संभवामि युगे युगे – कृष्णनीतीचा आविष्कार
भारतीय संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्ण हे केवळ दैवत नसून ते एक उत्तम मार्गदर्शक, तत्वज्ञ आणि व्यवस्थापन गुरु मानले जातात. त्यांच्या याच अष्टपैलू पैलूवर आणि प्रभावी नीतीवर आधारित ‘संभवामि युगे युगे’ हे एक भव्य शास्त्रीय नृत्यनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘युगय क्रिएशन्स’ यांची ही निर्मिती असून, या…