गुलाबी साडी

सध्या समाजमाध्यमांवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या
गाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.
हे गाणे प्रथम फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याच्या मंचावर सादर करण्यात आले. गाण्याचे गायन
संजू राठोड यांनी केले आहे.


संजू राठोड सांगतात की, गुलाबी साडी हे गाणे त्यांनी दिवाळीच्या दिवशी सकाळी लिहिले होते. काही
कारणांमुळे ते दिवाळीला घरी गेले नव्हते. मग घरी बसून काय करायचे, असा प्रश्न पडला होता. त्यावेळेस त्यांनी
‘गुलाबी साडी’ हे गाणे तयार केले.
या गाण्यानंतर त्याचे नवे गाणे चांगलेच गाजत आहेव ‘ब्राईड तुझी नवरी’ असे या गाण्याचे नाव आहे. या
गाण्यात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील आहे.