पोषक पदार्थच गरजेचे

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण निरोगी रहावे. कोणताही आजार आपल्याभोवती फिरू नये. यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करतात. शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे यासारख्या पोषकतत्वांची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक आरोग्यदायी पदार्थ आणि पेये घेतो.

बाजारात असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, जे आपल्यासाठी पौष्टिक असल्याचे भासवतात, प्रत्यक्षात मात्र नसतात. अशा पदार्थांपासून आपण शक्य तितके दूर रहावे. ‘डायजेस्टिव’ बिस्किटे तुमच्यासाठी आरोग्यदायी असतील असे नावावरून समजू नका. वास्तविक, या बिस्किटांमध्ये मैदा आणि साखर असते. यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. जर तुम्ही त्यांचे रोज सेवन केले तर तुमचे वजन अगदी सहज वाढू शकते. आजकाल ‘डाएट’ खाकरा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. लोक संध्याकाळच्या चहासोबत ते मोठ्या उत्साहाने खातात. पण डाएट खाखरामध्ये असे काही नाही. हे तळलेले स्नॅक्स भरपूर कॅलरीजनी भरलेले असतात.

बहुतेक लोक दुधात पावडर घालून मुलांना देतात; जेणेकरून मुलाने दूध प्यावे. जीवनसत्त्वे आणि डीएचए असलेली ही आरोग्यदायी पावडर अतिशय हानिकारक आणि साखरेने भरलेली असते. सकाळच्या नाश्यािासाठी ‘ब्रेकफास्ट सीरिअल्स’ चे सेवन करतात. खरे तर ती खूप अस्वास्थ्यकर असतात. यामध्ये फक्त साखर भरलेली असते. असाच ‘ब्राउन ब्रेड’ सुद्धा पांढऱ्या ब्रेडसारखाच हानिकारक आहे, कारण त्यात रंग वापरला जातो. पोषक घटकांचा नाही. त्यामुळे हे पदार्थ सेवन करणे शक्यतो टाळावे.