केळीचे रायते

साहित्य : पिकलेली केळी – चार , दही – एक किलो, साखर – दोन कप, वेलची पावडर – एक मोठा चमचा, देशी तूप – दोन -तीन चमचे, खोबरे किसलेले – तीन -चार चमचे, मनुका – दहा -पंधरा , काजू – दोन चमचे, बदाम – दोन चमचे

कृती : केळीचे रायते बनविण्यासाठी प्रथम चार पिकलेली केळी सोलून त्यांचे पातळ तुकडे करावेत. 1 किलो दही घेऊन चांगले फेटून घ्यावे. यानंतर या दह्यात साधारण दोन वाट्या पिठीसाखर आणि थोडी वेलचीपूड घालून मिसळून घ्यावे. यात चिरलेली केळी घालून मिसळावे. आता एक कढई घेऊन त्यात २-३ चमचे तूप गरम करावे. त्यात किसलेले खोबरे घालून चांगले परतून घ्यावे.बेदाणे, काजूचे आणि बदामाचे काप घालावेत. स्वादिष्ट आणि गोड केळी रायते तयार आहे.