
आपले केस जाड आणि सुंदर असावेत असे प्रत्येक मुलीला वाटते. यासाठी ती बाजारातून अनेक महागडे पदार्थ खरेदी करते, आणि स्पाही घेते; परंतु या सर्वांमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे केस मुळांपासून कमजोर होऊन कोरडे होतात. काही घरगुती उपाय आहेत, जे केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहेत.
एरंडेल तेल
एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘ई’ असते. हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एरंडेल तेल आपल्या केसांवर व्यवस्थित लावायचे आहे. अर्ध्या तासानंतर केस धुवू शकता.
संत्र्यांची प्युरी
केस जाड करण्यासाठी संत्र्याची प्युरी प्रभावी ठरू शकते. संत्र्याच्या प्युरीने केसांना मसाज करावे. अर्ध्या तासाने केस धुवावेत.
अंडी
एक ते दोन अंडी फेटून हे मिश्रण केसांना ३० मिनिटे लावावे. केस धुतल्यानंतर, तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
मेथीदाणे
केसांसाठी मेथीदाणे फार उपयोगी आहेत. भिजवलेल्या मेथीदाण्यांची पेस्ट करुन ती केसांचया मुळांना लावावी. यामुळे केसांचे पोषण होईल.
हे घरगुती उपाय आजीच्या अनुभवांतून आलेले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास नक्कीच चांगले परिणाम दिसतील. तरीही वैद्यकीय सल्ला घेतल्यास कधीही चांगलेच !