सुंदर चेहऱ्यासाठी

आपला चेहरा सुंदर दिसावा, असे सर्वांनाच वाटत असते. यासाठी काही गरजेच्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत. सुंदर चेहऱ्यासाठी दिवसातून दोनवेळा चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे चेहरा धुलीकणापासून मुक्त होतो. पाण्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि तेजस्वी होते. डाग, पुरळ आणि निस्तेजपणावर देखील उपचार होतात.
चेहरा बर्फाच्या थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल. निरोगी दिसेल.

मुरुमांची शक्यता कमी होईल. वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होईल. चेहऱ्याचा मसाज हा तणाव दूर करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. चेहऱ्यासाठी हा एक अप्रतिम उपाय आहे. मसाज वृद्धत्वविरोधी उपचार आहे.यामुळे तरुणपणाची चमक मिळते. रक्तप्रवाह सुरळीत होतो. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. म्हणून हलक्या हाताने मसाज करावा.

भरपूर पाणी प्यावे. पाण्याची कमतरता त्वचेवर दिसून येते. त्वचा कोरडी होते. अशा त्वचेवर सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते. आपण दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते. पेशींमध्ये पोषकद्रव्ये वाहून नेते. हे मुरुम, खुणा कमी करण्यास आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेस विलंब करण्यास देखील मदत करते.बाहेर जाताना फेस मास्क वापरा. याबाबत अजिबात आळस करू नका. पुरेशी झोप घ्या. विनाकारण जागरण करू नका. वेळेवर झोपा.






483 वेळा पाहिलं