भुदरगड किल्ला

महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात ‘भुदरगड’ हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला ३६ मैलावर आणि गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्री पर्वतरांगेत हा किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट आणि रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. भुदरगड तालुक्याचे सगळे महसुली कामकाज भुदरगडावरून पाहिले जात होते. अलिकडे शासकीय यंत्रणेच्या सोयीसाठी तहसीलदार कार्यालय गारगोटीला स्थलांतरीत करण्यात आले.

राजा भोज दुसरा याने इसवी सन ११८७ मध्ये शिलाहार राजघराण्याची राजधानी वाळव्याहून पन्हाळ्यास आणली. राजा भोजने दक्षिण महाराष्ट्रात जे किल्ले निर्माण केले, त्यात ‘भुदरगड’ असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. गडावरील भैरवाच्या देवालयासमोर एक दीपमाला आहे. तिच्या बाजूला इतिहासाची साक्षीदार म्हणून एक तोफ आहे. या गडावर दोन मोठे तलाव असून ते किल्ल्याच्या सौंदर्यात भार घालतात.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
783 वेळा पाहिलं