामान्यतः गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी पॉलिसांची एक मदत असते. त्या पद्धतीला सगळेच वचकून असतात, साम, दाम, दंड, भेद या न्यायाने पोलीस गुन्हेगाराला वठणीवर आणतात. पण गुन्हेगारी प्रवृत्तीला शिक्षेपेक्षा प्रबोधनाची साथ मिळावी तर समाजात चांगले बदल नक्की घडू शकतात, या विचारला आचरणात आणलं ते आयपीएस अधिकारी भूषणकुमार उपाध्याय यांनी, ते सध्या मुंबईच्या वाहतूक विभागाचे सह- पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

    भूषणकुमार उपाध्याय यांचा जन्म बिहारमधील मोतिहारी येथे झाला. बालपणही तिथेच गेलं. वडील प्राध्यापक होते, त्यामुळे उपाध्याय यांची जडणघडण एका संस्कारशील वातावरणात झाली. साहित्याची आवड, घरात प्रवचनाची परंपरा यांचा परिणाम त्यांच्या विचारसरणीवरही पडला. मग संस्कृत साहित्यात पदवी संपादन करून त्यात पदव्युत्तर  शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं. प्राध्यापक होण्याची मनीषा असताना अगदी अपघातानेच त्यांच्या भविष्याला वेगळं वळण मिळालं. त्यांच्या वडिलांना एकदा पोलिसांनी अकारण त्रास दिला. नुकतेच पदवीधर झालेल्या उपाध्याय यांना ते खूप जिव्हारी लागलं. या अनुभवामुळे त्याना पोलीस यंत्रणेचा एक भाग होण्याची इच्छा जागृत झाली. त्यासाठी राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा यशस्वीरीत्या पार करून उपाध्याय आयपीएस झाले.

    सामान्यतः आयपीएस किंवा पोलिस अधिकारी म्हटला, की आपल्या डोळ्यासमोर आक्रमक, सैनिकी धाटणीच्या व्यक्तीचं चित्र उभं राहतं. पण उपाध्याय याला अपवाद आहेत. संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी घेणारे उपाध्याय यांनी आपली पीएच.डी भाषाभिमान शास्त्रात केली. युपीएससीसाठी प्राथमिक परीक्षेत इतिहास तर मुख्य परीक्षेत संस्कृत आणि तत्वज्ञान हे विषय त्यांनी निवडले होते. त्यामुळे पोलिसी पेशातील अनेक लहानमोठ्या अडचणींवर यशस्वी मार्ग काढण्याचं कौश्यल्य त्यांना आत्मसात झालं. गुन्हेगारापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्ती अपराध्याला शासन करण्यापेक्षा त्याला सुधारण्याची संधी देणं, त्यासाठी त्याचं प्रबोधन करून प्रवृत्त करणं ही त्यांची पद्धत आहे. त्याचसोबत निरपराध्याला अकारण त्रास न होणंही त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यांचे हे विचार त्यांनी त्यांच्या कृतीतूनही दाखवून दिले आहेत.

    आयपीएस झाल्यानंतर त्याचं पहिलं पोस्टिंग पंढरपूला होतं. इथला कार्यभार सांभाळतांना त्यांनी आपल्या कामाच्या आगळ्या शैलीमुळे लोकप्रियता मिळवली. तिचे ते त्यांचं कार्यालय ते विठ्ठलाच मंदिर हे अंतर अनवाणी चालून जात. आठड्यातून तीन-चार दिवस परिसरात साध्या वेशात फिरून अनेक लहान-मोठे गुन्हे होण्याला त्यांनी प्रतिबंध घातला. त्यांच्या अशा अनपेक्षित हजेरीमुळे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती बसली. पंढरपुराल्या आध्यात्मिक वातावरणात ते चांगलेच रमले. इतकचं नव्हे, तर त्यांनी स्वतः पंढरपुरात प्रवचनही दिली आहेत. तिथून त्यांची बदली मग लातूरला झाली. ते वर्ष होतं १९९३. लातूरच्या भूकंपग्रस्त भागात त्यांनी तीन वर्ष काम केलं. मग जळगाव, सोलपवर, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली.

    सामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दल भीतीची भावना असते. याचं  कारणंही ते स्पष्ट करतात. मुळात पोलिसांची यंत्रणा, त्यातले विभाग, त्यांची कामं ही ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी बनवली. त्या काळात ते भारतीयांवर वचक ठेण्यासाठी पोलीस भरती करत. स्वातंत्र्यानंतर आपणही टी यंत्रणा होती तशी स्वीकारली. पण आज त्यात कालानुरूप बदल करण गरजेचं झालं आहे. बारा तासांची ड्युटी, विश्रांतीस्थान, स्वछतागृह याचा अभाव यामुळे पोलिसांवर खूप ताण पडतो. जशी पोलिसांची भरती करणं आवश्यक आहे तसंच त्यांच्या कामाचे नियोजन करणंही गरजेचं आहे. त्यांना मूलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. परदेशात पोलिसांना फक्त सहा तासच ड्युटी असते. त्यातही कामाचं स्वरूप विभागलेलं असतं. आपल्याकडच्या पोलीस ट्रेनिंगमध्ये शारीरिक मेहनतीवर भर दिला जातो. खरं तर पोलिसांच्या शरीरासोबत मनाचंही ट्रेनिंग होणं गरजेचं असल्याचं उपाध्याय सांगतात.

    वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविषयी सामान्यांच्या मनात आस्था असते. पण तीच माणसं त्यांच्या हाताखालच्या पोलिसांना घाबरतात. याचं कारण त्यांच्या कामाचे तास आणि ताण. त्यामुळे पोलिसांच्या कामाचं नियोजन करताना नव्याने समावेश झालेल्या बाबींचा विचार करायला हवा. नार्कोटिक्स, दहशतवाद, ट्रॅफिक, व्हीआयपी सुरक्षा अशा विभागात मनुष्य बळाची वाटणी ही त्यांच्या अग्रक्रमाने व्हायला हवी. अशा नवीन प्रश्नांना सामोरं जाताना पोलिसांना कसरत करावी लागते. याशिवाय समाजात वाढणारी आंदोलनं, मोर्चे यामुळे सामाजिक तणाव निर्माण होतो. पण या समस्यांच्या तुलनेत पोलिसांचं मनुष्यबळ पुरेसे नाही. अर्थात त्यासाठीही त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत आणि गेल्या आठ-दहा वर्षात त्याला यशस्वी आले आहे. पोलीस दलात पन्नास हजार कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. अजूनही काही चांगले बदल घडून येण्यासाठी काही काळ जावा लागेल.

    एखादं प्रश्न नेहमीच धाकदपटशाहीने न सोडवता शांततेने , समजूतदारपणाने सोडवला जाऊ शकतो. फक्त त्यासाठी तुमच्याकडे संकल्पशक्ती हवी. संकल्पशक्तीला कर्तृत्वाची जोड देऊन एखादा छोटा माणूसही मोठं कार्य करू शकतो. पोलिसांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्याकडून केली जाणारी कारवाई ही त्या व्यक्तीच्या भल्यासाठी केली गेली पाहिजे, असं उपाध्याय यांचं मत आहे. गेले दोन तप याच तत्त्वाला समोर ठेऊन त्यांनी काम केलं आहे आणि अजूनही करत आहेत. त्यांनी आपल्या या तत्त्वांना शब्दरूप देऊन दोन पुस्तकही प्रकशित केली आहेत. नवीन भरती झालेल्या अनेक शिकाऊ पोलिसांना ते मार्गदर्शन करतात. शासनानेही त्यांच्या या अजोड सेवेची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले आहे. उपाध्याय यांचं मूळ गाव बिहार असलं तरी आज महाराष्ट्रात येऊन त्यांना वीस वर्षाहून अधिक काळ होऊन गेलाय. घरातून मिळालेल्या संस्कारशील वारसाला इकडच्या मातीत रुजविण्याच काम गेली दोन तप उपाध्याय करत आहेत. कार्यालयातही ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा एका कसलेल्या गुरूच्या भूमिकेत असतात. त्यामुळे कोणीही माणूस त्यांच्याकडे निर्भयपणे व्यक्त होऊ शकतो.

    महाराष्ट्राला कर्मभूमी मानून निवृत्तीनंतरही नागपूरमध्येच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. कारण त्यांच्या घरच्या संस्कारांना महाराष्ट्रात पोषक वातावरण मिळालं आहे. त्याचं कर्तृत्व बहरून येण्यासाठी तेच महत्त्वाचं कारण असल्याचं उपाध्याय मानतात. त्यामुळे निवृत्तीनंतर प्राध्यापक म्हणून अपुरं राहिलेलं आपलं काम ते समाजप्रबोधनाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत. त्यांची मुलगीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आयपीएस होण्याची तयारी करत आहे. स्पर्धा परीक्षा या फक्त दिसायला अवघड असतात. प्रत्यक्षात मात्र त्याचा अनुभव आपल्याला ज्ञानसंपन्न बनवतो. त्यामुळे आजच्या तरुणांनी देशसेवेची ही संधी गमावू नये, असं उपाध्याय यांना वाटतं.

    कोणतंही काम, मग ते छोटं असो व मोठं… त्या कामावरची तुमची निष्ठा, समस्यांवर मार्ग काढण्याची प्रगल्भता याच्या जोडीला अधिकाराचा सुयोग्य वापर एखाद्या मोठ्या यंत्रणेला बदलायला भाग पडू शकतो. हे उपाध्याय यांच्याकडे पाहून जाणवतं .चांगले विचार, आचार, आणि संस्कार असतील तर एक चांगला समाज बनतो. असा समाज देशाचं भविष्य उज्जवल करतो, अशी उपाध्याय यांची ठाम श्रद्धा आहे. माणूस जन्मापेक्षा कर्माने मोठा होतो, मग कर्मभूमी कोणतीही  का असेना, फक्त मातीत रुजविण्याची आणि बहरण्याची जिद्द हवी. खाकी वर्दीतला भूषणकुमार उपाध्याय नावाच्या मास्तरांना पाहून हे विचार मनोमन पटतात.

  • आवाजाची मनस्पर्शी मुसाफिरी – रश्मी वारंग

    आवाजाची मनस्पर्शी मुसाफिरी – रश्मी वारंग

    आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील लोकांच्या आवडती रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्षं रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे.

    आकाशवाणी हे प्रसारमाध्यमांमधलं एक प्रभावी माध्यम. कितीही नवीन माध्यमांचा शोध लागला तरीही आकाशवाणी किंवा रेडिओ लोकप्रियता कमी झाली नाही. एफएम वाहिन्या सुरु झाल्यानंतर तर या माध्यमाला अजून बहर आला. अशाच एका लोकप्रिय वाहिनीवरची लोकांची रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्ष रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे. आकाशवाणीच्या क्षेत्रातल्या या यशस्वी वाटचालीची सुरुवात रश्मी यांच्या शालेय जीवनापासूनच झाली होती.

    मुंबईतील बोरिवलीच्या योजना विद्यालायच्या त्या विद्यार्थिनी. या विद्यालयात अनेक दिग्गज वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यायचे,. त्यामुळे प्रा.राम शेवाळकर, य.दि.फडके, स.गं.मालशे अशा नामवंतांना ऐकायची संधी त्यांना बालवयातच मिळाली. रश्मी यांच्या आईही शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांचा भाषेचा अभ्यास अगदी पक्का होता. या अभ्यासाच्या जोरावरच त्यांनी शाळेत असतानाच अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. या क्षेत्रातला त्यांचा शाळेनंतरचा प्रवासही काहीसा मजेदार आहे. त्या आठवणी रश्मी सांगू लागतात, ‘मी मुळात काहीही बंडखोर आहे. एकाच चौकटीत राहून आखीवरेखीव काम करण्यापेक्षा नेहमी काहीतरी वेगळं करायचा माझा प्रयत असतो. मला दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के मार्क होते. असे मार्क म्हणजे विज्ञान शाखा असं समीकरण ठरलेलं. मी मात्र हट्टाने कला शाखा निवडली.’ आपल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘खरं तर अकरावी, बारावी ही दोन वर्ष मी काहीही केलं नाही. कारण कॉलेज आणि शाळा यांची विश्व खूप वेगळी असतात. त्यामुळे मी पहिल्या दोन वर्षात अगदी बावरले होते,’ रश्मी प्रांजळपणे सांगतात. बीएच्या प्रथम वर्षाला मराठीच्या प्राध्यापकांनी दिलेल्या प्रोत्सहानामुळे त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. दोन वेळा राज्यस्तरीय पारितोषिकही जिंकली.

    बीएच्या दुसऱ्या वर्षात असताना मराठी साहित्य संमेलन दादरला आयोजित करण्यात आलं होत. तिथे तीन दिवस निवासी स्वयंसेवक म्हणून अगदी उत्साहाने काम केलं. तेव्हा अनेक साहित्यिकांना अगदी जवळून भेटता आलं.’ हे सांगताना रश्मीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. संमेलनात त्याच्यावर जनसंपर्काची जबाबदारी होती, त्यामुळे त्याची पत्रकारितशी ओळख झाली. हे क्षेत्र जाणून घेण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचं रीतसर शिक्षण घेतलं.’ या शिक्षणादरम्यान सामान्य माणूस ते सेलिब्रेटी अशा निरनिराळ्या स्तरांमधल्या लोकांशी संपर्क आल्यामुळे बोलणं आणि त्याद्वारे होणारी अभिव्यक्ती याचं बीज कुठेतरी माझ्यात रुजत गेलं.’ , असं त्या सांगतात. बीएच्या अंतिम वर्षाला मराठी साहित्य हा विषय घेतल्यामुळे त्यामुळे वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना त्यांना हाताळता आलं. थोडक्यात समोर माईक आल्यानंतर श्रोत्यांशी काय बोलायचं या रेडिओ विश्वातील अगदी प्राथमिक समस्येचा प्रश्नच उरला नाही. महाविद्यालयत असताना आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या ‘स्नेहांकित’ नावाचा व्याख्यानाचा कार्यक्रम करत. त्यांनी स्वखर्चाने केलेल्या या प्रयत्नांना त्या वेळी डॉ.प्रकाश बाळ, सुधीर फडके अशा अनेक नामवंतांनी शाबासकी दिली होती.

    कॉलेजमध्ये असताना रश्मी रेडिओवरील ‘युवावाणी’मध्ये कॉफी हाऊस नावाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावयाच्या. पदवीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या एफएम गोल्ड विभागासाठी ऑडिशन दिलं आणि त्यांची निवड झाली. मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांच्या आकाशवाणीवरचा प्रवासही सुरु झाला. तो रंजक प्रवास सांगताना रश्मी सांगतात, ‘एफएम गोल्डवर निवड झाल्यानंतर मी तिथे इंटर्नशिपसाठी जायचे. तेव्हा अनुराग पांडे, लावण्या, अनिरुद्ध, अनुपम सिंग हे सगळे आजचे लोकप्रिय जॉकी तिथे कार्यक्रम करायचे. त्यांना गाण्याची कॅसेट आणून दे, वाजवलेल्या गाण्याची यादी तरी कर अशी अनेक बारीकसारीक काम मी करायचे. हे करत असताना त्याच्या कार्यक्रमांकडे मी बारकाईने बघायचे. मग हळूहळू प्रत्यक्ष कार्यक्रम करण्याकडे मी मोर्चा वळवला. तेव्हा तिथे स्पूल्स म्हणजे कॅसेटच्या तबकड्या असायच्या. त्यावर स्वतःच्या मेहनतीने बसवलेला कार्यक्रम रेकॉर्ड करावा लागायचा. पण त्यात तांत्रिक अडथळे असत. माझ्याही अशा तीन टेप नाकारल्या गेल्या. अडथळ्यांचा वाटलं तरी हा प्रवास खूप आनंदाचा होता.’ आधी एका आरजेसोबत सहकारी म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्यांना आकशवाणीवर स्वतंत्र कार्यक्रम करायला मिळाले अन आजतागायत आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय होत आहेत.

    आकाशवाणीवर जम बसल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा झाली. खरं तर आधीच रश्मी मराठी साहित्यात एमए होऊन, यूजीसीची नेट परीक्षा पास होऊन महाविद्यालयात शिकवत होत्या. सोबत साप्ताहिकांमध्ये लेखनही करत होत्या. मात्र त्या दरम्यान त्यांच्या मुलाचा जन्म झाल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी तीन वर्ष आकाशवाणीव्यतिरिक्त काहीही न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा मुलगा पहिलीला गेल्यानंतर मग त्यांनी पुन्हा आपल्या करियरकडे लक्ष केंद्रित केलं. एक दिवस त्यांचे सहकारी मयूरेश  शिर्के यांनी ते घेत असलेल्या आवाजाच्या कार्यशाळेत शिकवण्याबद्दल सुचवलं. या कार्यशाळेत काही काळ अध्यापनाचा काम केल्यानंतर मयुरेश यांच्यासोबत त्यांच्या ‘खनक ऍडव्हरटायझिंग ‘ मध्ये रश्मी भागीदार झाल्या. २००९ मध्ये त्यांनी खनकतर्फे आवाजांची कार्यशाळा मोठ्या स्तरावर घ्यायला सुरवात केली. या कल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण एकाच कार्यशाळेत सूत्रसंचालन, निवेदन, वृत्तनिवेदन, व्हाईसिंग, डबिंग आणि रेडिओ जॉकी यांचं एकत्रित प्रशिक्षण मिळायला लागले. आबालवृद्धांमध्ये ही कार्यशाळा लोकप्रिय झाली अन  आजही होतेय.

    २०१० सालात मराठी गाण्यांमध्ये लोकप्रियतेबाबत एक वाद झाला होता. एका हिंदी रेडिओ जॉकीने मराठी गाणी कमी लोकप्रिय असतात, असं जाहीर केल्यामुळे अनेक श्रोत्यांनी रश्मी यांना याबाबत काहीतरी करण्यासाठी सुचवलं. रश्मी यांचे रेडिओ माध्यमातलेच सहकारी मयूरेश शिर्के आणि गणेश आचवल यांच्या मनात एक कल्पना आली. त्यानी आपले रेडिओ जगतातले अनुभव शब्दबद्ध करायचं ठरवलं. खरं तर, हे त्या वादावरचं प्रत्युत्तरच होतं . अनुभव शब्दबद्ध झाल्यानंतर त्या पुस्तकाला ‘मनस्पर्शी’ असं नाव देण्यात आलं . ‘मनस्पर्शी’च्या प्रकाशन सोहळ्यावेळी वाचकांना पुस्तकात नेमकं काय आहे. हे कळावं म्हणून लेखकांच्या मुलाखतीचा छोटा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावेळी उपस्थित असलेल्या सगळ्यांच ही कल्पना आवडली. तेव्हा मग आम्ही मनस्पर्शीचे जाहीर कार्यक्रमही घ्यायला लागलो. अर्थात, हे सर्व श्रोत्यांच्या प्रेमामुळेच शक्य झाल्याचं त्या कृतज्ञतेने सांगतात. आकाशवाणी, आवाजाची कार्यशाळा, खनक, मनस्पशीं यांच्यासोबत त्या आता रेडिओ प्रमोशनही करतात.

    आजही रश्मी यांची घोडदौड सुरु आहे. काही जणांना बहुआयामी कर्तृत्वाची आस असते, अशांपैकी एक रश्मी वारंग आहेत. आपल्या शैक्षणिक जीवनातही त्या बीए आणि एमए पदवी परीक्षांमध्ये सुवर्ण पदक विजेत्या आहेत. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा तोल सांभाळत त्यांनी आजवर वाटचाल केली आहे.

  • लहाने नावाचा मोठा माणूस

    लहाने नावाचा मोठा माणूस

    आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केले. समोर अडचणीही बऱ्याच आल्या, पण कुणीही त्यांना  रोखू शकलं  नाही. प्रतिकूल परिस्थितीतही पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केवळ स्वतःचच नाही, तर आपल्यासोबत अनेकांचं आयुष्य उजळून टाकलं आहे.

    आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल, तर शिक्षण घ्यायलाच हवं. याची जाणीव त्यांना त्या लहान वयात होती. त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते,.पण म्हणून डॉक्टर वगैरे होणं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं.

    खरं  डॉ.लहाने यांना अस्थिरोगतज्ञ किंवा बालरोगतज्ञ व्हायचं होतं. पण नेत्रचिकित्सा शास्त्रात ७०० रुपये स्टायपेंड मिळत होता, म्हणून त्यांनी हा प्रवेश स्वीकारला. अर्थात त्यांचा हा निर्णय सर्व नेत्र रुग्णांसाठी वरदानच ठरला.

    लाखो लोकांना दृष्टीचं दान देणारे दृष्टिदाते म्हणून पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांची ओळख आहे. खरं तर हे एक वाक्यच त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी पुरेसं आहे. पण म्हणून त्याची ओळख एवढीच नाही. प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता आशावादी राहणारे, प्रत्येक संधीचं सोनं करणारे आणि आज एवढ्या मोठ्या पदावर असूनही सामान्य वाटणारे, सामान्यांमध्ये सहज वावरणारे, रुंगणांच्या व्यथा जाणून घेऊन परिस्थिती सुधारावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे… असं बरंच काही डॉ.लहानेविषयी सांगता येईल.

    लातूर जिल्ह्यातील माथेगावमधील एका गरीब शेतकरी कटुंबात डॉ.लहाने यांचा जन्म झाला. गावातील इतर मुलांप्रमाणे ते आपल्या आईवडिलांना शेतीच्या आणि इतर कामात मदत करत होते. सकाळ-संध्याकाळ गुरं राखण्याचं काम त्यांचं असे. अशातच योगायोगाने त्यांचा शाळेत प्रवेश झाला. याविषयी सांगताना ते बालपणीच्या आठवणीत रमतात, ‘मी पाच वर्षांचा होतो तेव्हा. आमच्या गावात प्राथमिक शाळा सुरु झाली. शाळा चालविण्यासाठी किमान दहा मुलांची आवश्यकता होती आणि मी त्या वयोगटात मोडत होतो, म्हणून माझा शाळेत प्रवेश झाला.’ सकाळी गुरे राखून शाळेत जायचं आणि संध्याकाळी शाळातून परतल्यावर पुन्हा गुरे राखायची, असा त्यांचा दिनक्रम असे. त्यात सुट्टीच्या दिवशी आणि गरज पडली तर शाळेला दांडी मारूनसुद्धा त्यांना वडिलांना शेतीच्या कामात मदत करावी लागत असे. शिवाय घरी कंदील तर सोडाच चिमणीही नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अभ्यास करणं, अशक्य होतं. मग दिवसा इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडत अभ्यास करणे… अशा परिस्थितीतही ते चौथीला बोर्डात पहिले आले होते. मित्र आणि शिक्षकांच्या मदतीनेच हे शक्य झाल्याचं ते आवर्जून सांगतात.

    तरीही त्याच्यासाठी पाचवीचा प्रवेश सोपा नव्हता. ‘आईबाबांना माझी शिक्षणासाठीची ओढ कळत होती. आईचा मला त्यादृष्टीने पूर्ण पाठिंबाही होता. माझ्या वह्या-पुस्तकांसाठी आईने प्रसंगी घरात आलेला माल चोरून विकल्याचेही मी पहिले होतं, बाबाना यांची जाणीव नव्हती असं नाही, पण घरचा थोरला मुलगा म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, हे विसरून त्यांना आणि मलाही चालण्यासारखं नव्हतं. म्हणूनच शेतीच कामं संपल्यावर तब्बल तीन महिने उशिराने का होईना पण त्यांनी मला पाचवीत प्रवेश घेण्याची परवानगी दिली.’ हुशार विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांनीही त्यांना प्रवेश दिला. इतकेच नाही तर बुडालेला अभ्यासही विशेष शिकवण्या देऊन करवून घेतला. परिणामी, सातवीतही ते बोर्डात पहिले आले.

    आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल, तर शिक्षण घ्यायलाच हवं. याची जाणीव त्यांना त्या लहान वयात होती. त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते, पण म्हणून डॉक्टर वगैरे होणं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. याविषयी हसतच ते सांगतात, शिक्षण ‘शिक्षण घेतलेला शिक्षक होतो, एवढंच  माहित होतं. त्यामुळे शिक्षक होणं हेच कुठेतरी आयुष्याचं  ध्येय बनलं होतं. पण मी दहावीत असताना शेजारच्या लहानेवाडी गावातला कुणी एक मुलगा डॉक्टर झाला आणि  त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. तेव्हा शिकून डॉक्टरही  होता येतं  याची मला जाणीव झाली आणि नकळत आपण डॉक्टर व्हावं, असं मनाशी पक्कं  झालं.’

    त्यांच्या या जबर इच्छाशक्तीला गरिबी किंवा अन्य कोणत्याही समस्या रोखू शकल्या नाहीत. त्यांनी आपल्या भावंडानाही शिक्षणासाठी प्रवृत्त केले. शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी औरंगाबादच्या वैजनाथ महाविद्यालयात वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. त्यासाठीच्या प्रवेश परीक्षेत ते मराठवाड्यात दहावे आले होते. प्रवेश तर मिळाला. पण फी आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. शिक्षक आणि मित्रांनी इथेही त्यांना खूप मदत केली. काहींनी पुस्तकं घेऊन दिली. काहींनी कपडे-बूट, तर काहींनी फी भरण्यासाठी रक्कम जमा करून दिली. दरम्यानच्या काळात त्यांचा सुलोचना मुंढे यांच्याशी विवाह झाला.

    डॉ.लहाने सांगतात, आमदार रघुनाथ मुंढे याची एकूक्ती एक कन्या, सुलोचनाने आमच्या परिस्थितीशी आनंदाने जुळवून घेतलं.  शिवाय तिच्या वडिलांमुळे मलाही थोडा आधार वाटू लागला होता.’ पण ही परिस्थिती काही जास्त वेळ राहिली नाही. नेमक्या परीक्षेच्या दिवशी एका अपघातात त्याच्या सासऱ्यांच्या मृत्यू झाला आणि डॉ.लहानेंवर दोन्ही घराची जबाबदारी येऊन पडली. खरं डॉ.लहाने यांना अस्थिरोगतज्ञ किंवा बालरोगतज्ञ व्हायचं होतं. पण नेत्रचिकित्सा शास्त्रात ७०० रुपये स्टायपेंड मिळत होता, म्हणून त्यांनी हा प्रवेश स्वीकारला. अर्थात त्यांचा हा निर्णय सर्व नेत्र रुग्णांसाठी वरदानच ठरला.

    सर्वकाही सुरळीत वाटत असताना डॉ.लहाने यांचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यांच्या आईने त्यांना आपले मूत्रपिंड दिले. गरिबी अगदी जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक भान होतेच, पण या घटनेने त्यांना अधिकच भारावून टाकलं. समाजासाठी आपणही काही  काही केलं पाहिजे ही त्यांच्या मनातील इच्छा अधिक प्रबळ झाली.हे भान राखत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ठाणे, पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणू, धुळे, नंदुबार येथील हजारो आदिवासी पाड्यांमध्ये शस्त्रक्रियेसाठी अनेक शिबिरं आयोजित केली आहेत. आनंदवनातील हजारो कुष्ठरोग्यांवरही मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. पारंपारिक शस्त्रक्रियेनंतर रुंगणाला किमान ४० दिवस विश्रांती घ्यावी लागते. स्वतः ग्रामीण भागातून आल्यामुळे, या ग्रामीण लोकांचा एक-एक दिवस किती मोलाचा असतो याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच त्यांनी बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णांना नवी दृष्टी तर मिळालीच,पण आर्थिक घडी विस्कटत नसल्यामुळे रुग्ण शस्त्रक्रियेसाठीही तयार होऊ लागले. असा हा विचारवंत डॉक्टर आहे. गोरगरिबांसाठी अशा अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केल्या आहेत. विज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांचे विचार अत्यंत पुरोगामी आहेत. समाजातल्या सर्व स्तरांमध्ये देहदान, अवयवदान यांच्याविषयी जागरूकता वाढावी असं त्यांना प्रखरतेने वाटते.

    डॉ.तात्याराव लहाने सद्य मुंबईतील जमशेदजी जिजीभॉय (जे.जे.) रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी कार्यरत आहेत. आतापर्यंत सुमारे १ लाख ४७ हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.लहाने यांनी जे.जे. सारख्या सरकारी रुग्णालयाच्या पूर्णतः कायापालट केला आहे. २००७ मध्ये डॉ.लहाने यांनी आपली एक लाखावी शस्त्रक्रिया पार पाडली. त्यांचा हा विक्रम पाहून  २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केली. एका सरकारी रुग्णालयाला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचं आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या स्वीकारलं  आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यामागे एक वेगळा दृष्टिकोन आहे.

    पदमश्री डॉ.तात्याराव लहाने

    १९८१ : मराठवाडा विद्यापीठातून वैद्यकीय पदवी.

    १९८५ : ऑप्थोमाॅलाजीमध्ये एम.बी.बी.एस.

    १९९४ : जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख पदावर नियुक्ती.

    २००४ : जे.जे मध्ये रेटिना विभागाची सुरुवात.

    २००७ : मोतीबिंदूवरील एक लाख शस्त्रक्रिया यशस्वी.

    २००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. २०१० : जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता पद.

  • मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी

    मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी

    सन १९८९ पर्यंत पाच रुपये रोजाने मोलमजुरी करणाऱ्या आणि आज सीईओ असलेल्या ज्योती रेड्डी यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास करणारा आहे.

    अमेरिकेतील कीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीच्या थक्क करणारा तर आहेच, परंतु हे शब्द तंतोतंत खरे

    ‘एव्हरी सक्सेसफुल स्टोरी हॅज अ पेनफूल बिगिनिंग ॲण्ड एव्हरी पेनफूल बिगिनिंग हॅज अ सक्सेसफुल एण्डिंग.’

    हे प्रेरणादायी शब्द आहेत माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे. हे केवळ एखादे विधान किंवा जीवनाचे तत्त्वज्ञान नसून, तुमच्या मनात प्रश्नाचे जे काहूर उठते त्याला मिळालेले भयप्रद, कनवाळू, सुखदायक आणि विदवत्तापूर्ण उत्तर असते. जीवनाच्या प्रारंभीच्या टप्प्यात ज्या वेदना किंवा धक्के सहन करावे लागतात त्याला दिलेला तो योग्य आणि अचूक प्रतिसाद असतो. ‘नो पेन्स, नो गेन्स’ म्हटले जाते ते उगाचच नव्हे, कोणताही मनुष्य जन्माला येत असताना त्याच्या मातेलाही प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. म्हणजेच जन्मापासूनच हा प्रवास सुरू होत असतो. ‘जर तुम्ही गरीब कुटुंबात जन्माला आला, तर ती तुमची चूक नसते. मात्र, तुम्ही गरीब म्हणूनच जग सोडून गेलात तर ती तुमची चूक असते’, असे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

    आज ज्योती रेड्डी प्रचंड पैसा कमावत असल्या तरी भारतीय समाजातील तळागाळाशी असलेली आपली नाळ त्यांनी अजूनही तुटू दिली नाही. हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. ज्योती रेड्डी यांचा आतापर्यंतचा प्रवास विस्मयकारक आणि थोड्याफार अडचणी आल्यामुळे खचून जाण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. ‘शून्यातून विश्व निर्माण करणे’, हे वाक्य ज्योती रेड्डी यांनी सार्थकी लावले आहे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो त्या शिखरापर्यंतच्या प्रवासात अनेक खाचखळगे आणि विघ्नं येतात. परंतु, त्या सर्व आव्हांनावर मात करूनच तिथे पोचावे लागते.

    शेतात मोलमजुरी करणाऱ्या एक साधारण महिलेने केवळ कौटुंबिकच नव्हे, तर आर्थिक अडचणींवर मात करून आपले स्वप्न कसे साकारले, हे जाणून घेणे खूपच प्रेरणादायी आहे. १५ दशलक्ष डॉलर्सच्या आयटी कंपनीच्या सीईओ ज्योती रेड्डी यांनी आपले यश स्वत: किंवा कुटुंबापुरते मर्यादित ठेवले नाही. एवढे यश संपादन केल्यानंतरही पाय जमिनीवरच ठेवत आज त्या आपली सामाजिक जबाबदारीही तेवढीच गांभीर्याने पार पाडत आहेत. ज्योती रेड्डी यांच्या यशस्वी प्रवासाचा विचार करायचा झाल्यास त्या जी आर्थिक मदत करतात तो फार मोठा मुद्दा नसून, असंख्य लोकांना आव्हानांचा सामना जिगरबाजपणे कसा करायचा, याची प्रेरणा त्यांच्यापासून मिळते.

    आता अनेक महिला ज्योती रेड्डी यांना आदर्श मानून वाटचाल करत आहेत. या महिला आपली क्षमता ओळखून ज्योतीसारखे यश मिळविण्याचा प्रयत्न करताहेत. ज्योतीने आज जे यश मिळविले आहे त्याचा प्रवास जाणून घेतल्यास बहुतांश लोकांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

    अनिला ज्योती रेड्डी यांचा जन्म वारंगल जिल्ह्यातील हनुमाकोंडा येथे झाला. आणिबाणीच्या काळात रोजगार गमावलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेली ज्योती ही चार भावंडांपैकी सर्वात मोठी. तिचे वडील नंतर लष्करात दाखल झाले. परंतु, कुटुंबाच्या आकर्षणामुळे ते फार काळ टिकू शकले नाही. परंतु त्यांनी जे लष्करी प्रशिक्षण घेतले, त्यातून त्यांचा जो दृष्टिकोन विकसित झाला तो वारसा म्हणून ज्योतीला मिळाला. ज्योतीच्या कुटुंबाला दोनवेळचे जेवणही सहजासहजी नशिबात नव्हते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ज्योतीला हनुमाकोंडा येथील बालसदनात टाकावे लागले.

    इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत ज्योती कुटुंबापासून दूर बालसदनात राहिली. कुणीतरी येईल आणि आपली मदत करेल, या आशेवर ती दिवस काढत होती. विशेष करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, कारण तिचे ब्लँकेट फाटलेले असल्यामुळे खूप थंडी वाजायची. बहुदा असे दिवस काढल्यामुळे तिला ती आत्मशक्ती मिळाली असावी. ज्योती दर उन्हाळ्यात आपल्या गावी जात असे. बालसदनात असताना ज्योती वॉर्डनच्या घरात राहायची आणि घरकाम केल्यानंतर तिला तिथे जेवण मिळत असे.

    ज्योतीने दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची तिची खूप इच्छा होती. परंतु, तिच्या मातापित्याच्या मनात काही वेगळेच होते.

    ज्योती अवघी 16 वर्षांची असतांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पालकांनी संगा रेड्डी यांच्याशी तिचा विवाह लावून दिला. देशाच्या ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. मातापिता मुलीला ओझं समजतात आणि शक्य तेवढ्या लवकर विवाह करून हे ओझं हलकं करण्याचा त्याचा प्रयत्न असतो विवाह झाला त्यावेळी ज्योती अबोध होती. आणि वैवाहिक जीवनाबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. काळ पुढे सरकत गेला. १८ व्या वर्षी ज्योती दोन मुलींची आई झाली. मात्र दोन्ही मुलींच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि देखभाल करणेदेखील तिला शक्य होत नव्हते.

    मात्र, ‘व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे’, याप्रमाणे मुलीच्या गरजा भागविण्यासाठी तिने सासू आणि पतीसोबत शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला पाच रुपये रोजी मिळत होती. परंतु, ज्योती ज्या निष्ठेने शेतात काम करायची त्यामुळे तिच्यासोबत काम करणारे अनेक जण प्रभावित झाले. या तिच्या वृत्तीमुळेच शेतीमधील बारीकसारीक गोष्टी तिला जाणून घेता आल्या. १९८६ ते १९८९ अशी तीन वर्ष ज्योतीने शेतात मोलमजुरी केली. परंतु, १९८९ मध्ये अचानक तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

    प्रौढांना पायाभूत शिक्षण देण्यासाठी नेहरू-युवक केंद्राने गावी एक रात्रशाळा सुरु केली. गावात कुणीही पदवीधर नव्हते आणि ज्योती हा एकच पर्याय असल्याने केंद्राने ही जबाबदारी तिच्या खांद्यावर सोपविली. याचे तिला दरमहा १५० रुपये देण्याचे निश्चित झाले. ज्योती शेतात मोलमजुरी करणाऱ्या सर्वांना सायंकाळी केद्रात आणत असे आणि अनोख्या पद्धतीने त्यांना मूलभूत शिक्षण देण्यास तिने सुरुवात केली. ज्योती ज्या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवत  होती. त्यामुळे केंद्र संचालक खूपच खुश झाले आणि तिची हनुमाकोडा येथे मंडल प्रेरक म्हणून नियुक्ती झाली.

    मंडल प्रेरक या नात्याने वारंगल जिल्ह्यातील सर्व केंद्रांना तिला भेट द्यावी लागे. यादरम्यान तिला शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आणि उच्च शिक्षणाशिवाय आपण जीवनात पुढे काहीच करू शकणार नाही, याची तिला जाणीव झाली, हे काम करत असतानाच ज्योतीने आंबेडकर खुल्या विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबाबत तिची उत्कट इच्छा बघून विद्यापीठातील अधिकारीदेखील प्रभावित झाले. त्यानंतर ज्योतीने अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.एड. केले आणि सरकारी शिक्षिका झाली. परंतु, यानंतरही तिच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. तिला कुटुंब आणि समाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पती आणि मुलींसह गाव सोडून कामाच्या ठिकाणी राहणे आणि काम, घर यांचे संतुलन साधताना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे तिला कमाईचे दुसरे पर्यायदेखील शोधावे लागले. ग्रामीण भारतातील जवळपास प्रत्येक महिलेला एव्हरेस्टपेक्षाही मोठ्या असलेल्या या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या अडचणीमुळे डगमगून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ज्योतीमध्ये असलेल्या उर्जेमागे संयम, चिकाटी आणि कटिबद्धता या गुणांचे फार मोठे योगदान आहे.

    इथे ज्योतीच्या वेदना संपल्या असे जर वाटत असेल तर त्यात प्रेरणादायी काहीच नाही, असे म्हणावे लागेल. ज्योती विविध शाळांची निरीक्षक म्हणून काम करत असताना अमेरिकेत स्थायिक झालेली तिची एक नातेवाईक गावी आली. ती गावात असेपर्यंत ज्योती तिच्यासोबत होती आणि या काळात तिच्या जीवनशैलीत झालेला बदल तिने जाणून घेतला. ज्याप्रकारे तिची अमेरिकेतील नातेवाईक आपल्या मुलींवर पैसा खर्च करत होती ते बघून अपल्या मुलींनाही या गोष्टी मिळाव्या, असे तिला मनापासून वाटू लागले. अमेरिकेत जाऊन पैसा कमावला तर आपल्या मुलींचेही भविष्य उज्ज्वल करता येऊ शकते. असाही विचार तिच्या मनाला स्पर्श करून गेला. तुझ्यासारखी आक्रमक महिला अमेरिकेत सहज स्थायिक होऊ शकते, असे तिने ज्योतीला सांगितले. झाले, ज्योतीने यापासून प्रेरणा घेत त्या दिशेने वाटचाल सुरू केली, जराही वेळ न दवडता तिने कॉम्प्युटर  सॉफ्टवेअरच्या क्लासेससाठी नोंदणी केली. पत्नीने बाहेर राहू नये असे पतीला वाटत असल्यामुळे ज्योतीला दररोज हैदराबाद येथे येणेजाणे करावे लागत असे. अमेरिकेला जाण्याचा जणू निर्धारच तिने केला होता. परंतु, पतीला यासाठी तयार करताकरता तिच्या नाकी नऊ आले. स्वत:ची कार हे ज्योतीचे सर्वात मोठे स्वप्न होते आणि अमेरिकेत जाऊनच ते पूर्ण होऊ शकते, असेच तिला वाटायचे. म्हणूनच तिने व्हिसा आणि पासपोर्टसाठी पैसाही जमविण्यास सुरुवात केली. प्रारंभी तिला अनेकदा अपयश आले, मात्र, ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याप्रमाणे अखेर तिला प्रवासी व्हिसा मिळाला. थोडाफार पैसा आणि स्वप्नांच्या तिजोरीसह तिने अमेरिकेकडे प्रयाण केले.

    अमेरिकेच्या भूमीवर उतरताच त्याठिकाणी स्थायिक होणे वाटते तेवढे सोपे नाही, याची जाणीव तिला लगेचच झाली. आपल्याला जे लोक आसरा देतील, अशी ज्योतीला अपेक्षा होती त्यांनीच नेमकी पाठ फिरविली. सोबत आणलेला पैसा संपत आला होता. म्हणून तिने न्यूजर्सी येथील एका व्हिडिओ शॉपमध्ये सेल्सपर्सन म्हणून नोकरी पत्करली. त्यावेळी ती एका गुजराती कुटुंबाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. या शॉपमध्ये काम करत असतानाच वारंगल भागातीलच एका भारतीयाने तिला बघितले आणि आपल्या भावाच्या कंपनीत नोकरीसाठी तिची शिफारस केली. प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला नोकरी मिळाली. त्यानंतर आयसीएसए या प्रख्यात कंपनीने तिला आकर्षक वेतनासह नोकरीचा प्रस्ताव दिला. परंतु, व्हिसाला मान्यता नसल्यामुळे पुन्हा ज्योतीला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने एच-१ व्हिसासाठी अर्ज केला. यासाठी तिला आयसीएसएची नोकरी सोडावी लागली व एच-१ व्हिसा मिळेपर्यंत पाच डॉलर्स प्रतितास याप्रमाणे काम करावे लागले.व्हिसा स्टॅम्पिंगसाठी ज्योती मेक्सिकोला गेली. व्हिसा मिळण्यासाठी जे दिव्य पार करावे लागले त्याकडे बघता स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना व्हिसा मिळण्यासाठी मदत करण्याचा विचार प्रथमच तिच्या मनात आला आणि त्याच ठिकाणी कीज सॉफ्टवेअरची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. हळूहळू ज्योतीने सॉफ्टवेअर सोल्युशन्स देण्यासह रिक्रुटेंमट आणि इतर मदतही उपलब्ध करून दिली. मे २००० मध्ये ज्योती अमेरिकेत आली आणि २००१ साली ती व्यावसायिकसुद्धा झाली. आपल्या एका नातेवाईकालाच तिने भागीदार बनविले.

    अशाप्रकारे कठोर मेहनत, कटिबद्धता आणि निष्ठा या जोरावर ज्योतीने आपल्या स्वप्नांना पंख देत यशोशिखर गाठले, आपली मुलं आणि इतर नातेवाईकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, इतके पैसे तिने कमावले आहेत. तिच्या दोन्ही मुलींनी अमेरिकेतन प्रतिष्ठित विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घेतले. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या दोन्ही मुली विवाह करून अमेरिकेत स्थायिक झाल्या. आपल्या मुलींना चांगले जीवन जगता येईल हे सुनिश्चित करण्याचे ज्योतीचे स्वप्न साकार झाले. मुलीदेखील खूप मेहनती आहेत आणि वेळ मुळीच वाया घालवत नाहीत, असे ती अभिमानाने सांगते. आज ज्योतीकडे शूज आणि चपलांचे २०० जोड आहेत ड्रेसवर मॅच होईल अशी जोडी शोधण्यासाठी तिला १५ ते २० मिनिटे लागतात. प्रारंभी माझ्याकडे फक्त दोनच साड्या होत्या. तिसरी साडी घेण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले आणि १३५ रुपयांची ती तिसरी साडी आजही जपून ठेवली आहे, असे ती सांगते. तिच्या लहान मुलीच्या विवाहासाठी ज्योतीने १.६० लाख रुपयांची निळ्या रंगाची साडी खरेदी केली. ज्योतीची अमेरिकेत सहा आणि भारतात दोन घरे आहेत. स्वत:ची कार चालविण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले असून, ती मर्सिडिज बैंजमधून फिरते. डोळ्यावर गॉगल आणि केस मोकळे असतात.

    वारंगलच्या खेड्यापासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना ती धन्यवाद देते आणि इथपर्यंतच्या वाटचालीत सहन कराव्या लागलेल्या वेदना ती कधीही विसरत नाही. त्यामुळेच तिने गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा ज्योतीचा निर्धार आहे. याच उच्च विचारांमुळे मानवतेची सेवा करण्याची तिची इच्छाशक्ती जागृत होते.

    एक महिला आपल्या मेहनतीच्या जोरावर अमेरिकेला गेली, खूप पैसा कमावला आणि लोकांनी त्याला यश म्हणावे, एवढ्यापुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही. ज्योतीचा दृष्टिकोन आणि साधेपणा यामुळे लोकांनी तिला जवळ केले, ज्योती आपले मूळ कधीही विसरली नाही. जेव्हा जेव्हा ती भारतात येते तेव्हा ती बालसदन, वृद्धाश्रमांना भेट देते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. त्याठिकाणी असलेल्यांना आर्थिक मदत करते. महिला महाविद्यालयांना भेटी देऊन इतरांना प्रेरित करण्याचाही तिचा प्रयत्न असतो. आज जे काही यश मिळविले ते डोक्यात न जाऊ देता ज्योतीने हृदयात साचवून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळात आसरा आणि मार्गदर्शन करून अनेक भारतीयांना अमेरिकेत स्थायिक होण्यास ज्योतीने मदत केली आहे.

    ज्योती रेड्डीची ही अद्‌भुत कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे ज्योतीचे प्रेरणास्थान होते. वयाच्या ११ ते १६ वर्षादरम्यान मुलगा किंवा मुलगी आपले व्यक्तिमत्व घडवत असतो, असे डॉ. कलाम यांचे शब्द आजही तिच्या कानावर पडतात. ज्योतीचा हा प्रवास इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. अडचणी आल्या तरी खचून न जाता मेहनत व निष्ठेने काम करत राहा, यश हमखास मिळते, हाच संदेश ज्योतीच्या जीवनप्रवासातून मिळतो!

  • अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू

    अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू

    ज्या कामावर आपले प्रेम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगातही घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य होते, हे बंगळुरूच्या रमेश बाबूने आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे.

    व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये आव्हानं ही येणारच. मात्र, आव्हानाचे संधीत रुपांतर करून त्याचा धैयाने सामना केल्यास हमखास यश मिळते, असा कानमंत्र रमेशने दिला आहे.

    तुमच्याकडे दूरदृष्टी असेल, तुम्ही प्रामाणिक असाल आणि कठोर मेहनत करण्याची तुमची तयारी असेल, तर जीवन किंवा व्यवसायात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे व्यावसायिक वर्तुळात नेहमीच म्हटले जाते. त्यात तथ्यही आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेत यशोशिखर गाठले आहे, अशी असंख्य उदाहरणं देता येतील. अशातीलच उदाहरणं ही इतरांचे प्रेरणास्थान बनतात आणि त्यातूनही अनेक जण जीवनात यशस्वी होतात.

    देशाचे आयटी हब म्हणून नावारुपास आलेल्या बंगळूरु शहरात राहणाऱ्या रमेश बाबू हा खऱ्या अर्थाने एक स्टार आहे. रमेश बाबूचे शहरात केशकर्तनालय (सलून) आहे. परंतु आज तो असाधारण संपत्ती असलेला साधारण व्यावसायिक आहे. रमेश बाबू आज अब्जाधीश असून, त्यांच्याकडे ६७ वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे २०० कार आहेत. मोठमोठे राजकीय नेते, लष्करी अधिकारी आणि सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सारखे दिग्गज कलावंत रमेश बाबूंचे ग्राहक आहेत. जवळपास दररोज रमेश बाबू आपली ३.१ कोटींची अलिशान सेल्स रॉयसी घोस्ट चालवत कामाच्या ठिकाणी येतो.

    ज्याप्रमाणे एखाद्या ग्राहकाच्या केसांना अगदी मन लावून आकार देतो. अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या रॉयसीचा डॅशबोर्ड अत्यंत काळजीपूर्वक हाताळतो, असे रमेश सांगतो. विशेष म्हणजे अशी लक्झरी कार असलेल्या बंगळुरू शहरात फक्त पाच व्यक्ती आहेत आणि रमेश बाबू हा त्यापैकीच एक. अतिशय कष्टाने कमावलेल्या पैशातून बाबूने ही सेल्स रॉयल्सी खरेदी केली आहे. केशकर्तनालयाच्या उत्पन्नातून जे पैसे वाचले त्यातून रमेशने १९९४ साली एक मारुती ओमनी खरेदी केली. केशकर्तनालयात ग्राहकांच्या केसांना विविध आकार देतानाच रमेशने ओमनी भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. ही कल्पना रमेशची आई ज्यांच्याकडे घरकाम करायची त्या नंदिनी अक्का यांनी त्याला सुचविली होती.

    त्यानंतर आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या रमेशच्या जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने घडत गेली आणि मग खऱ्या अर्थाने इतिहास लिहिला गेला. २००४ उजाडता उजाडता रमेशचा टॅक्सी व्यवसाय चांगलाच बहरला. त्यावेळी सात नियमित कार रमेशकडे होत्या. गेल्यावर्षी मात्र त्याच्याकडे असलेल्या कारची संख्या तब्बल २०० झाली आणि यामध्ये ७५ वेगवेगळ्या प्रीमियर कार आहेत. यामध्ये मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी काही अलिशान लक्झरी व्हॅन्स आणि अर्थातच या सर्वांवर मात करणारी रोल्स रॉयसी घोस्ट. रमेशने २०११ साली ही घोस्ट खरेदी केली.

    स्वकष्टाने जीवनात यश कमावणारा पुरुष किंवा स्त्री प्रमाणे रमेश बाबूने फक्त केशकर्तनालयातून मिळणाऱ्या उत्पन्नावर हा सर्व डोलारा उभा केला, असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. केशकर्तनालयातून त्याचे उत्पन्न फारसे नसले तरी कार भाड्याने देण्याच्या म्हणजेच टॅक्सीच्या व्यवसायातून रमेश भरपूर उत्पन्न कमावतो आणि त्यातूनच आज त्याचे नशीब बदलले. म्हणूनच आज अब्जाधीश असलेला रमेश बाबू हा देशातील सर्वांत श्रीमंत हेअरस्टाईलिस्ट पैकी एक आहे. रमेश बाबूला फॅन्सी कार जवळ बाळगण्याची खूप हौस आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक कारची खूपच काळजी घेतात.

    अर्थात रमेश बाबूचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर असाच आहे. परंतु आतापर्यंतच्या जीवनप्रवासात आलेल्या कोणत्याही संकटामुळे खचून न जाता रमेशने धैर्याने प्रत्येक आव्हान पेलले आणि म्हणूनच आज तो यशाच्या शिखरावर विराजमान आहे.

    रमेश आता आपल्या ताफ्यात स्टेच लिमोजची भर घालण्यात उत्सुक आहे. रमेश आपल्या रोल्ससाठी दरदिवसाला ७५ हजार रुपये भाडे आकारतो आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे कलावंत हे त्यांचे विशेष ग्राहक आहेत. रमेशकडे फक्त कारचाच ताफा आहे, असे नसून त्याच्याकडे १६ लाखांची महागडी सुझुकी इंटूडर बाईक पण आहे. रमेश ही बाईक साधारणपणे आठवड्याच्या शेवटी वापरतो आणि ती त्याने खाजगी वापरासाठीच ठेवली आहे.

    विशेष म्हणजे स्वकष्टाने यश मिळवत अब्जाधीश झाल्यानंतरही रमेशचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. केशकर्तनालयातील आपल्या कौशल्याचा रमेश अजूनही उपयोग करतो आणि प्रत्येक ग्राहकाकडून फक्त १०० रुपये घेतो. जोपर्यंत हातात बळ आहे, तोपर्यंत हे काम सुरुच ठेवणार असल्याचे रमेशने स्पष्ट केले. आज देशभरात एक अब्जाधीश न्हावी म्हणून नावरुपास आल्यानंतरही रमेशला आपल्या भूतकाळाची आठवण आहे.

    संयम, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कठोर मेहनत या गुणांमुळेच रमेश आज यशोशिखरावर आहे. मला जे योग्य वाटले तेच मी प्रामाणिकपणे केले आणि हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे रमेशने हसतहसत सांगितले. रमेशचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपल्यापैकी अनेक जण यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करू शकतो, एवढे निश्चित! १९७९ साली रमेश फक्त नऊ वर्षाचा असताना छोटेसे सलून चालविणारे त्याचे वडील स्वर्गवासी झाले. लहान रमेशसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडिलांनी मागे सोडलेले सलूनचे दुकानच फक्त होते. मात्र, रमेश लहान असल्याने आईने ते सलून पाच रुपये रोज याप्रमाणे भाडेतत्त्वावर दिले आणि मुलांचे पालनपोषण करण्यासाठी दुसरीकडे घरकाम करण्यास सुरुवात केली.

    रमेशच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच पैशावर चालत असे. परंतु, नंतर काकांसोबत वाद झाल्याने त्याने कुटुंबाचे सलून सोडले. शिक्षणाला प्राधान्य दे, या आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत रमेशने रात्री उशिरापर्यंत काम करून आपले कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यशही मिळाले. १९९१ साली रमेशने ‘इनर स्पेस’ नावाचे स्वत:चे सलून सुरु केले आणि तिथूनच त्याचा उत्कर्ष सुरू झाला. लवकरच शहरातील उच्चभ्रू लोकांमध्ये त्याचे सलून लोकप्रिय होत गेले. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नापैकी जे पैसे वाचले त्यातून रमेशने एक मारुती ओम्नी घेतली आणि भाडेतत्त्वावर देण्यास प्रारंभ केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि रमेशने हळूहळू सहा ते सात कार खरेदी केल्या.

    अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या रमेशने २००४ साली आपल्या ताफ्यात ४० लाखांची एक लक्झरी कार खरेदी केली. त्यावेळी ४० लाख ही खूप मोठी रक्कम होती. रमेशच्या या अलिशान कारलाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने आणखी काही कार खरेदी केल्या. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची वृत्ती, नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे आणि आपल्या प्रत्येक निर्णयाबाबत प्रचंड आत्मविश्वास असलेल्या रमेशचा टॅक्सी व्यवसाय चांगलाच बहरला. मात्र, आतापर्यंतच्या प्रवासात रमेशला अनेक अडथळे पार करावे लागले, अनेक आव्हानं आणि संकटेही आली. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे असलेल्या वाहनांच्या ताफ्यामुळे त्याला तीन कोटी इतका पथकर भरावा लागला. दोन अधिक दोन चार, असे करत त्याने ही रक्कम चुकती केली. उर्वरीत काही रक्कम वर्षभरात भरण्याचे आश्वासन रमेशने दिले आहे.

  • बाकावर आयएएस कोरणारी अदीला

    बाकावर आयएएस कोरणारी अदीला

    ‘मुस्लिम समाजात मुलींना शिक्षण घेऊन स्वतंत्र होणं तसं असामान्यच. परंतु, माझे वडील वेगळे होते आणि त्यांच्या दृष्टीने शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. मलाही राष्ट्र उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा होता आणि एक प्रशासकीय अधिकारी (आयएएस) होऊन मी सकारात्मक योगदान देऊ शकते’, हे शब्द आहेत २९ वर्षीय आयएएस अधिकारी अदीला अब्दुल्लाचे.

    शाळेत असताना मी डेस्कवर ‘आयएएस’ हे तीन शब्द कोरायची आणि माझी सुप्त इ्च्छा व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग होता. मला राष्ट्र उभारणीत योगदान करण्याची मनोमन इच्छा होती आणि आयएएस अधिकारी झाल्यास यामध्ये सकारात्मक योगदान देऊ शकीन, असं मला सारखं वाटायचं.

    मुस्लिम मुलींना शिक्षण किंवा कामासाठी प्रोत्साहन न मिळणाऱ्या केरळच्या मलाबार परिसरातील एका छोट्या खेड्यातील मुस्लिम मुलगी अदीला. आपल्या यशस्वी प्रवासाबाबत माहिती देताना ती म्हणाली, केरळच्या कोझिकोडजवळील कुट्ट्यावाडी गावात मी लहानाची मोठी झाले. माझी आई शाळेत शिक्षिका होती. माझं प्राथमिक शिक्षण तेथेच झालं. त्यानंतर मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळेत शिकावं, अशी वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी मला कोझिकोड येथील निवासी शाळेत टाकलं. माझा मोठा भाऊ-बहिणही आधीपासूनच निवासी शाळेमध्ये होते. दोन्ही मुलींनी स्वतंत्र महिला म्हणूनच वावरावं, अशीच वडिलांची इच्छा होती. परंतु मुस्लिम समुदायात मुलींनी शिक्षित आणि स्वतंत्र असणे दुर्मिळच. वडिलांनी मात्र शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं. सत्तरच्या दशकात ‘मुलांना शिक्षणाची भेट दे’, असं एका जर्मन महिलेनं आपल्याला सांगितलं होतं, असं वडील सांगतात. मुलगा आणि मुली असा भेदभाव वडिलांनी कधीच केला नाही. शाळेतील वातावरणामुळे मला वाचन, वक्तृत्व, निबंध लेखन, कोडे आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

    राष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न

    शाळेत असताना मी डेस्कवर ‘आयएएस’ हे तीन शब्द कोरायची आणि माझी सुप्त इ्च्छा व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग होता. मला राष्ट्र उभारणीत योगदान करण्याची मनोमन इच्छा होती आणि आयएएस अधिकारी झाल्यास यामध्ये सकारात्मक योगदान देऊ शकीन, असं मला सारखं वाटायचं. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे शास्त्रज्ञ व्हावं, असंही कधीकधी वाटायचं. परंतु, त्यासाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक स्वभाव नसल्याची मला कल्पना होती. त्यामुळेच मी प्रशासक होण्याचा निर्णय घेतला. कधीही आयएएस अधिकारी न बघितलेल्या छोट्या गावातील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील मुलींच्या दृष्टीने ही खूप मोठं स्वप्न होतं. विद्यार्थी म्हणून पर्याय माझ्याकडे इंजीनियर किंवा डॉक्टर हेच पर्याय होते. एक डॉक्टर म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. या विचाराने मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, असे अदीला म्हणाली.

    पेरुत्थलमना येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही मी येथील डेस्कवरही आयएएस हेच शब्द कोरायची. हेच आपले अंतिम स्वप्न आहे, अशी आठवण देण्याचा बहुदा तो प्रयत्न असावा. मी वैद्यकीय शिक्षण घेत असले तरी अनेक विषयांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात नियतकालिकं आणि वृत्तपत्र वाचण्यात माझा खूप वेळ जायचा. आणखी एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रबी सोबत माझी मैत्री झाली. दोघांच्याही आवडीनिवडी जुळत असल्याने आधी मैत्री, चार वर्षे एकमेकांना पुरते जाणून घेतल्यानंतर घरच्यांच्या संमतीने आमचा विवाह झाला, असेही ती म्हणाली.

    परंतु, आपला रस इंजेक्शन आणि प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यात नाही, हे माझ्या पुन्हा लक्षात आले. समाजासाठी काम करण्याची तीव्र इच्छा तर होती. परंतु, ती या माध्यमातून नव्हे. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पतीने भरपूर पाठिंबा दिला. आपल्या समुदायातून अशाप्रकारचे स्वप्न कुणीही बघत नसलं तरी, मी जर हे स्वप्न पूर्ण केलं, तर आणखी महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी मी प्रोत्साहित करीन, असे त्याने सांगितले. त्याच काळात रबीच्या एका मित्राची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. मी परीक्षेसाठी त्याचा सल्ला घेतला. त्याने मला एक-दोन प्रश्न विचारले. त्याची उत्तरे दिल्यामुळे त्याने मला पुढे जाण्याचा सल्ला दिला. मी तीन महिन्यांच्या कोचिंग क्लाससाठी दिल्लीला गेले. पूर्व परीक्षेसाठी मी इंग्रजी, समाजशास्त्र यांचा अभ्यास केला माझी वैद्यकीय क्षेत्रातील कारकीर्द धोक्यात येणार याची कल्पना होती. सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढचे दोन महिने दिल्लीत राहून मी मुख्य परीक्षेची तयारी केली. सामान्य प्रशासन या पेपरशिवाय वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासात असलेला वैद्यकशास्त्र हा पर्यायी पेपर होता. नशिबाने मी मुख्य परीक्षादेखील पास झाले. एप्रिल २०१२ मध्ये माझी मुलाखत होती आणि त्यावेळी मी चार महिन्यांची गर्भवती होते. अट्टापडी येथे वैद्यकीय व्यवसाय करत असताना केलेल्या कामाबद्दल मला मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेथील आदिवासी, त्यांची जीवनशैली, पारंपारिक व्यवसाय, सामान्य आरोग्यविषयक समस्या इत्यादींबाबात प्रश्नांचा भडिमार केला. वैद्यकशास्त्रात तंत्रज्ञानाच्या भूमिकेबाबतही मला विचारणा करण्यात आली. मला सनदी अधिकारीच व्हायचे आहे, हे मी त्यांना पटवून सांगितले. अर्ध्या तासाम मुलाखत संपली. त्याचा निकाल लागला तेव्हा मला २३० गुण मिळाले आणि मलबार भागातून आयएएस अधिकारी होण्याची मी पहिली मुस्लिम महिला असावी, असे ती सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता.

    २०१२ साली परीक्षा, मुलाखत आणि इतर प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अथीलाची कन्नूर येथे वर्षभरासाठी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी घेतलेली सुटी संपल्यानंतर २०१४ साली तिची तिरुर उपविभागात उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शहीद भगतसिंग, महात्मा गांधी आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे तिचे आदर्श आहेत. बालपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न कसे पूर्ण करावे आणि जीवनात यशाला कशी गवसणी घालावी याकरिता अगाधा निश्तिच इतरांसाठी आदर्श ठरू शकते.

  • रिक्षाचालकाचा मुलगा आयएएस

    रिक्षाचालकाचा मुलगा आयएएस

    समाजात पाय ओढणाऱ्यांचे आणि खच्चीकरण करणाऱ्यांची काही कमी नसते. रिक्षाचालकाचा मुलगा पुढे चालून रिक्षाच चालवणार. या शब्दात अनेकदा आजूबाजूचे लोक गोविंदला हिणवायचे. परंत, वडील नारायण यांनी नेहमीच गोविंदला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. अशा टोमण्यांमुळे गोविंद जराही निराश झाला नाही. उलट त्याचा निर्धार आणखी पक्का होत गेला. कल्फलक जीवन कंठत असलेले आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करत असलेले तरुणही प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्याच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात याचा मला विश्वास आहे, असे गोविंदने आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले होते. 

    भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा दैनंदिन कारभार चालविणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. म्हणूनच या रचनेत भारतीय प्रशासकीय सेवेला (आयएएस) अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयएएस अधिकारी हे सरकार आणि सर्वसामान्य जनता यांना जोडणारा दुवा आहेत. आयएएस अधिकारी होणं एवढं सोपं नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) घेतल्या जाणाऱ्या अत्यंत खडतर अशा परीक्षा व मुलाखत प्रक्रियेतून हिरे समजल्या जाणाऱ्या तरुण-तरुणींची आयएएस अधिकारी म्हणून निवड केली जाते. या परीक्षेसाठी कठोर मेहनत आणि अभ्यास करावा लागतो.

    सर्व सुखसुविधा उपलब्ध असूनही अनेक जणांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य होत नाही. काही जण फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्य, या दोन्ही गोष्टींच्या बळावर यशाला गवसणी घालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील गोविंद जयस्वाल हे त्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही उक्ती प्रत्यक्षात आणून गोविंदने यशाला पायाशी लोळण घ्यायला भाग पाडलं. कधीही अशा गोष्टी ऐकल्यानंतर ‘असंही होऊ शकतं’ हे शब्द आपसूकच बाहेर पडतात.

    वाराणसी येथील गरीब रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या गोविंदने २००६ च्या नागरी सेवा परीक्षेत देशातून ४८ वा क्रमांक पटकावला आणि तो देखील पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणाऱ्या गोविंदची प्रबळ इच्छाशक्तीच यातून दिसून येते. गोविंदने मिळविले हे यश फक्त त्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीचे फळ नसून, वडील नारायण यांचे स्वप्न आणि स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या परिश्रमाची फलश्रुती आहे. आपल्या अल्प उत्पन्नातूनही मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न नारायण यांनी केला.

    गोविंदने मिळविलेले हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाही आणि म्हणूनच त्याची यशोगाधा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. गोविंदने आपले बालपण १२ बाय ८ चौरस फुटांच्या भाड्याच्या खोलीत घालविले. तेथे तो वडील, आई आणि बहिणींसह राहत होता. ज्या ठिकाणी आई स्वयंपाक करायची, भांडी घासायची, स्नान करायची तिथेच गोविंदला अभ्यास करावा लागायचा. हे नसे थोडके म्हणून की काय, त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या छोट्यामोठ्या कारखान्यांमधील मशिन्स आणि जनरेटर्सच्या आवाजामुळे त्याच्या अभ्यासात व्यत्यय यायचा. कापसाचे बोळे कानात घातल्यानंतरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गोविंदला शक्य होत होते.

    वडील नारायण यांची पृष्ठभूमी फार वेगळी नव्हती. ते सरकारी स्वस्त धान्य दुकानात काम करायचे. दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी नोकरी गमावली. त्यानंतर एक रिक्षा खरेदी करून ती भाड्याने दिली. बघताबघता त्यांनी आणखी काही रिक्षा खरेदी केल्या. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले. याचवेळी नारायण यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी थोडीफार गुंतवणूक केली. मुलींचे विवाह करायचे असल्याने त्यांनी बचतीतून तीन छोटे भूखंड खरेदी केले. अशातच दुर्दैव आड आले आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गोविंदच्या आईचे निधन झाले. त्याच कालावधीत नारायण यांच्या रिक्षा व्यवसायालाही फटका बसल्यामुळे कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

    अशा विषम परिस्थितीतही नारायण यांनी स्वप्न बघणे सोडलं नाही. तसंच ते गोविंदनेही नाही. आयएएस अधिकारी झालो तर आपल्याला जीवनात काहीतरी साध्य करता येऊ शकेल, असंच त्याला वाटायचं. तशी सरकारी नोकरी मिळवायची म्हटल्यावर लाच दिल्याशिवाय ती मिळणं नाही. व्यवसाय सुरू करायला पैसा नाही, याची त्याला जाणीव होती. मुलींच्या विवाहाची जबाबदारी पार पाडल्यानंतर नारायण यांनी त्यांच्याकडे असलेला शेवटचा भूखंड ४० हजारात विकला आणि ते पैसे गोविंदला दिले. जेणेकरून त्याला दिल्ली येथे आयएएस परीक्षेचे प्रशिक्षण घेता येईल. गोविंदने गणित हा पुरवणी विषय घेऊन त्यासाठी शिकवणी लावली. इतरांसारख्या दोन-चार संधी मिळणार नाहीत आणि त्यामुळेच आपल्यासाठी ‘करो वा मरो’ अशीच स्थिती असल्याची गोविंदला जाण होती. वडिलांनी दिलेले पैसे फारफार तर वर्षभर पुरतील. हे लक्षात घेऊन आणखी मेहनत करण्यास प्रवृत्त केले.

    गोविंदने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर खूप अभ्यास केला आणि आयएएसची परीक्षा दिली. गोविंदच्या आयएएस परीक्षा निकाल लागण्यापूर्वी दहा दिवस आधीपासूनच नारायण यांना झोप लागली नव्हती. गोविंदने आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो अव्वल ५० मध्ये आला आहे. हे कळताच वडील नारायण काही काळ हवेतच होते. हे सत्य पचविण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागला आणि स्वप्नपूर्तीचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. आता आपले कष्टाचे दिवस संपले आणि पालकांचे स्वप्न पूर्ण करू शकतो, याचं गोविंदला समाधान आणि आनंद होता. कल्फलक जीवन कंठत असलेले आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करत असलेले तरुणही प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्याच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात याचा मला विश्वास आहे, असे गोविंदने आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले होते. गोविंदने परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अत्यंत विषम परिस्थतीवर मात करून जे यश मिळविले, ते इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

  • जातिभेदावर कायद्याने बंदी घालण्यास लावणाऱ्या क्षमा सावंत

    जातिभेदावर कायद्याने बंदी घालण्यास लावणाऱ्या क्षमा सावंत

    अमेरिकेतील ‘सिॲटल’ हे जातीवर आधारित भेदांवर कायद्याने बंदी घालणारे त्या देशातील पहिले शहर ठरले आहे. क्षमा सावंत यांनी या प्रस्तावाची आणि ‘सिॲटल’ नगर परिषदेच्या या ऐतिहासिक निर्णयाची जगभर चर्चा झाली. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी सावंत यांना भारतीय वंशाच्या अमेरिकेतील कट्टरवादी गटाचा तीव्र विरोधही सहन करावा लागला.
    ‘सिॲटल’ मधून आलेल्या या वृत्तामुळे क्षमा सावंत यांचेही नाव जगभर पोहोचले. क्षमा सावंत मूळच्या पुण्याच्या ! त्यांचा जन्म १९७३ सालचा. बालपण आणि शिक्षण १९९६ पर्यंत मुंबईत झाले.

    त्यांची आई इतिहास व भूगोल विषयांची शिक्षिका होती. वडील अभियंता होते. क्षमा तेरा वर्षांच्या असताना मद्यधुंद कारचालकामुळे झालेल्या अपघातात वडिलांचे निधन झाले. क्षमा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्या असल्या, तरीही जातिव्यवस्थेचे परिणाम आणि आजूबाजूला आत्यंतिक गरिबी पाहतच त्या मोठ्या झाल्या. यामुळे त्यांच्या विचारांना निश्चित दिशा मिळाली; आणि त्या समाजवादी विचारसरणीकडे वळल्या. त्यांनी १९९४ मध्ये संगणक शास्त्रामध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी मिळविली. विवाहानंतर त्या अमेरिकेत गेल्या. तेथे ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून त्यांनी दीड वर्ष काम केले.

    अर्थशास्त्रात पदवी मिळविल्यानंतर त्यांनी ‘नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी’ मधून २००३ मध्ये पीएच. डी. मिळविली. २००६ पासून त्या ‘सिॲटल’ मध्ये रहायला गेल्या; आणि तेथील ‘सोशालिस्ट अल्टरनेटिव्ह’शी जोडल्या गेल्या. महिला समानता, तसेच कष्टकऱ्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये वॉशिंग्टन राज्याच्या प्रतिनिधी सभेसाठी समाजवादी पर्यायी उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना २९ टक्के मते मिळाली. ‘डेमोक्रॅट’ पक्षाच्या उमेदवाराला हरवून अमेरिकेच्या प्रमुख शहरात निवडून आलेल्या त्या पहिल्या समाजवादी महिला ठरल्या. ‘भारतातून आल्यामुळे साहजिकच अमेरिकेसारख्या श्रीमंत देशामध्ये गरिबी नावालाही नसेल, कुणीही बेघर नसेल, अशीच अपेक्षा होती; परंतु इथे आल्यानंतर दिसलेले चित्र अगदी त्याउलट होते,’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

    ‘सिॲटल’ मधील वटहुकुमामुळे जातिअंताच्या त्यांच्या लढाईला नवे बळ लाभले आहे.