साहित्य : ताजे दही – दोन ते अडीच कप (500 ग्राम), पावडर साखर – पाव कप, मँगो पल्प – 1 कप, काजू-बदाम – 4, पिस्ता – 5 ते 6, वेलची – 2

कृती : प्रथम दही जाड कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचे सर्व पाणी निथळल्यावर घट्ट झालेले दही एका भांड्यात काढावे. या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावे. त्यात मँगो पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावे.






10,720 वेळा पाहिलं