जांभूळ बेट

कोणतीही नदी तसेच समुद्रातील बेटे मुळातच नितांतसुंदर असतात. दूरवरुन निळ्याशार पाण्यात पाहताना ही बेटे जणू काही छानपैकी विहार करीत असलेली भासतात. देशभरातील अशी काही बेटे आहेत, जी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. असेच महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात फार सुंदर बेट आहे. हे बेट ‘जांभूळ बेट’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. अर्थातच, जांभळाच्या खूप जास्त झाडांमुळेच हे नाव पडले आहे. हे बेट परभणी जिल्ह्यात असून गोदावरी नदीपात्रात मध्यभागी असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. साहजिकच बेटाच्या चारही बाजूंनी पाणी असते. पर्यटकांना या बेटावर जाण्यासाठी होडीने जावे लागते. हे बेट परभणी जिल्ह्यात आहे.

या बेटावर जांभळाची खूप जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या बेटावर मध्यभागी मारुतीचे एक पुरातन मंदिर आहे. येथील निसर्गरम्यता मनमोहक आहे. त्यामुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या बेटांवर जांभळाच्या झाडांसह मोरांचे थवे आणि इतर अनेक पक्ष्यांची वर्दळ असते. या बेटावर जाण्यासाठी परभणीतील पालम येथून वाहने उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या बेटावरची झाडे कोणाही मनुष्याने लावलेली नाहीत. ही झाडे पशु-पक्ष्यांच्या माध्यमातून रुजलेली, निसर्गाच्या पाण्यावर फोफावलेली आहेत. या बियांचा प्रसार पशूपक्ष्यांनी केला आहे. या बेटावरील वातावरण आल्हादायक व उत्साहवर्धक आहे. या बेटावरील सफरीदरम्यान सकारात्मक ऊर्जा मिळते. हे बेट म्हणजे जैवविविधतेचा उत्तम नमुना आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,979 वेळा पाहिलं