केरळचे सांबार

अर्धा कप तूरडाळ, अर्धा कप मसूर डाळ, 1 मोठे पडवळ, 8 गवारीच्या शेंगा, 6 भेंडी, 6 लहान अळूची पाने, 2 शेवग्याच्या शेंगा, एक मध्यम आकाराचे वांगे, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 150 ग्रॅम काकडी, 1 मोठा कांदा,1 टोमॅटो, 3 चमचे सांबार पावडर, 10 लहान कांदे, 3 सुक्या लाल मिरच्या, पाव कप कोळलेली चिंच, 3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि कोथिंबीर.

कृती : सांबार बनविण्यासाठी आधी सर्व भाज्या धुऊन घ्या. या भाज्यांचे तुकडे करून त्या प्रेशर कुकरमध्ये घाला. यात डाळी, मीठ घालून भाज्या बुडतील एवढे पाणी घाला. मोठ्या आचेवर शिजवा आणि शिटी होऊ द्या. शिटी झाल्यावर आच बंद करा. कुकरची वाफ जाईपर्यंत उघडू नका. वाफ जिरल्यावर कुकर उघडा आणि 2-3 चमचे सांबार पावडर, कोळलेल्या चिंचेचे पाणी आणि हिंग घाला. ढवळून घ्या. हे मिश्रण दोन मिनिटे गरम करा. आता तेलात मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता तडतडू द्या. ही फोडणी कुकरमधील सांबारवर वरून द्या. कोथिंबिरीने सजवा. सांबार तयार!






575 वेळा पाहिलं