
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या सप्ताहात ‘व्हॅलेंटाईन डे’ नंतर तिसऱ्या दिवशी ‘परफ्यूम डे’ साजरा केला जातो. यावर्षी आज हा दिवस साजरा होत आहे. हा दिवस जुन्या नात्यांमधून बाहेर पडण्याचा आणि स्वतःसाठी नवीन संधी शोधण्याचा आहे. तसेच हा दिवस स्वत:साठी असतो. म्हणून, यादिवशी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता. यादिवशी स्वतःसाठी आवडता परफ्यूम भेट घेऊ शकता. आपल्या आवडत्या सुगंधात हरवून जाऊ शकता; परंतु हा केवळ परफ्यूमचा दिवस नाही. ‘परफ्यूम डे’ चा कोणताही स्पष्ट इतिहास नसला, तरी हा दिवस स्वत:ला खास बनविण्याचा संदेश देतो, असे मानले जाते. परफ्यूम ही एक अशी वस्तू आहे जी कधी-कधी जुन्या आठवणींना ताज्या करून देते.
परफ्यूमचा सुगंध आपल्या भूतकाळाशी संबंधित कोणाची तरी आठवण करून देतो. तसे असेल तर यादिवशी असा कोणताही परफ्यूम वापरु नये. यादिवशी स्वत:च्या आवडीचा परफ्यूम स्वतःलाच भेट द्या. संपूर्ण व्हॅलेंटाईन सप्ताहामध्ये एकटे वाटत असेल तर हा दिवस स्वत:साठी आहे. यादिवशी स्वतःवर प्रेम करा. स्वतःचे लाड करा. परफ्यूमच्या दिवशी स्वतःला आत्मविश्वास देण्यासाठी स्वतःचे लाड करायला विसरू नका. ‘परफ्यूम डे’च्या दिवशी आपण आपल्या आवडत्या सुगंधित मेणबत्तीच्या मदतीने आपले घर सुगंधित करू शकता. असे केल्याने आपला मूड चांगला राहील. आपण दिवसभराचा क्षीण, सर्व थकवा विसरून आराम करू शकाल. आपण आपले आवडते संगीत लावून त्याचा आनंद घेऊ शकता.