राजाराणीची उत्कंठा

सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरच
प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४
ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे
यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत
विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी गाणी गायली
आहेत. छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.


अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार
आहे. याशिवाय या चित्रपटात भारत गणेशपुरे, सूरज चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, तानाजी गलगुंडे, माधवी जुवेकर,
भक्ती चव्हाण आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,596 वेळा पाहिलं