केरळची प्रसिद्ध भाजी – एरिशेरी

साहित्य : पिकलेल्या भोपळ्याचे तुकडे – 1 वाटी, कच्च्या केळ्याचे तुकडे – 1 वाटी, सुरणाचे तुकडे – 1 वाटी, लाल चवळी – 1 वाटी, हळद – 1 लहान चमचा, जिरे – 1 लहान चमचा, लसूण – 2 पाकळ्या, हिरव्या मिरच्या – 3, मिरी – 1 लहान चमचा, कढीपत्ता, खोवलेला नारळ – 1 वाटी, मोहरी – 1 लहान चमचा, उडीद डाळ – 1 लहान चमचा, लाल मिरच्या – 4, मीठ व तेल.

कृती:
एका प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली लाल चवळी,सुरण, केळे व भोपळ्याचे तुकडे घालून. चांगले ढवळा. त्यात पाणी घालून दोन शिटट्या काढून शिजवून घ्या. खोवलेला नारळ, हळद, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मिरे मिक्सरमध्ये वाटून घ्या. प्रेशर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा. वाटलेले वाटण त्यात घालून चांगले ढवळून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून एक उकळी आणा. आता फोडणीसाठी एक कढई घेऊन त्यात गरजेएवढे तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात लाल मिरच्या, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता घाला. फोडणी तडतडेपर्यंत प्रेशर कुकरमधील सारण एका बाऊलमध्ये काढा. आता वरुन ही तुम्ही फोडणी या भाजीवर घालून झाकण ठेवा. आपली भाजी तयार आहे. याला केरळमध्ये ‘एरिशेरी’ म्हणतात.