भोपळ्याच्या बिया आरोग्यवर्धक

भोपळा किंवा सीताफळ आपण अनेकवेळा खाल्ले असेल. पण त्यात असलेल्या बियांकडे कधी लक्ष दिले आहे का ? या बियांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या बिया निरुपयोगी समजून आपण फेकून देता. या बियांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोह यासारख्या गोष्टी असतात. त्यांचे सेवन स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बियांचे सेवन पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये शुक्राणूंची गुणवत्ता वाढवणारे गुणधर्म असतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी निरोगी राहते. त्यांच्या सेवनाने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कमी होतो, असा दावाही अनेक अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.

तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठीही या बिया खूप उपयुक्त आहेत. अशा परिस्थितीत निरोगी त्वचा आणि केस हवे असतील तर या बिया खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी या बिया सुकवून वेगवेगळ्या प्रकारे आहारात समाविष्ट करू शकता. मॅग्नेशिअमने समृद्ध असलेल्या या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात. याच्या सेवनाने मधुमेहाचा धोकाही टाळू शकता. हे इन्सुलिनची संवेदनशीलता देखील सुधारते. जर आपण याच्या बिया आहाराचा भाग बनवलात तर ते हृदयविकाराचा धोका कमी करते.

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने ते खाल्ल्याने नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढते. आपला रक्तप्रवाह सुधारतो. सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात या बियांचा समावेश करू शकता. न्याहारीसाठी या बिया खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. या बिया भाजून किंवा ओट्समध्ये घालूनही खाऊ शकता. दररोज या बिया मूठभर खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतील.