भुवयांच्या सुंदरतेसाठी

ज्याला सुंदर दिसणे आवडत नाही, असा क्वचितच कोणी असेल. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण आपल्या लूकची विशेष काळजी घेताना दिसतात. भुवया आपल्या लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. घरगुती उपायांनी आपण आपल्या भुवया जाड करू शकता.

आजच्या नव्या युगात जाड भुवयांचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो. भुवया चेहऱ्याकडे सर्वाधिक लक्ष वेधून घेतात. आपले डोळेदेखील हायलाइट करतात. एखाद्याच्या भुवया आधीच नैसर्गिकरित्या जाड असतील, तर त्याला पार्लरमध्ये योग्य आकार देणे आवश्यक असते. जर भुवयांची वाढ कमी झाली असेल तर ते बऱ्याच लोकांसाठी विशेषतः मुलींसाठी त्रासाचे कारण बनते. आपण आपल्या भुवयांच्या कमी वाढीमुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने भुवयांची वाढ कमी वेळात करु शकता.

बदामाचे तेल केसांच्या वाढीसाठी फार पूर्वीपासून ओळखले जाते. आपल्या बोटांनी या तेलाच्या काही थेंबांनी भुवयांना मसाज करावे. काही तास तसेच ठेवून नंतर चेहरा धुवावा. कांद्याचा रसही भुवयांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने तुम्हाला वेळेत चांगले परिणाम मिळू शकतात. यासाठी कांद्याचा रस काढावा. कापसाच्या साहाय्याने भुवयांवर लावावा. कांद्याचा रस कमीत कमी 15 ते 20 मिनिटे राहू द्यावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

जाड भुवयांसाठी मेथी पोषक आहेत. यामध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी बारीक करून पेस्ट तयार करावा. आपल्या भुवयांवर लावून 30 मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे. निर्जंतुकीकरण तेल अर्थात एरंडेल तेल देखील भुवयांच्या केसांची वाढ करण्यात महत्वाची भूमिका बजावते. दाट भुवया मिळविण्यासाठी त्यावर एरंडेल तेल लावू शकता. रोज रात्री लावून सकाळी धुवावे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,145 वेळा पाहिलं