महाराणी भाग ४ – राणी भारतीचा सत्तेतील संघर्षाचा नवा अध्याय

हिंदी वेब मालिका ‘महाराणी भाग ४’ पुन्हा एकदा सत्तेच्या रणांगणात प्रेक्षकांना घेऊन आली आहे. या वेबमालिकेने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांच्या मनात आपली अविस्मरणीय जागा निर्माण केली होती आणि आता चौथ्या भागात त्या कथानकाची नवी राजकीय लढत अधिक तीव्र, अधिक धगधगती आणि विचार करायला भाग पाडणारी ठरते.

‘महाराणी भाग ४’ ही वेब मालिका दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सोनी लिव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांना या भागात सत्तेचा बदलता खेळ, जुन्या पात्रांचे पुनरागमन आणि काही नव्या चेहऱ्यांचे आगमन बघायला मिळणार आहे. कथानकात राजकीय सत्तेच्या पलिकडे मानवी भावनांची झुंज आहे जी या वेबमालिकेला एक वेगळी दिशा देते.

प्रसिद्ध दिग्दर्शक रविंद्र गौतम यांनी ही वेब मालिका दिग्दर्शित केली आहे तर सुबहा वर्मा यांनी लेखन केले आहे. ‘महाराणी भाग ४’ मध्ये पुन्हा एकदा हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करते आहे. तिच्या व्यक्तिरेखेतील ताकद, निर्धार आणि संघर्ष पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. तिच्यासोबत सोहम शाह, दिब्येंदू भट्टाचार्य आणि अमित सियाल यांची प्रभावी भूमिका या वेब मालिकेला अधिक उत्कृष्ट बनवतात.

‘महाराणी भाग ४’ मध्ये सत्तेचा संघर्ष केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून तो वैयक्तिक नात्यांपर्यंत पोहोचतो. सत्तेच्या मागे असलेला मानवी स्वभाव, द्वेष, ईर्ष्या, फसवणूक आणि विश्वासघात या सगळ्यांचा गुंता या भागात अधिक तीव्रतेने दिसतो. हुमा कुरेशीची व्यक्तिरेखा म्हणजे एक अशी स्त्री जी सत्तेच्या खेळात पुरुषप्रधान राजकारणाला सामोरे जाते आणि स्वतःचं अस्तित्व टिकवते. तिच्या चेहऱ्यावरचं संतुलन आणि डोळ्यांमधला जिद्दीपणा प्रेक्षकांना प्रत्येक प्रसंगात गुंतवून ठेवतो.

या वेब मालिकेचे दृश्यसौंदर्य आणि संवाद लेखन हे दोन्ही घटक उल्लेखनीय आहेत. राजकीय वातावरण, सभागृहातील घडामोडी, जनतेशी असलेला संवाद, आणि नेत्यांच्या पाठीमागे चालणाऱ्या कटकारस्थानांचा वास्तववादी चित्रण यात उत्तमरीत्या साकारलं आहे. संगीत आणि पार्श्वसंगीतही कथानकाच्या ताण-तणावाला योग्य साथ देतं. जर तुम्हाला राजकारण, सत्तेचे खेळ आणि नात्यांतील संघर्ष या सगळ्यांचा संगम पाहायला आवडत असेल तर ‘महाराणी भाग ४’ ही वेब मालिका नक्कीच पाहण्यासारखी आहे. तिचं कथानक विचार करायला लावतं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवतं.

एकूणच ‘महाराणी भाग ४’ ही केवळ सत्तेवरील मालिका नाही तर ती एका स्त्रीच्या संघर्षाची, दृढतेची आणि आत्मसन्मानाची गाथा आहे. ती पुन्हा एकदा सिद्ध करते की, सत्तेच्या खेळात महिलाही विजयी होऊ शकतात. केवळ राजकारणातच नाही तर जीवनाच्या प्रत्येक रणांगणात त्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकतात. अशी ही जिद्द निर्माण करणारी कथा प्रेक्षकांना भारावून टाकणारी आहे. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनी यावे व मालिकेला दहा पैकी आठ गुण दिले आहेत. ही वेब मालिका प्रत्येक महिलेला तिच्यातल्या सुप्त गुणांना वाव देणारी ठरते आहे.






18,673 वेळा पाहिलं