नारळ रबडी

साहितय : 1 लिटर फुल क्रीम दूध, अर्धा कप किसलेले खोबरे, अर्धा कप खवा, साखर चवीनुसार, काजू, वेलचीपूड, बदामाचे काप, पिस्ता आणि 10 केशर धागे, सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या.

कृती : सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात १०-१५ काजू गरम पाण्यात भिजत घालून 15 मिनिटे बाजूला ठेवा. एक भांडे घ्या. त्यात फुल क्रीम दूध घाला. उकळी येईपर्यंत गरम करत रहा. आच मंद करुन दूध पाऊण प्रमाणात कमी होईपर्यंत शिजवत रहा. ते तळाला चिकटू नये, यासाठी ते सारखे ढवळत रहा. आता या दुधात केशराचे धागे आणि खवा घालून काही मिनिटे ढवळत रहा. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घालून बारीक वाटण तयार होईपर्यंत मिसळा. आता या मिश्रणात साखर आणि किसलेले खोबरे घालून चांगले मिसळून घ्या. दूध घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. त्यात काजूचे वाटण घाला. चांगले शिजवून गॅस बंद करा. आणि थंड होऊ द्या. नारळाची रबडी तयार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,429 वेळा पाहिलं