खिळे बनवण्याचा उद्योग

‘खिळा’ ही वस्तू माहिती नसणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर तरी शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात किमान १ खिळा तरी नक्कीच असतो. खिळ्याला असलेली मागणी ही सतत वाढत जाणारी आहे. लघुउद्योगातून महिन्याला किमान २४ लाख खिळे तयार होतात. खिळे बनवण्याची प्रक्रिया ही यंत्रांवर आधारित आहे. त्यामुळे तिथे मनुष्यबळ हे तुलनेने कमी लागते. एखाद्या लघुउद्योगामध्ये खिळे बनवण्यासाठी किमान ४ कर्मचारी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कर्मचारी, उत्पादन क्षमता, यंत्रांसाठीची जागा लक्षात घेता किमान १००० चौ. फूट जागेची आवश्यकता असते.
वायर नेल मेकिंग यंत्राच्या सहाय्याने आपण खिळ्यांची निर्मिती करू शकतो. या यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले खिळे पॉलिश करण्याची गरज असते. खिळे पॉलिश करून ते बाजारात विक्रीसाठी उतरवले जातात. खिळे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची अंदाजे किंमत ५ ते ७ लाखांपर्यंत असते. त्यावर आपण वेगवेगळ्या आकाराचे खिळे तयार करू शकतो.
चांगला कच्चा माल वापरला की खिळे हे चांगल्या प्रतीचे तयार होतात. खिळे खराब होऊ नयेत म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारे बांधणी करून ठेवणेही आवश्यक असते. खिळे बनवण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय परवान्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या व्यवसायाची लघुउद्योगामध्येही तुम्ही नोंदणी करू शकतात. जर तुमच्याकडे परवाना असेल, तर या उद्योगासाठी कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.