‘ये रे ये रे पैसा ३’

‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धा
आणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा
करण्यात आली आहे.


या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते. दि. १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून
हसायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावर जोडण्यात आले आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’
या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची असून संवाद
लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.


पैसा मिळविण्यासाठीची धडपड या चित्रपटात पहायला मिळाली होती. ‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये काय वेगळे
दाखविणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाएली आहे.


चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश
भोसले असे कलाकार आहेत. सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक,
ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ हे या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. निनाद बत्तीन हे या चित्रपटाचे
सहनिर्माते आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,514 वेळा पाहिलं