केरळमधील मूगडाळीची आमटी

साहित्य:
अर्धा कप मूगडाळ, २ किंवा ४ लसणीच्या पाकळ्या, १ कप खोवलेला नारळ, ३ चमचे खोबरेल तेल, २ चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, गरजेप्रमाणे कढीपत्ता.

कृती : कृती : एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करुन घ्या. त्यात मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजून घ्या. एका वेगळ्या भांड्यात 2 कप पाणी उकळवा. त्यात भाजलेली मूगडाळ घालून चांगली शिजवा. डाळ घट्ट झाली तर पाणी घालून थोडी पातळ करा. शिजलेली डाळ चांगली घोटून मग त्यात मीठ आणि हळद घालून चागली मिसळा. ओले खोबरे, जिरे आणि लसणीबरोबर वाटा. वाटलेले मिश्रण डाळीत घालून पाणी घालून मिसळा. डाळ एकजीव होईपर्यंत उकळू द्या. या डाळीला वेगळी फोडणी देत नाहीत. उाळ उकळली की गॅसवरुन खाली उतरुन त्यावर वरुन खोबरेल तेल आणि चुरलेला कढीपत्ता घालून चांगली मिसळून घ्या.डाळ तयार आहे.