मेथीचा खाकरा

साहित्य : दीड वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने ,एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा तीळ ,पाव छोटा चमचा मिरची पावडर ,पाव छोटा चमचा हळदपूड, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ.

कृती : चिरलेल्या मेथीच्या पानांमध्ये ओवा, तीळ, तिखट, हळद , तेल आणि मीठ हे साहित्य मेथीची पाने मऊ होईपर्यंत मिसळून घ्या. या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ घालून मळून घ्या. यानंतर हे पीठ एक तास भिजवून ठेवा. पिठाचे छोटे गोळे करून ते पातळ लाटा. ते तव्यावर टाकल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप घाला. मंद ज्वालेवर कापडाने दाब देऊन कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,331 वेळा पाहिलं