पुण्यातील श्री नीरा नरसिंगपूर

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यात श्री नीरा नरसिंगपूर हे एक गाव आहे. येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरामागे भीमा आणि नीरा नद्यांचा संगम आहे. हे मंदिर पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील माढा, माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. हे मंदिर विविध जातीतील अनेक मराठी कुटुंबांचे कुलदैवत आहे. असे म्हणतात की, ऋषी, तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते. येथे श्री नृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य याठिकाणीच होते.

भक्त प्रल्हाद येथे नृसिंहांच्या वाळूच्या मूर्तीची पूजा करीत असे. हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती याठिकाणी गाभाऱ्यात दिसते.दोन्ही नद्यांच्या पाण्यात हे भव्य मंदिर आहे. नृसिंह गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मी मंदिर आहे. येथे सभामंडप, विस्तीर्ण ओवऱ्या आणि भव्य प्रवेशद्वारे बांधण्यात आली आहेत. घाटाच्या पायऱ्यांवर मोठ्या दगडातून हत्तीची शिल्पे घडविली आहेत. येथील हत्ती व सिंह यांची जोडी लक्ष वेधून घेते. येथे मगरीची पाच शिल्पे आहेत. समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव व इतर संतांच्या वास्तव्याने हे ठिकाण पावन झाले आहे.






12,170 वेळा पाहिलं