पाथरीचे साई मंदिर

शिरडीचे साई संस्थान देश-विदेशात लोकप्रिय आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविकांची उपस्थिती शिरडीत असते. साईबाबांच्या दानपेटीत भाविक मौल्यवान वस्तू दान करतात. यामागे साईबाबांची प्रचिती मिळत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. बाबांचा जन्म यावरुन भक्तमंडळींमध्ये अनेक सुरस कल्पना आहेत.

मात्र, सन १९७० च्या दशकामध्ये एक संशोधन झाले. त्यानुसार, साईबाबांचा जन्म अहमदनगरमधील पाथरी गावात झाल्याचे पुढे आले. त्यानंतर हे स्थान पाहण्यासाठी भक्तमंडळी येथे आवर्जून जाऊ लागली. त्यानंतर पाथरी येथे श्री साई स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. सन १९९४ मध्ये साईबाबांच्या निवासस्थानासाठी जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. सन १९९९ साली या सार्वजनिक मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

येथे जाण्याचे अनेकांना कुतूहल व इच्छा असते. विमान मार्गाने गेल्यास पाथरीपासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड हे आहे. पाथरी हे गाव नांदेडपासून १२१ कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने गेल्यास पाथरीपासून 16 किलोमीटर अंतरावर मानवत रोड रेल्वे स्थानक तसेच 22 किलोमीटरवर सेलू रेल्वे स्थानक आहे. तेथून पाथरीला जाण्यासाठी वाहनांची सोय होते.पाथरी हे निर्मल-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असून परभणीपासून ४० कि.मी.अंतरावर आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
18,645 वेळा पाहिलं