धान्यांची इडली

साहित्य : बाजरीचे पीठ – अर्धा कप, नाचणीचे पीठ – अर्धा कप, गव्हाचे पीठ – अर्धा कप, ज्वारीचे पीठ – अर्धा कप, उडीद डाळ – अर्धा कप, मेथी दाणे- 2 लहान चमचे, मीठ – 1 लहान चमचा.

कृती : धान्यांची इडली बनविण्यासाठी प्रथम मेथी दाणे आणि उडीद डाळ एका भांड्यात भिजत घालावी. किमान चार तास ही भिजायला हवी. त्यानंतर ती पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन घ्यावी. आता हे पीठ एका भांड्यात काढून त्यात वरील सर्व पिठे घालून छान एकजीव करुन घ्यावी. त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. मग रात्रभर झाकून ठेवावे. यानंतर सकाळी इडलीच्या साच्यात थोडे तेल लावून त्यात चमच्याच्या सहाय्याने पीठ घाला. ते 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजवा. आता ही इडली गरमागरम सांबार किंवा चटणीसोबत खाण्यास द्या.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,317 वेळा पाहिलं