कुटुंबातील नोकरदार महिला

चूल आणि मुल या साचेबंदातून मुली बाहेर पडल्या आहेत. त्यातही पत्नी म्हणून नोकरी करणाऱ्या मुलीचा विचार आजकालचे तरुण करीत असल्यास स्वतः घरातील सगळी कामे करण्यासाठी त्यानी तयार रहायला शिकले पाहिजे. घरातील इतर माणसांनीही तिला समजून घेतले पाहिजे. विशेषतः सासूने तिच्याकडून कामाची किती अपेक्षा ठेवायची याचा विचार केला पाहिजे. जसे पुरुष दिवसभर काम करून रात्री घरात येत असतात, तशीच स्त्री सुद्धा काम करून रात्री घरी येत असते. त्यामुळे प्रत्येक काम तिनेच करावे असे म्हणणे चुकीचे आहे. पत्नी जर नोकरी करत असेल तर घरची सगळी कामे परंपरेने तिने एकटीनेच करावीत हा पतीचा अट्टाहास सर्वस्वी चुकीचा आहे. त्याने तिला घरच्या कामात मदत केली पाहिजे.

पतीच्या आयुष्यात, घरात एक नवीन व्यक्ती आली आहे. ती तुमची नोकर नाही त्यामुळे कामे वाटून घ्या. असे केल्याने नोकरी करणार्यान पत्नीशी तुमचे संबंध नेहमीच चांगले राहू शकतात. मुलाची जबाबदारी दोघांनीही एकत्रितपणे उचलावी. बहुतेक पुरुष मुलांना सांभाळण्यास सक्षमता दाखवीत नाहीत. पण पत्नीदेखील दिवसभर काम करून घरी येत आहे, हे लक्षात ठेवायला हवे. सासू सासऱ्यांनीही बाळाला प्रेमाने सांभाळले पाहिजे. अर्थात, पती आणि पत्नीने सासू सासऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अनेक वेळा असे घडते की पुरुष नोकरी करणाऱ्या महिलांशी विवाह करतात. कालांतराने तिला काम सोडण्यास सांगतात. असे केल्याने महिल्यांना त्यांच्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो. त्यांना अपमानित करू नका. प्रेमासोबत त्यांचा आदरही करा. लग्न झाल्यावर अनेक गोष्टी बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नये. यामुळे वाद होऊ शकतात. कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत तिला सहभागी करून घ्यावे

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,529 वेळा पाहिलं