धाराशिव लेणीसमूह

लेणी हा कोणत्याही भागाचा एक ऐतिहासिक ठेवा असतो. त्या लेण्या संबंधित भागातील सांस्कृतिक समृद्धी वाढवितात. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात आकर्षक एक प्राचीन लेणीसमूह आहे. येथील शैव लेणी धाराशिवपासून ५ कि.मी. अंतरावर असून त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. या लेण्यांसमोर एक देखणे शिव मंदिर आहे. या लेण्यांकडे पायवाट तसेच पक्क्या मार्गानेही पोहोचता येऊ शकते. हातला देवी मंदिराकडून लेण्यांपर्यंत पोहोचणारी पायवाट मिळते. तर धाराशिव शहराजवळील बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. या लेण्यांना भेट द्यायची झाल्यास हिवाळा ऋतू उत्तम असतो.उस्मानाबाद शहरापासून ६ ते ७ किमी अंतरावर धाराशिव लेण्या आहेत.

धाराशीव लेण्या बालाघाट डोंगररांगेत कोरलेल्या आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशा लेण्या येथे आढळतात. हिंदू धर्मीयांच्या देव-देवतांच्या मूर्ती येथे कोरलेल्या आढळतात. धाराशिवपासून २० कि.मी अंतरावर सात जैन लेण्या आहेत. दुसऱ्या लेण्यामध्ये आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. धाराशिवमध्ये या संप्रदायाचा एक मठ आहे. येथील बौद्ध लेण्या आकर्षक आहेत. या लेण्या वाकाटक शैलीतील आहे. तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारागृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे.






13,809 वेळा पाहिलं