सुरळीत श्वसनासाठी

श्वास न घेता जगणे निव्वल अशक्य ! यासाठी आपला श्वसनमार्ग, फुफ्फुसे कार्यक्षम असली पाहिजेत. याकरिता काही कृतींचा अवलंब आपण केला पाहिजे. धुम्रपान टाळलेच पाहिजे. धुम्रपानामुळे श्वसनमार्गावर, तसेच फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी लाखो लोकांचा धुम्रपानासंबंधित आजारामुळे मृत्यू होतो. त्यामुळे ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे.

हात नेहमी स्वच्छ धुतले पाहिजेत. जेवणापूर्वी, जेवणानंतर, शौचास जाऊन आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर तसेच कोणतेही काम केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. मुलांना तशी सवय लावावी. आपले हात साबण आणि पाण्याने धुवावेत. यामुळे कोणतेही विषाणू पोटात जात नाहीत. फुफ्फुसे हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे.

दररोज व्यायाम, प्राणायाम करावा. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. फुफ्फुसातील ऊतींना बळकटी मिळते. हृदय, फुफ्फुसे आणि स्नायू एकत्रितपणे कार्य करण्यास मदत करतात. श्वासोच्छवास सुरळीत चालू राहतो.
याशिवाय धावणे, पोहणे हेसुद्धा उत्कृष्ट पर्याय आहेत. नियमित वेगवान चालणेदेखील फुफ्फुसासाठी उत्तम आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवावा. तेथे प्राणवायू मुबलक मिळतो. त्याचा खूप चांगला परिणाम शरीरावर होतो.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
710 वेळा पाहिलं