
नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किमी अंतरावर विकटगड किल्ला आहे. अतिशय जुना गड असून पावसाळ्यात हायकिंग करण्यासाठी इथे नेहमी लोक येतात. 2100 फूटावर असणारा हा गड नेहमीच सुंदर दिसतो. यालादेखील ऐतिहासिक ओळख असून इथे स्वामी समर्थांचे निवासस्थान होते आणि स्वामी समर्थ इथे ध्यानधारणा करायचे असं म्हटलं जातं. विकटगडचा आकार हा गणपतीबाप्पाप्रमाणे असून हायकिंगसाठी मोठे आकर्षणाचे ठिकाण आहे. माथेरानच्या डोंगराच्या कुशीमध्ये विकटगड असून हा गड सर करायला साधारण 2 तास लागतात. तर उतरण्यासाठी 1 तास लागतो. तुम्ही उतरून डायरेक्ट माथेरानच्या रेल्वे ट्रॅकमधून चालत येऊ शकता.

किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते. पनवेलच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.