बागा समुद्रकिनारा

बागा समुद्रकिनारा हा गोव्यातील सर्वात आनंददायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे जलक्रीडा, उत्तम जेवणाची रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब आढळतात. बागा किनारा हा कळंगुट आणि अंजुणा सागरकिनाऱ्यांच्या सीमेवर आहे. जलक्रीडा हे बागा किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे. पॅरासेलिंग, वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काइट सर्फिंग, जेट स्कीइंग हे काही जलक्रीडा प्रकार आहेत. या समुद्रकिनाऱ्यावरून डॉल्फिन स्पॉटिंग टूरसाठी जाता येते. बागा किनाऱ्यावरील एक अनोखे आकर्षण म्हणजे येथील ‘इनडोअर स्नो पार्क’ होय. येथे खेळण्याची जागा, स्लेडिंग क्षेत्र आणि आइस बार तसेच तिबेटी मार्केट आहे. बागा किनारा हे निसर्गप्रेमींसाठी आवडते ठिकाण आहे. येथे निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. पर्यटक येथून डॉल्फिन पाहण्यासाठी सहली काढू शकतात. बागा किनाऱ्यावरुन समुद्रातील डॉल्फिन पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या सुंदर बेटांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सहलींचे आयोजन केले जाते.

बागा रोडवर तिबेटी मार्केट आहे. त्यानंतर जवळच प्रसिद्ध नाईट मार्केट आहे. बुधवारी येथे फ्ली मार्केट भरते. प्रसिद्ध टिटोज लेनमध्ये अनेक बार, कॅफे मॅम्बो, केपटाऊन कॅफे, कॉकटेल्स, ड्रीम्स आणि कावला यांसारखे क्लब आहेत. बागा किनारी भागातील प्रत्येक श्रेणीमध्ये उत्तम निवासाचे पर्याय आहेत. येथे आपण बजेट, मध्यम श्रेणी आणि लक्झरी अशा कोणत्याही प्रकारात आरक्षण करु शकता. बहुतेक हॉटेल्स समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आहेत. काही खोल्यांच्या खिडक्यांमधून बागा किनाऱ्याचे मनोहारी दृश्य दिसते. बागा किनाऱ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. त्यावेळेस हवामान आल्हाददायक असते. जवळपास रोज रात्री किनाऱ्यावर मेजवान्यांचे आयोजन होत असते. गोव्याची राजधानी पणजीपासून बागा सुमारे १७ किमी. अंतरावर आहे. पणजीहून बागा किनाऱ्यावर जाण्यासाठी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सहज उपलब्ध आहेत.