उन्हाळ्यात ताक हवेच

उन्हाळ्यात सतत थंड पदार्थ खाण्यापिण्याला प्राधान्य दिले जाते. लिंबू सरबत, उसाचा रस, नारळपाणी याबरोबरच आणखी एका पेयाला प्राधान्य दिले जाते, ते म्हणजे ताक. सामान्यपणे ताकाचे सेवन केले जाते; कारण ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत.

वजन कमी करण्यासाठी ताकात काळे मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात जीरे पूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. उच्च रक्तदाब असल्यास ‘गिलोय’ चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे. ताक पिण्याने स्मरणशक्ती वाढते.

मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो. शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो. ताकाचे असे अनेक फायदे आहेत त्याचबरोबर ताकापासून ताकाची कढी, चविष्ट लस्सी असे विविध चवदार पदार्थही बनवता येतात.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
521 वेळा पाहिलं