सासूला खूश ठेवण्यासाठी

सासूला खूश ठेवणे खूप कठीण आहे, असे बऱ्याच सुनांचे मत असते. लग्नानंतर मुलीला सासू-सासऱ्यांची साथ मिळावी यासाठी तिला लग्नाच्या खूप आधी अप्रत्यक्षपणे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये स्वयंपाक, संभाषणाचा स्वर, इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. बदलत्या काळानुसार आणखी काही गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनल्या आहेत. सासूला खूश ठेवण्यासाठी याचा अवलंब सूना करु शकतात.

आपण सासूच्या आवडीनुसार वस्तू खरेदी करण्याबद्दल ऐकले असेल. सासूला आपला ‘शॉपिंग पार्टनर’ बनवा. आपण खेरदीसाठी जात असाल तर सासूला सोबत न्या. सासूसाठी काही घेत असाल तर सासूला सोबत घेऊन जा. अशा गोष्टी सर्वसामान्य भारतीय कुटुंबात आढळत नाहीत. खरेदीच्या बहाण्याने, आपल्याला सासूसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी तर मिळेलच, पण तिच्या आवडी-निवडीही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. यामुळे तिचे मन जिंकण्यात मदत होऊ शकेल.

नवऱ्यासोबत सहल, मित्रांसोबत सहल, भावा-बहिणींसोबत सहल सर्रास घडतेच. कधीतरी फक्त सासूबाईंनाच फिरायला सोबतीस घेऊन चला. यामुळे आपले नातेसंबंध खुलतील. याकरिता सासूला आवडणारी जागा शोधा. यानंतर सहलीची योजना करा. त्यांच्यासोबत प्रवासाला जा. एकीकडे, यामुळे त्यांचे अंतःकरण आनंदी होईल. दुसरीकडे, एकत्र घालवलेला वेळदेखील त्यांच्यातील परस्पर समंजसपणा मजबूत करण्याची संधी देईल. आपण आपल्या सासूसोबत डेटवरही जाऊ शकता. एक साधे दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण घेऊ शकता. सासूला बाहेर नेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे असे जेवण असेल. जेव्हा आपण असे काही वेळा बाहेर पडाल, तेव्हा आपल्यामध्ये एक बंध निर्माण होईल.

आधुनिक काळात या गरजेच्या बाबी झाल्या आहेत. सासूबाईंना त्यांच्या आयुष्यात घरच्या जबाबदाऱ्यांमधून कधीच वेळ मिळाला नाही. यामध्ये स्मार्टफोनच्या वापरापासून ते नवीन काळातील आरामदायक कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. नवीन काळातील स्वयंपाकघरातील साधनांचाही यात समावेश करता येईल. यामुळे आपणां दोघांमधील संवाद वाढण्यास मदत होईल. नवनवीन गोष्टींशी जोडण्याचा तुमचा प्रयत्न पाहून तुमच्या सासूबाईंच्या मनात तुमच्याबद्दल नक्कीच स्नेह निर्माण होईल.






602 वेळा पाहिलं