सह्याद्री मराठी वाहिनी

Category: वेचक – वेधक – वारसा

वेचक – वेधक गोष्टी आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जाणून घ्या “वेचक – वेधक – वारसा” या सदरातून!

  • पुण्याच्या लेकीची यशाला गवसणी

    पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील वडापुरीची सिमरन ब्रम्हदेव थोरात देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर झाली आहे. वडापुरी येथे एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. सिमरनने आतापर्यंत २० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती वडील ब्रह्मदेव, आई आशा आणि भाऊ शुभम यांना देते. कुटुंबाने तीन एकर जमीन विकून सिमरनच्या स्वप्नांना बळ दिले.  

    इंदापूरमधील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये बारावी झाल्यावर प्रवेश परीक्षा देऊन ती पुण्यातील ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग’मध्ये गेली. सन २०१९ मध्ये तिची महाविद्यालयामधूनच व्हँकुव्हर-कॅनडा येथील ‘सिस्पन शिप मॅनेजमेंट’ या कंपनीत निवड झाली.

    तिने ‘बीएसस्सी नॉटिकल सायन्स’ ही पदवी घेतली. या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. मात्र, भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी होती. त्यानंतर पुढील परीक्षा देऊन तिने परवाना मिळविला.  ‘असे आई-वडील लाभणे म्हणजे भाग्य आहे. सर्वांनाच असे आई-वडील मिळाले, तर कोणीही अशिक्षित राहणार नाही,’ असे सिमरन सांगते.

  • शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग

    माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी ‘शेतकरी दिन’ साजरा केला जातो. 30 मार्च 2024 रोजी त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. ”ग्रामीण आणि शहरी भारत ही दोन भिन्न जगे आहेत. ग्रामीण जनताच खरा भारत आहे, ” असे भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग मानत. 23 डिसेंबर 1978 म्हणजे सुमारे 45 वर्षांपूर्वी राजधानीत कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचा मोठा मेळावा पाहून जग हादरून गेले. भारतातील शेतकऱ्यांची ताकद पाहून दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही उबदारपणा जाणवू लागला. चीनच्या रेड मार्चनंतरचा हा जगातील सर्वात मोठा मेळावा असल्याचे मानले जात होते. चौधरी चरणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांचा हा मेळावा झाला होता. तेव्हापासून 23 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. केवळ शेतकरी दिनच नाही, तर 23 डिसेंबरला शेतकरी दिनाशिवाय भारत सरकार 23 ते 29 डिसेंबर या कालावधीत ‘जय जवान जय किसान’ सप्ताहही साजरा करते.

    चरणसिंग आपल्या तत्त्वांचे कट्टर नेते होते. त्यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. पंडित नेहरूंशी मतभेद झाल्यानंतर सन 1967 मध्ये त्यांना काँग्रेस पक्ष सोडला, आणि ‘भारतीय क्रांती दल’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करावी लागली. सुमारे 1952 साली जेव्हा ‘जमीनदारी निर्मूलन विधेयक’ मंजूर झाले, त्यावेळी उत्तर प्रदेशातील पटवारींनी विरोध दर्शवून 27 हजार पटवारींनी राजीनामे दिले होते. चौधरी चरणसिंग हे देखील हट्टी स्वभावाचे होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. शेतकऱ्यांना पटवारीच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय चरणसिंग यांना जाते. नंतर त्यांनी स्वतः नवीन पटवारी नेमले, ज्यांना आता ‘लेखपाल’ म्हणतात. यामध्ये 18 टक्के जागा हरिजनांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

    चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. चरणसिंग यांची राजकीय कारकीर्द सन 1937 मध्ये सुरू झाली. त्यांनी काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते दोनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरणसिंग समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान बनले. ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापनाही सन 1979 मध्ये चरणसिंग यांनी अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून केली होती

  • लायन्स क्लबची कन्यादान योजना

    अलिकडे विवाह समारंभांवर अमाप उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येतील लोकांना साध्या पद्धतीने विवाह करणेही मुश्किलीचे असल्याचे चित्र या समाजात दिसते.

    ‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’ या संस्थेतर्फे समाजातील अशा गरजवंतांसाठी कन्यादान योजना राबविली जात आहे. येत्या २ मे रोजी या माध्यमातून आदिवासी जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. या जोडप्यांचा विवाह खर्च या संस्थेतर्फे केला जाणार आहे.लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या सहकार्याने ही योजना चालते.

    या जोडप्यास एक लोखंडी कपाट, प्रत्येक जोडप्यास संसारोपयोगी २५ भांडी, भांडी ठेवण्यासाठी स्टीलचे स्टॅंड, लोखंडी पलंग, गादी, उशी, बेडशीट, चादरी, वर-वधूचे विवाहांचे पोशाख, वर-वधूच्या आईसाठी साडी, वडिलांसाठी कपडे, भांडी ठेवण्यासाठी स्टीलचे स्टॅंड, इ. देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक वधूस सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील रिंग, जोडवी व चांदीचे अलंकार देण्यात येणार आहेत.

  • Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!