साहित्य : अर्धा कप मटकी, 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, 1 टोमॅटोचे छोटे तुकडे, १ बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा हळद, पाव चमचा काळे मीठ, चवीनुसार मीठ , पाऊण लहान चमचा चाट मसाला, अर्धा लहान चमचा भाजलेले जिरे, 2 लहान चमचे हिरवी चटणी, लिंबू अर्धा, ओली कोथिंबीर -1 लहान चमचा, सजावटीसाठी बारीक शेव.

कृती : मटकी चाट बनविण्यापूर्वी एक रात्र पाण्यात भिजवून ठेवा. भिजत घालताना पाण्याचे प्रमाण दुप्पट ठेवावे. सकाळी ती चांगली फुगून येते. मटकीला अंकुर येण्यासाठी दुसऱ्या दिवशी ते पाण्याबाहेर काढून स्वच्छ ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून किंवा चाळणीत ठेवावी. चाट बनविण्यासाठी अंकुर आलेली मटकी मऊ शिजवून घ्यावी. यासाठी एका भांड्यात दोन वाट्या पाणी घेऊन त्यात मीठ आणि हळद घालून चांगले उकळावे. त्यात अंकुरलेली मटकी घालून पाच मिनिटे ऊब द्यावी. ५ मिनिटांनी गॅस बंद करावा. उकडलेली मटकी एका भांड्यात काढावी. बटाटा उकडून घ्यावा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावेत. चाट बनविण्यासाठी मटकीमध्ये काळे मीठ, चाट मसाला, मिरची, जिरेपूड, टोमॅटो आणि चिरलेला बटाटा घाला. वरून हिरवी कोथिंबीर आणि लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून चमच्याने सर्व काही चांगले मिसळून घ्या. मटकी चाट तयार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,045 वेळा पाहिलं