मूगडाळीचे लाडू

दि. 30दि. 30 । जून । 2025

साहित्य : २ कप मूगडाळ, ३ कप तूप, 1 कप साखर, 1 लहान चमचा वेलची पावडर, २ चमचे ड्रायफ्रुट्स, २ कप दूध.
कृती : लाडू बनविण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात मूग डाळ सोनेरी होईपर्यंत तळा. आता ही डाळ एका प्लेटमध्ये ठेवून थंड करा. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर कढईतील तुपात मूगडाळीचे पीठ घालून चांगली परतून घ्या. आता दूध गरम करुन घ्या. त्यात मुगडाळीचे पीठ, साखर,ड्रायफ्रुटस आणि वेलचीपूड टाकून चांगले मिसळा. आपल्या गरजेप्रमाणे तूप कमी-जास्त करु शकता. यानंतर हाताला थोडे तूप लावून लाडू बनवायला सुरुवात करा. मूग डाळीचे लाडू तयार आहेत.