चित्रफीत संपादन तपशील, मानधन व करारनामा

🎬 चित्रफीत संपादक

📋 प्रमुख जबाबदारी
बातम्या, मुलाखती, वृतांत व माहितीपटासाठी चित्रफितींचे संकलन, काटछाट, पार्श्वसंगीत व ग्राफिक्ससह सुसंगत व आकर्षक संपादन करणे, ही प्रमुख जबाबदारी.
🗂 कामाचे स्वरूप

चित्रफितीचे प्राथमिक छाटकाम | ध्वनी गुणवत्ता व आवाज समतोल | पार्श्वसंगीत व इफेक्टस समाविष्ट | शीर्षके व उपशीर्षके समावेश | क्रमानुसार दृश्य मांडणी | डिलिव्हरीसाठी फॉरमॅट रूपांतरण | संपादित फाईलचे संग्रह व पाठवणी

🎓  चित्रफीत संपादनातील पदवी
📍 घरुन | मुंबई | आवशक्तेनुसार
💰 मानधन | मासिक वेतन

📌 आवश्यक कौशल्ये


Adobe Premiere Pro | FCP पारंगत

After Effects | अ‍ॅनिमेशन कौशल्य

रंग सुधारणा व LUTs ज्ञान

ऑडिओ क्लीनअप व मिक्सिंग कौशल्य

वेगवान आणि अचूक संपादन

टायमलाईन मॅनेजमेंट कौशल्य आवश्यक

चित्रफीत कथानक समजून घेण्याची क्षमता

💻 आवश्यक यंत्रणा


उच्च क्षमतेचा संपादन संगणक

आवश्यक सॉफ्टवेअर परवाने

स्टुडिओ मॉनिटर व हेडफोन

मोठी स्टोरेज ड्राइव्ह्स सुविधा

व्हिडीओ ट्रान्सफरसाठी कार्ड रीडर

HD/4K व्हिडीओ प्लेबॅक स्क्रीन

जलद इंटरनेट व क्लाउड स्पेस

🏅 पात्रता


मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी मुलुखाचा जाज्वल्य अभिमान

पत्रकारितेचा उपयोग मराठी समाजासाठी करण्याची तळमळ

गरजू व दुर्बळांबद्दल सक्रिय आत्मीयता

समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव

प्रामाणिक । नम्र । वक्तशीर । कामसू । कार्यनिष्ठ

सतत शिकण्याची जिज्ञासा आणि तांत्रिक प्रगतीची तयारी

संघकार्य आणि नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता

आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम

प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी

साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
● पंधरा मिनिटांच्या चहाच्या दोन सुट्टया
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी

सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी

सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी

दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची एक जेवणाची सुट्टी

दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
● पंधरा मिनिटांची चहाची एक सुट्टी
● अर्ध्या तासाची जेवणाची एक सुट्टी
जानेवारी

सोमवार, दि. 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
मार्च

मंगळवार, दि. 3 मार्च : धूलिवंदन
ऑगस्ट

शनिवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट : रक्षाबंधन | दूपारनंतर अर्धा दिवस
सप्टेंबर

सोमवार, दि. 14 सप्टेंबर : श्री गणेश चतुर्थी

शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर

मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
नोव्हेंबर

मंगळवार, दि. 10 नोव्हेंबर : दिपावली पाडवा

बुधवार, दि. 11 नोव्हेंबर : भाऊबीज | दूपारनंतर अर्धा दिवस

रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे

आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट

पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत

एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा

प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.

मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.

करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.

पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.

कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
सेवा कालावधी
नेमणूक ही किमान एक वर्षासाठी राहील. आवश्यकतेनुसार कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
सेवापुरवठा करार
नेमणुकीपूर्वी उमेदवाराने संस्थेशी लेखी सेवापुरवठा करार करणे बंधनकारक राहील.
गोपनियता करार (NDA)
संस्थेच्या अंतर्गत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी उमेदवाराने गोपनियता करार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा प्रतिबंध करार
करार संपल्यानंतर संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक स्वरूपाचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्यात भाग घेणे टाळावे लागेल.
बौद्धिक मालमत्तेचे हक्क
कार्यकाळात तयार होणाऱ्या साहित्य, संकल्पना, नमुने, डिझाईन व इतर बौद्धिक संपत्तीचे हक्क संस्था कडे राहतील.
कराराची पुनरावलोकन प्रक्रिया
दरवर्षी कार्यकामगिरीचा आढावा घेऊन करार नूतनीकरण किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संस्थेकडे राखून ठेवला जातो.
तत्काल समाप्तीची अट
विश्वासघात, शिस्तभंग, गोपनियतेचे उल्लंघन यासारख्या गंभीर कारणांमुळे संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता करार समाप्त करू शकते.
टीप
ही फक्त साधारण माहिती आहे. संपूर्ण अटी व शर्ती प्रत्यक्ष करार करताना स्पष्ट व सविस्तरपणे निश्चित केल्या जातात.


कार्यालयीन सुविधा
● आधुनिक व सुसज्ज कार्यस्थळ
● शांत, सकारात्मक आणि व्यावसायिक वातावरण
● सुसज्ज संगणक, इंटरनेट व वर्किंग टूल्स
● सुरक्षितता आणि स्वच्छतेची हमी


कामकाजाचे वेळापत्रक
● ठराविक आणि नियोजनबद्ध कामाच्या वेळा
● आठवड्यात एक निश्चित सुट्टी
● गरजेनुसार लवचिक वेळा


व्यावसायिक वाढीच्या संधी
● प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी
● उच्च कामगिरीसाठी प्रोत्साहन व बढतीची शक्यता
● विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी
● नेतृत्वगुण विकसित करणारी जबाबदारी


मानधन आणि प्रोत्साहन
● योग्य आणि स्पर्धात्मक मानधन
● वेळेवर व नियमित देयके
● कामगिरीनुसार लाभांश किंवा गौरव


सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
● अनुभवी आणि मैत्रीपूर्ण संघ
● सर्जनशील व मोकळा संवाद
● संघ बैठक व विचारमंथनाची सत्रे


शिकण्याची संधी
● नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्याची मोकळीक
● मराठी माध्यमातून प्रशिक्षण
● कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल टूल्सचा वापर


मूल्याधारित संस्था संस्कृती
● पारदर्शक व न्याय्य व्यवहार
● सामाजिक भान असलेली संस्था
● मूल्य, शिस्त आणि जबाबदारीवर भर


अतिरिक्त लाभ व उपक्रम
● विशेष दिवस, सण साजरे करणे
● कौटुंबिक कार्यक्रम व सहली
● वर्षातून एकदा संघबांधणी उपक्रम

🤝 चित्रफीत संपादनाचे मानधन 💰

 

Basic Editing

चित्रफीत प्रकार
सोशल मीडिया पोस्ट / रील
कामाचे स्वरुप
कटिंग, निवेदन, पार्श्वसंगीत, शीर्षके
लांबी
३० – ६० – ९० सेकंद
मानधन दर
₹ २ / प्रती सेकंद
कालमर्यादा
३० – ४५ – ६० मिनिटे

 

Standard Editing

चित्रफीत प्रकार
लघु चित्रफीत
कामाचे स्वरुप
Basic + ट्रान्झिशन्स, कलर करेक्शन
लांबी
3 मिनिटे
मानधन दर
₹ 180 / प्रती मिनिट
कालमर्यादा
3 तास

 

Premium Editing

चित्रफीत प्रकार
मुलाखत, माहितीपट, तत्सम
कामाचे स्वरुप
Basic + Standard + Motion graphics
लांबी
10 मिनिटे
मानधन दर
₹ 300 / प्रती मिनिट
कालमर्यादा
10 तास

📌 नियम, अटी व शर्ती


कामाचा प्रकार Storyboard नुसार ठरवला जाईल.

Storyboard, Footage, Script, Music, Voice-over व Assets वाहिनीकडून दिले जातील.

सुधारणा धोरण – पहिली सुधारणा मोफत, नंतर ₹ 50 – 150 प्रति सुधारणा, कामानुसार.

कालमर्यादा खात्री – वेळेआधी दिल्यास ₹ 100 बोनस | उशीर झाल्यास प्रती तास ₹ 100 कपात.

देयके नियम – पदाचा तपशील पान पहावे.

File Delivery Format – Original File + MP4 (Full HD / 4K), Google Drive / WeTransfer लिंकद्वारे.

गोपनीयता – वाहिनीचा डेटा, फुटेज, संगीत, निवेदन, स्क्रिप्ट, ॲसेट्स व फिल्म इतरत्र वापरू नये, आढळल्यास कायदेशीर कारवाई.

मालकी हक्क – सर्व फायनल आउटपुटचे हक्क वाहिनीचे असतील.

एकगठ्ठा प्रकल्पांवर – 10+ व्हिडिओंवर 10% डिस्काउंट.

गैर – विशेष करार – हा करार एडिटरला इतर ग्राहकांसाठी काम करण्यापासून रोखत नाही, जोपर्यंत आमचा प्रोजेक्ट प्रभावित होत नाही.

📄 सर्वसाधारण सेवा करारनामा

(यात पदानुसार वेळा, नियम, अटी व इतर तपशीलाचा बदल होऊ शकतो)

📅  कालावधी : दिनांक (तारीख) – (महिना) – (साल)  ते  (तारीख) – (महिना) – (साल)

🤝 करारातील पक्ष

हा सेवा पुरवठा करार दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) रोजी

(सेवा स्विकारणार)

सह्याद्री मराठी,

२०८, साई सदन, ७६/७८, मोदी स्ट्रीट,
मॉडर्न हॉटेलसमोर, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.

ई-मेल : [email protected]

दूरध्वनी क्रमांक : 022 4962 0900

वॉट्सअप क्रमांक : +91 77750 55900

(सेवा पुरवठादार)

सेवा पुरवठादाराचे नांव : ___________________
पत्ता : ____________________________________
____________________________________
ई-मेल : __________________________________
संपर्क क्रमांक : ___________________________

यांच्यात परस्पर सहमतीने केला जात आहे.

📋 सेवा कराराचे नियम व अटी

हा दस्तऐवज व अटी, शर्ती व नियम ‘सेवा करार’ म्हणून मान्य असतील. सेवा पुरवठादारांनी या दस्तऐवजाच्या शेवटी दिलेल्या जागी स्वाक्षरी करून संस्थेच्या अटी, शर्ती व नियम पाळण्याची खात्री द्यावी.

📅 सेवा प्रारंभ, समाप्ती व कार्यस्थळ

सेवा प्रारंभ (वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल)
सेवा समाप्ती (वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल)

कार्यस्थळ :

वरील पत्त्यावरील संस्थेचे कार्यालय, मुंबई / किंवा घरुन काम, यापैकी जे ठरले आहे ते / संस्थेच्या आवश्यकतेनुसार बदली शक्य. आवश्यकता भासल्यास परदेश प्रवासही आवश्यक.

👤 पदनाम व जबाबदाऱ्या

पद
मुख्य जबाबदाऱ्या संलग्न जोडपत्रकानुसार.

📋 सेवा स्थिती व परिविक्षाधीन कालावधी

पूर्ण वेळ सेवा पुरवठादार (Full-time)

परिविक्षाधीन कालावधी (Probation) कालावधी:

(वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल)  (साधारण ६ महिने)

पुनरावलोकन:

मानव संसाधन विभाग कामगिरीचे पुनरावलोकन करून ठरवेल की सेवा कायम ठेवायची की नाही. समाधानकारक कामगिरी असेल तर कायम नियुक्तीपत्र दिले जाईल. प्रशिक्षण काळात सवलतीच्या रजा मिळणार नाहीत.

🕘 कार्यालयीन वेळ व साप्ताहिक सुट्टी

  सोमवार ते शनिवार: सकाळी ९ ते सायंकाळी ६

  हजेरी वेळ: सकाळी ८:४५ व सायंकाळी ६:१५

  दुपारचे जेवण: १:३० ते २:०० (३० मिनिटे)

  चहा वेळ: १०:१५ ते १०:३० व ४:०० ते ४:१५ (१५ मिनिटे)

  जादा वेळ आणि काम (ओव्हरटाईम): लागू नाही

  साप्ताहिक सुट्टी: रविवार

💰 मानधन व लाभ

  मानधन देय तारीख: प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला.

  अगाऊ उचल: दिली जात नाही.

  वाढ व लाभांश: किमान 95% उपस्थिती अनिवार्य.

  संस्थेच्या धोरणानुसार व सेवा पुरवठादाराच्या कामगिरीवर आधारित.

🗓️ रजा व इतर सुट्ट्या

  संस्थेत एक वर्ष पूर्ण होईपर्यंत पगारी रजा नाहीत.

  साधी बिनपगारी रजा: किमान दहा दिवस आधी लेखी किंवा ई-मेल द्वारे विनंती करणे आवश्यक.

  ती सात दिवस आधी मंजूर करुन घेणे गरजेचे.

  मंजुरीशिवाय रजा घेतल्यास १ दिवसाच्या बदल्यात २ दिवसांचे मानधन कपात.

  मानव संसाधन विभागाने पोर्टलवर जाहिर केलेल्या यादीनुसार पालन आवश्यक.

  आजारी रजा: सकाळी नऊ वाजण्यापूर्वी [email protected] या ई-मेलवर, व्यवस्थापक, विभागप्रमुख व मा. मुख्य संपादक यांना कळविणे आवश्यक.

  तीन दिवसांपेक्षा अधिक असल्यास डॉक्टरचे प्रमाणपत्र, औषधांची चिठ्ठी व औषधांच्या देयकांची प्रत आवश्यक.

  सेवापुरवठादाराची मंजूरी शिवाय सात दिवसांपेक्षा अधिक सुट्टी असल्यास सेवा पुरवठा बंद केला असे मानून कराराच्या अटी शर्तींनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

इतर रजा :

  दया रजा (Compassionate leave): व्यवस्थापनाच्या निर्णयावर अवलंबून.

  गर्भावस्था / पितृत्व रजा:

◦  स्त्रिया: एकूण ६ महिने (३ महिने आधी + ३ महिने नंतर), वेतनविरहित

◦  पुरुष: व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार

🔒 गोपनीयता करार (NDA – नॉन-डिस्क्लोजर)

  संस्थेच्या संवेदनशील माहितीचे संरक्षण आवश्यक.

  गोपनीय माहिती उघड केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र.

©️ बौद्धिक संपदा हक्क

  सेवा पुरवठादाराने तयार केलेले सर्व दस्तऐवज, संकल्पना, रचना, संकेतांक यांचे हक्क संस्थेचे राहतील.

⛔ स्पर्धाविरोधी आणि ग्राहक पळविणे टाळणे

  स्पर्धा प्रतिबंध: 2 वर्षांपर्यंत स्पर्धक संस्थांमध्ये नोकरी व स्वत:चा व्यवसाय करता येणार नाही. इतर व्यवसायात भागीदार किंवा तत्सम सहभाग घेता येणार नाही. (निर्धारित वेळेची पूर्वसूचना न देता नोकरी किंवा सेवा पुरवठा बंद केल्यास ही अट लागू होते).

  ग्राहक पळविणे: ग्राहक, कर्मचारी यांना आपल्या सोबत नेल्यास कायदेशीर कारवाई व दंड.

✅ तक्रार निवारण

  सेवा पुरवठादारांच्या योग्य तक्रारी प्राधान्याने आणि तातडीने सोडवल्या जातील.

🚨 सेवा समाप्ती अटी

  नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ सेवा समाप्ती किंवा निलंबन.

  शिस्तभंग प्रक्रियेत –

1 तोंडी इशारा
2 लेखी इशारा
3 अंतिम लेखी इशारा
4 सेवांत

  कामाची गरज पूर्ण झाल्यावर पूर्वसूचना न देता संस्थेकडून सेवा समाप्त करता येईल.

📋 आचारसंहिता

  वेशभूषा: स्वच्छ, औपचारिक पोशाख आवश्यक.

  व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग: Read receipts ON, Last seen enabled, Online enabled.

  फोन वापर:

◦  कार्यालयीन वेळेत वैयक्तिक दूरध्वनी वापरास बंदी.

◦  चहा व जेवणाच्या सुट्टीत वैयक्तिक भ्रमणध्वनी वापरास परवानगी.

◦  आपत्कालीन स्थितीत जवळच्या नातेवाईकांना कार्यालयात संपर्क साधण्यासाठी परवानगी.

◦  नियम तोडल्यास अर्थिक दंड, लाभांशापासून, पगारवाढ व इतर सुविधांपासून वंचित.

📱 सोशल मीडिया व ईमेल

  कार्यालयीन यंत्रणेवर वैयक्तिक समाज माध्यमे व ई-मेल वापरास मनाई.

  फक्त अधिकृत ईमेलद्वारेच कार्यालयीन व्यवहार.

  पासवर्ड बदलणे, नवीन सॉफ्टवेअर, ॲप डाऊनलोड करण्यास मनाई.

  उल्लंघनास दंड व शिस्तभंग कारवाई.

📢 राजीनामा सूचना कालावधी

अगाऊ सुचना महिन्याच्या एक तारखेपासून.

  कंत्राटी, करारावर किंवा कायम: २ महिने.

  वरिष्ठ पदासाठी: 3 महिने.

  या अटी न पाळल्यास ३ महिन्यांचे वेतन / मानधन किंवा ₹३ लाख रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल तो दंड.

  तथापि, कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर, संस्थेने त्या पदासाठी पर्यायी व्यक्तीची नियुक्ती करून तिचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले व ती कार्यभार सांभाळण्यास सक्षम झाली, तर संस्थेला संबंधित कर्मचाऱ्यास उर्वरित सूचना कालावधी पूर्ण करण्याची सक्ती न करता, त्यास कोणताही दंड, कारवाई किंवा आर्थिक दायित्व न लावता सेवेतून मुक्त करण्याचा अधिकार राहील.

  कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय सुचना कालावधी कमी अथवा जास्त करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव.

⚖️ स्वार्थसंबंध टाळणे

  नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई होईल.

🏛️ विवाद निवारण

  मुंबई महानगर दंडाधिकारी (फोर्ट) न्यायालय अधिकार क्षेत्रांतर्गत

  मध्यस्थी व लवादाद्वारे निवारण

🔐 माहिती गोपनीयता

  कायदेशीर मागणीशिवाय वैयक्तिक माहिती उघड केली जाणार नाही.

📝 करारात बदल

  सर्व बदल लेखी असले पाहिजेत व दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केलेली असावी.

📄 पूर्ण करार

  हा करार मागील सर्व चर्चा व कागदपत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे.

या करारातील सर्व नियम, अटी व शर्ती मी मान्य करतो आणि माझ्या सेवाकालात त्यांचे संपूर्ण पालन करेन.

✍️ स्वाक्षरी

सेवा पुरवठादार स्वाक्षरी:  ___________________
सेवा पुरवठादाराचे नांव:  ____________________

संस्थेतर्फे स्वाक्षरी:  _____________________
नांव व पदनाम:  _______________________

साक्षीदाराचे नांव:  ________________________      साक्षीदाराची स्वाक्षरी:  ___________________

🏔️🩵 मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी मुलूखाचा प्रखर अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला — ‘सह्याद्री मराठी वाहिनी’ समर्पित आहे! 🩵🏔️

संकेतस्थळाला भेट

अनुसारक

परिवार सदस्य

दर्जा मानांकन

दिल्लीत शंभर प्राणवायू उद्याने
हवाईमध्ये तीव्र भूकंप
एक जुलैपासून जी रामजी कायदा लागू
अफगाणिस्तानला भारताची वैद्यकीय मदत
भारत आणि बोईंगमध्ये विमाननिर्मितीवर चर्चा
इस्रायली सुरक्षामंत्र्यांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी
पश्चिम बंगालमध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू
राज्यात पाणीटंचाईचे संकट
इराण-अमेरिका कराराबाबत सकारात्मक चर्चा
दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी धोरण
पंतप्रधान मोदी – मार्को रुबिओ यांच्यात चर्चा
चीनमधील कोळसा खाणीत वायूस्फोट
वायू दलातील गरुड कमांडोजची प्रात्याक्षिके
ब्रिटनच्या विमान कंपन्यांचा प्रवाशांना दिलासा