सह्याद्री मराठी वाहिनी

Category: वेब सिरीज / ओटीटी

विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सिरीजची रंजक माहिती वाचण्यासाठी ‘विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सिरीजची रंजक माहिती वाचण्यासाठी सह्याद्री मराठी वाहिनीच्या ‘‘वेब सिरीज / ओटीटी’ या सदराला आवश्य भेट द्या!

  • द ब्रोकन न्यूजच्या दुसरा सीझन

    द ब्रोकन न्यूजच्या दुसरा सीझन

    विनय वैकुळे दिग्दर्शित ‘द ब्रोकन न्यूज’ या वेबमालिकेचा पहिला सीझन लोकांना आवडला. आता या
    मालिकेचा दुसरा सीझन येत असून निर्मात्यांनी टीझर प्रदर्शित केला आहे. या घोषणेमुळे चाहते खूप उत्साहित
    झाले आहेत.
    ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ ने इन्टाखूग्रामवर एक छोटा व्हिडिओ जोडला आहे. ‘सत्य आणि संवेदना यातील फरक
    नाहीसा झाला तर भारत काय पाहणार?’ असे ऐकू येत आहे. ”जेव्हा मालिकेतील तिघे पुन्हा एकदा समोरासमोर
    येतील, ” असे त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


    ‘द ब्रोकन न्यूज’ सीझन २ पत्रकारितेच्या जगातील खोटेपणा, प्रेम आणि संघर्ष पुढे आणतो. ‘पहला आवाज
    भारती’ ही एक स्वतंत्र वृत्तवाहिनी आहे. याचे प्रमुख संपादक-इन-चीफ अमिना कुरेशी (सोनाली बेंद्रे) आहेत.
    दुसरीकडे, ‘जोश 24/7 समाचार’चे मुख्य संपादक दीपंकर संन्याल (जयदीप अहलावत) आहेत.
    कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले की, ”मी खूप उत्साहित आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, ”अक्षय
    ओबेरॉयही या सीझनमध्ये प्रवेश करणार आहे. ” नुकतेच त्याच्या व्यक्तिरेखेचे अनावरण करताना त्याने सांगितले
    की, या मालिकेत मी एका सीईओची भूमिका साकारणार आहे, जो अमेरिकेतून परतला आहे.

  • पंचायत तीन लवकरच

    पंचायत तीन लवकरच

    ओटीटी मंचावरील बहुचर्चित वेबमालिकेमध्ये समाविष्ट असलेली ‘पंचायत 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
    निर्मात्यांनी ‘पंचायत 3’ च्या चित्रीकरणाची सुरुवात जाहीर केली होती. आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात
    आली आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ द्वारे या मालिकेची निर्मिती केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार
    मिश्रा यांनी केले आहे, चंदन कुमार यांनी ‘पंचायत ३’ ची कथा लिहिली आहे.


    दोन सुपरहिट भागांनंतर आता तिसरा भागही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील सर्व पात्रे
    त्यांच्या विनोदाची छाप सोडतात. समाजमाध्यमांवर मालिकेतील संवादांवर अनेक मीम्सही बनवले जातात.
    प्राइम व्हिडीओने तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा भाग 28 मे रोजी ॲमेझॉन प्राइम
    व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि
    सानविका यांच्या यात भूमिका आहेत.
    मागील दोन हंगामात ‘फुलेरा’ गावातील रहिवासी वेगवेगळ्या आव्हानांशी झुंजताना दिसले. आता नव्या भागत
    ही मालिका नवे वळण घेणार आहे, म्हणजेच फुलेरा गावात पुन्हा गोंधळ उडणार आहे.