
चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. सकाळ झाली की एक घोटभर चहा घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरु होत नाही.
त्यामुळे चहा खूप महत्त्वाचा असतो. मनपसंत चहा असा बनवावा :
साहित्य:
१ चमचा चहा, २ ग्लास पाणी, अर्धा कप साखर, दीड ग्लास दूध, १ इंच आले, २ वेलच्या, २ लवंग, अर्धा चमचा बडीशेप, एक तुकडा दालचिनी
कृती :
चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात चहापावडर व साखर घालून तो दोन मिनिटे उकळून घ्यावा. त्यात आले, वेलची, लवंग, दालचीनी, बडीशेप घालून चांगली उकळी आणावी. उकळून झाल्यानंतर त्यात दूध घालून पुन्हा एक उकळी काढावी. उकळी काढून झाली का हा चहा गाळणीने गाळून सर्व्ह करावा. अशा प्रकारे घरच्या घरी अगदी कडक चहा तुम्ही तयार करु शकता.